बांगलादेशः हिंदू नेत्याच्या अटकेमुळे चितगावमध्ये दंगलसदृश परिस्थिती

0
हिंदू

बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू नेत्याला झालेल्या अटकेनंतर झालेल्या संघर्षात ठार झालेल्या वकिलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली. त्यानंतर बांगलादेशने बुधवारी चितगावमधील सुरक्षा वाढवली आहे.
हिंदू नेत्याच्या अटकेचे उमटले पडसाद
इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेसशी (इस्कॉन) संबंधित हिंदू नेते, चिन्मय कृष्ण दास यांना सोमवारी ढाका विमानतळावर देशद्रोहासह आणखी काही आरोपांखाली अटक करण्यात आली.
त्यांच्या अटकेमुळे ढाका आणि चितगावमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. याशिवाय त्यांच्या समर्थकांची सुरक्षा दलांशी झटापट झाली.
चितगाव महानगर पोलिस आयुक्त हसीब अझीझ यांनी सांगितले की दास यांना न्यायालयातून परत तुरुंगात नेले जात असतांना 2 हजारांहून अधिक समर्थकांनी व्हॅनला वेढा घातला आणि जवळपास दोन तास ती अडवून धरली.
चितगाव येथील न्यायालयाबाहेर झालेल्या निदर्शनांमध्ये एका मुस्लिम वकिलाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अंतरिम सरकारच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणी व्हिडिओ फुटेजद्वारे सहा संशयितांची ओळख पटवण्यात आली.
मंगळवारी झालेल्या निदर्शनांदरम्यान तोडफोड आणि पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी 21जणांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्यांमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे सहा सदस्य आहेत. त्यांच्याकडे घरी बनवलेली स्फोटके सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
भारताकडून निषेध
हिंसक निदर्शनांनंतर ऑगस्टमध्ये पदच्युत पंतप्रधान शेख हसीना भारतात पळून गेल्यानंतर स्थापन झालेल्या अंतरिम सरकारने वकिलाच्या हत्येच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय चितगावमधील सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
ऑक्टोबरमध्ये एका सभेत बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याप्रकरणी देशद्रोहाच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या चिन्मय दास यांना मंगळवारी चितगाव न्यायालयाने जामीन नाकारला.
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत शेजारी असलेल्या भारताने दास यांच्या अटकेचा निषेध केला आहे. नवी दिल्लीने अल्पसंख्याकांवरील हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताला उत्तर देताना सांगितले की, सरकार न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप करत नाही आणि हे प्रकरण न्यायालयाद्वारे हाताळले जात आहे.
अनुकृती
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleTeam Trump Weighs Direct Talks With North Korea
Next articleICG’s National Maritime Search and Rescue Exercise & Workshop Scheduled from 28th November

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here