जमात-ए-इस्लामीकडून अल्पसंख्याक जागेसाठी हिंदू उमेदवाराची निवड

0
जमात-ए-इस्लामी
बीएनपीचे कार्यवाहक प्रमुख तारिक रहमान यांच्या पत्नी झुबैदा रहमान, त्यांची तब्येत सुधारत असताना, त्या त्यांच्या सासू खालिदा यांच्यासोबत दिसल्या. फोटो सौजन्य: Prothom Alo

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया, ज्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे, त्यांना कतारच्या एमीरांनी (Emir) उपलब्ध करून दिलेल्या एअर ॲम्ब्युलन्सद्वारे लंडनला नेले जाईल अशी अपेक्षा आहे, मात्र अद्याप त्याविषयी स्पष्टता नाही. ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, ही एअर ॲम्ब्युलन्स जर्मनीतून येत आहे.

दरम्यान, BNP (बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी) चे प्रमुख कार्यवाहक तारिक रहमान यांच्या पत्नी सध्या ढाक्यात आहेत. ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, जुबैदा रहमान या थेट एव्हरकेअर हॉस्पिटलमध्ये गेल्या, जिथे त्यांच्या सासूवर उपचार सुरू आहेत.

त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांचे पती कधी परततील, याविषयीच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. मात्र, त्यांनी याबाबत स्पष्टता दिलेली नाही, ज्यावरुन ते त्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेबद्दल चिंतित असल्याचे दिसते.

बांगलादेश फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या दिशेने वाटचाल करत असताना, काही रंजक घडामोडींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जमात-ए-इस्लामीने ‘खुलना-1’ या हिंदू-बहुल मतदारसंघातील जागेसाठीचे, हिंदू उमेदवाराचे नामांकन जाहीर केले आहे.

पक्षाने, जमातच्या हिंदू समितीचे डुमुरिया युनिटचे अध्यक्ष कृष्ण नंदी यांची निवड केली आहे. प्रोथोम आलोने दिलेल्या वृत्तानुसार, हा निर्णय अचानक घेण्यात आला.

कृष्ण नंदी यांनी त्यांच्या उमेदवारीला दुजोरा देत सांगितले की, “1 डिसेंबर रोजी, मला मुख्यालयात बोलावण्यात आले होते, जिथे जमातचे अमीर आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यांनी मला उमेदवार म्हणून घोषित केले आणि सर्व सूचना दिल्या. आता मी लवकरच मतदारसंघात काम सुरू करेन.”

नंदी, हे स्थानिक खासदार आणि अवामी लीग सरकारच्या काळातील माजी पशुधन मंत्री असलेले नारायण चंद्र चंदा, यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. त्यांना मिळालेल्या उमेदवारीतून हे अधोरेखित होते की, 1973 पासून, या मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक ही अल्पसंख्याक उमेदवाराने जिंकली आहे.

प्रोथोम आलोच्या मते, शेख हसीना यांनी एकदा स्वतः ही जागा जिंकली होती, परंतु त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत बहुसंख्याक समुदायातील त्यांच्या उमेदवाराचा पराभव, अल्पसंख्याक समुदायाच्या एका अपक्ष उमेदवाराकडून झाला होता; तो उमेदवार देखील त्यांच्याच पक्षाचा होता.

कदाचित निवडणुकीच्या याच वास्तवामुळे, जमातने सनातन (हिंदू) समुदायातील उमेदवाराला ही जागा दिली असावी. हा निर्णय जमातच्या राजकारणातील मूलभूत बदलाचे संकेत देतो; की ही केवळ एक सामरिक खेळी आहे, हे येणारी वेळच स्पष्ट करेल.

– टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleShyok Tunnel Opens, 125 Border Projects Launched Worth Rs 5,000 Crore
Next articleश्योक बोगद्याचे उद्घाटन, 5 हजार कोटींच्या 125 सीमावर्ती प्रकल्पांचा शुभारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here