आगरतळा हल्लाप्रकरणी बांगलादेशकडून भारतीय राजदूताला समन्स जारी?

0
आगरतळा
प्रणय वर्मा, बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्त

बांगलादेशने मंगळवारी भारतीय राजदूतांना बोलावून त्रिपुरातील आगरतळा येथील त्यांच्या दूतावासाच्या आवारात झालेल्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत चिंता व्यक्त केली.
बांगलादेशने आगरतळा येथील वाणिज्य दूतावास आणि व्हिसा उपक्रम स्थगित केले असले तरी भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयाचे कार्यवाहक परराष्ट्र सचिव एम. रियाझ हमीदुल्ला यांना भेटण्यासाठी मंगळवारी बोलावण्यात आले होते.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या कार्यवाहक परराष्ट्र सचिवांसोबतची माझी भेट हा आमच्या नियमित देवाणघेवाणीचा एक भाग होता, असे वर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
बांगलादेशसोबतचे भारताचे संबंध व्यापक आणि बहुआयामी आहेत आणि ते एका मुद्द्यापुरते किंवा अजेंड्यापुरते मर्यादित राहू शकत नाहीत, असे वर्मा यांनी सांगितले.
भारताच्या उच्चायुक्तांनी सकारात्मक, स्थिर आणि रचनात्मक संबंध निर्माण करण्याच्या भारताच्या प्रामाणिक हेतूवर भर दिला. ते म्हणाले, “आम्ही संबंधांमध्ये असणारी सकारात्मक गती कायम ठेवली गेली आहे.”
वर्मा म्हणाले, “आम्ही बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी संवाद साधण्यास तयार आहोत. शांतता, सुरक्षा आणि विकासासाठीच्या आमच्या सामायिक गरजा पूर्ण करण्यासाठी बांगलादेशसोबत काम करण्यात आम्हाला स्वारस्य आहे.”
या आठवड्याच्या सुरुवातीला, परराष्ट्र मंत्रालयाने आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्त परिसराच्या उल्लंघनाचा निषेध केला. एमईएने या घटनेचे अत्यंत खेदजनक असे वर्णन केले आणि कोणत्याही परिस्थितीत राजदूत आणि दूतावासातील प्रतिनिधींना लक्ष्य केले जाऊ नये असे म्हटले आहे.
नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोग आणि देशातील त्यांच्या उप/सहाय्यक उच्चायोगांसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी सरकार पावले उचलत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, त्रिपुरातील पोलिसांनी एका हिंदू गटाच्या सात सदस्यांना अटक केली असून त्यांच्यावर बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासात घुसखोरी आणि मालमत्तेची तोडफोड केल्याचा आरोप केला. अटक केलेल्या व्यक्ती हिंदू संघर्ष समितीने आयोजित केलेल्या निदर्शनांत सहभागी झाल्या होत्या. बांगलादेशात हिंदू भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहासह इतर अनेक आरोपांखाली अटक केल्याबद्दल ही निदर्शने आयोजित करण्यात आली होती.
वाणिज्य दूतावासात घुसखोरी करणाऱ्या निदर्शकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी बांगलादेशने केल्यानंतर काही तासांनी पोलिसांनी ही कारवाई केली.
एका निवेदनात म्हटल्यानुसार , “बांगलादेश सरकारने भारत सरकारला या घटनेवर त्वरित कारवाईचे, सखोल चौकशीचे आणि बांगलादेशच्या दूतावास कार्यालयाविरुद्ध हिंसाचाराच्या पुढील कोणत्याही घटना रोखण्यासाठी आवाहन केले आहे.”
बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या आरोपानुसार निदर्शकांनी त्यांच्या वाणिज्य दूतावासातील मालमत्तेचे नुकसान केले आणि राष्ट्रध्वजाची विटंबना केली.
पश्चिम त्रिपुरातील जिल्हा पोलीस अधिकारी किरण कुमार के. यांनी सांगितले की, “त्यापैकी सुमारे 50 जण दूतावासाच्या मुख्य दरवाजातून आत घुसले आणि त्यांनी बांगलादेशी ध्वज खाली आणला.
वाणिज्य दूतावासाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या चार पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान यांनी या हल्ल्याबाबत टीका केली. ते म्हणाले की अशा घटनांमुळे शेजारील देशांमध्ये फूट आणि मतभेद निर्माण होतात.

टीम स्ट्रॅटन्यूज


Spread the love
Previous articleAfter Aleppo, Syrian Rebels Advance On Another City
Next articleIndian Navy’s Modernization Drive: Admiral DK Tripathi’s Vision For The Future

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here