ट्रम्प यांच्या टीकेनंतर बीबीसीचे महासंचालक आणि सीईओ यांचे राजीनामे

0
बीबीसीचे प्रमुख टिम डेव्ही आणि त्यांच्या वृत्त विभागाच्या प्रमुख डेबोरा टर्नेस यांनी रविवारी या ब्रिटीश कंपनीच्या प्रक्षेपणावर पक्षपातीपणाच्या आरोपांनंतर राजीनामा दिला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाचे संपादन करण्याच्या प्रकारावरून हा पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला.

इस्रायल-हमास युद्ध, तृतीयपंथीयांच्या समस्या आणि ट्रम्प यांनी केलेल्या भाषणाच्या कव्हरेजमधील अपयशांचा हवाला देत माजी मानक सल्लागाराने सादर केलेला अंतर्गत अहवाल डेली टेलिग्राफ वृत्तपत्राकडे लीक झाल्यानंतर सार्वजनिकरित्या अर्थसहाय्यित बीबीसीवरील दबाव वाढत होता.

बीबीसीच्या प्रमुख पॅनोरामा कार्यक्रमात त्यांच्या एका भाषणाचे दोन भाग एकत्रितपणे संपादित केल्यानंतर ट्रम्प यांनी या दोघांना “अत्यंत बेईमान लोक” असे संबोधत त्यांच्यावर टीका केली होती. जानेवारी 2021 च्या कॅपिटल हिल दंगलीला प्रोत्साहन देत असल्याचे या भाषणाच्या संपादित भागातून दिसून आले.

बातम्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

2020 पासून ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे नेतृत्व करणारे टिम डेव्ही यांनी संस्थेचा बचाव करताना म्हटले की जगभरात त्यांच्या पत्रकारितेला सोन्यासारखे शुद्ध मानले जाते. परंतु कामात चुका झाल्याचे त्यांनी मान्य केले. या सगळ्या प्रकरणाची अंतिम जबाबदारी आपल्यालाच स्वीकारावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बीबीसी न्यूजच्या सीईओ डेबोरा टर्नेस यांनीही राजीनामा दिला. कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ईमेलमध्ये त्या म्हणाल्या: “मी पूर्णपणे स्पष्ट करू इच्छिते की, बीबीसी न्यूज संस्थात्मकदृष्ट्या पक्षपाती असल्याचे अलिकडचे आरोप चुकीचे आहेत.”

जगभरात मोठ्या प्रमाणात आदराचे स्थान मिळवलेला, बीबीसी ब्रिटनमधील सर्वात विश्वासार्ह न्यूज ब्रँड आहे, देशात त्यांची पोहोच मोठी आहे, ज्यातून बातम्या, मनोरंजन आणि क्रीडाविषयक घडामोडी सांगितल्या जातात.

अर्थात दूरचित्रवाणीवरील वाहिन्या पाहणाऱ्या कुटुंबांकडून भरल्या जाणाऱ्या परवाना शुल्काद्वारे अर्थसहाय्य मिळणाऱ्या या महामंडळाची काही वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावरील टीकाकारांकडून तीव्र छाननी केली जात आहे, जे त्याच्या निधीच्या मॉडेलवर आणि कथित उदारमतवादी भूमिकेवर आक्षेप घेतात.

अलिकडच्या काळात, राजकीय विभाजनाच्या दोन्ही बाजूंच्या टीकाकारांनी निष्पक्ष बातम्यांबद्दलची आपली वचनबद्धता राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे, कारण ते राजकीय आणि सांस्कृतिक विघटनातून मार्ग काढण्यासाठी संघर्ष करत आहेत.

लीक झालेल्या अंतर्गत अहवालात म्हटले आहे की बीबीसी अरेबिकने गाझामधील युद्धाच्या वृत्तांकनात इस्रायलविरोधी पक्षपात दाखवला होता आणि एकल-लिंगी जागांसाठी मोहीम राबवणाऱ्या गटाला कव्हर करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांच्या एका लहान गटाने दडपला होता ज्यांना ते ट्रान्सजेंडर समुदायाच्या प्रतिकूल वाटत होते.

हा अहवाल संडे टाईम्सचे माजी राजकीय संपादक मायकेल प्रेस्कॉट यांनी लिहिला होता, जे जूनमध्ये कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी तीन वर्षे बीबीसीच्या संपादकीय मार्गदर्शक तत्त्वे आणि मानक मंडळाचे स्वतंत्र सल्लागार होते.

त्यांनी बीबीसीच्या मंडळासाठी एक स्वतंत्र, सविस्तर माहिती देणारे पत्र तयार केले ज्यात त्यांनी म्हटले की वरिष्ठ अधिकारी संस्थात्मक पक्षपाताची अनेक उदाहरणे म्हणून ज्याचे वर्णन केले आहे ते हाताळण्यात “वारंवार अपयशी” ठरले आहेत.

अनेक घोटाळे

अलिकडच्या वर्षांत, बीबीसीला अनेक घोटाळे रोखण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.

2023 मध्ये, त्या वेळी सर्वात जास्त पगार असलेले क्रीडा सादरकर्ते गॅरी लिनेकर यांना सरकारच्या इमिग्रेशन धोरणावर टीका केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. याच्या निषेधार्थ अनेक क्रीडा कर्मचाऱ्यांना एकजुटीने नोकरी सोडली होती.

या उन्हाळ्यातील ग्लास्टनबरी संगीत महोत्सवात पंक-रॅप जोडी बॉब व्हिलन यांना इस्रायली सैन्याविरुद्ध गाणे म्हणताना दाखवल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला आणि या वर्षाच्या सुरुवातीला गाझाबद्दलचा एक माहितीपट प्रदर्शित करण्यात आला कारण त्यात हमास-शासित सरकारमधील एका उपमंत्र्यांचा मुलगा होता.

गेल्या वर्षी प्रसारित झालेल्या पॅनोरामा माहितीपटात, ट्रम्प त्यांच्या समर्थकांना सांगत असल्याचे दाखवण्यात आले होते की “आम्ही कॅपिटलमध्ये चालत जाणार आहोत” आणि ते “गरज पडली तर वाटेल त्या मार्गाने लढा देऊ”, असे बघायला मिळाले होते. मात्र ही टिप्पणी  त्यांनी त्यांच्या भाषणात एका वेगळ्या संदर्भात केली होती.

त्यांनी खरंतर म्हटलं होतं की त्यांचे समर्थक “आमच्या धाडसी सिनेटर, काँग्रेस सदस्य आणि महिलांना जयजयकार करतील”.

रविवारी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

“सर्व गोष्टींपेक्षा ते एका परक्या देशातील आहेत, ज्यांना अनेकजण आपला नंबर वन मित्र मानतात. लोकशाहीसाठी किती भयानक गोष्ट आहे!” अशी टीका त्यांनी केली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articlePhilippines Eyes Expansion of BrahMos Arsenal as Regional Demand for Indian Missile Grows
Next articleराजनाथ सिंह यांनी घेतला DPSU चा आढावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here