MRSAM पुरवठ्यासाठी BDL शी 2 हजार 960 कोटी रुपयांचा करार

0
करार
नवी दिल्लीत BDL बरोबर MRSAM च्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या

भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने BDL अर्थात भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत सुमारे 2 हजार 960 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली येथे 16 जानेवारी 2025 रोजी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि बीडीएलच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

नौदलाच्या संरक्षण पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा घटक असलेली MRSAM प्रणाली सध्या अनेक भारतीय नौदलाच्या जहाजांवर तैनात आहे. भविष्यातील बहुतांश नौदल मंचांमध्ये ही प्रणाली बसवली जाणार आहे, ज्यामुळे विकसित होत असलेल्या हवाई धोक्यांचा सामना करण्याची नौदलाची क्षमता वाढेल. हा करार भारताच्या संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी आणि लष्करी तंत्रज्ञानामध्ये देशाच्या स्वावलंबनाच्या दृष्टिकोनास पुढे नेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

भारत सरकारच्या प्रमुख उपक्रमांतर्गत, आत्मनिर्भर भारत, BDL स्वदेशी सामग्रीच्या मोठ्या प्रमाणासह ‘खरेदी (भारतीय)’ श्रेणी अंतर्गत MRSAM वितरित करेल. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकल्पामुळे अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSMEs) योगदानासह संरक्षण उत्पादन परिसंस्थेमध्ये सुमारे साडेतीन लाख श्रमदिन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.


हा करार सशस्त्र दलांना अत्याधुनिक, स्वदेशी विकसित प्रणालींनी सुसज्ज करताना एक मजबूत संरक्षण औद्योगिक तळ उभारण्यासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित करतो.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleचीन : विवो, हुआवेई अव्वल स्थानावर, ॲपलची सवलतींची खैरात
Next articleRussia Says It Will Retaliate To Missile Attack By Ukraine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here