बैरूत : संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशनचे उपसेनापती हल्ल्यात जखमी

0
बैरूत

बैरूत विमानतळावर शांतता रक्षकांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर शुक्रवारी झालेल्या “हिंसक हल्ल्यात” लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम दलाचे लवकरच निवृत्त होणारे उपसेनापती जखमी झाल्याचे, युनिफिलने म्हटले आहे. लेबनॉनच्या अधिकाऱ्यांसाठी ही मोठी लाजिरवाणी बाब असल्याचे मानले जाते.

मिशनने लेबनॉनच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण आणि त्वरित चौकशी करण्याची तसेच सर्व गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा  देण्याची मागणी केली आहे, असे निवेदनात नमूद  करण्यात आले आहे.

लेबनॉनची राज्य वृत्त संस्था एनएनएने दिलेल्या वृत्तानुसार, अंतर्गत मंत्री अहमद अल-हज्जर यांनी सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारपूर्वी आपत्कालीन बैठक बोलावली.

लेबनॉनच्या मंत्र्याचा हवाला देत एनएनएने दिलेल्या वृत्तानुसार, “युनिफिल सैन्यावर झालेला हा हल्ला गुन्हा असल्याचे लेबनॉन सरकारने नाकारल्याच्या गोष्टीला त्यांनी दुजोरा दिला.

गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांना संबंधित न्यायालयीन अधिकाऱ्यांकडे पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अमेरिकेने या हल्ल्याचा निषेध केला आणि संयुक्त राष्ट्रांचे शांतिरक्षक जखमी झाल्याचे म्हटले. लेबनॉनमधील इराण समर्थित दहशतवादी गटाचा संदर्भ देत, ‘हिजबुल्ला समर्थकांच्या एका गटाने’ हा हल्ला केल्याचे परराष्ट्र खात्याच्या निवेदनात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना यापूर्वी तैनात केलेल्या वेगवेगळ्या देशांमध्ये हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. सध्याचा हल्ला चुकीच्या वेळी झाला आहे, युद्धग्रस्त प्रदेशात शांततेसाठी आवश्यक सर्व उपक्रमांसाठी तोडगा शोधला जात आहे.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleBeirut: Deputy Commander UN Peacekeeping Mission Injured In Attack On Convoy
Next articleTaiwanese Air Force’s Indigenous New Trainer Crashes, Pilot Safe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here