विलंब, दिशाभूल करणाऱ्या दाव्यांची जबाबदारी संरक्षण कंपन्यांनी घ्यावी – CDS

0
वारंवार होणारा विलंब, अति-आश्वासन आणि फुगवून केलेले दावे लष्करी सज्जता कमकुवत करत आहेत असा इशारा देत संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी या सगळ्या प्रकारांची थेट जबाबदारी  कंपन्यांनी घेण्याचे आवाहन केल्यानंतर शुक्रवारी भारताच्या संरक्षण उद्योगावर तीव्र टीका करण्यात आली.

दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना जनरल चौहान म्हणाले की, केवळ नफा कमावण्याच्या उद्देशाने नव्हे तर खासगी क्षेत्राच्या महत्त्वाकांक्षांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ‘राष्ट्रवाद आणि देशभक्ती’ ची सशस्त्र दलांना अपेक्षा आहे.

“उद्योग क्षेत्रांकडून आमची अपेक्षा अतिशय साधी आहे. तुमच्या नफ्यासाठी चालणाऱ्या प्रयत्नांमध्येही आम्हाला थोडासा राष्ट्रवाद आणि देशभक्ती अपेक्षित आहे,” असे ते म्हणाले.

जनरल चौहान यांनी उघड केले की पाचव्या आणि सहाव्या उपकरण खरेदी (EP) चक्रांसाठी केल्या गेलेल्या मूल्यांकनांदरम्यान लष्कराला वारंवार त्रुटी आढळून आल्या होत्या. “बहुतेक लोकांनी मोठमोठी आश्वासने दिली आहेत मात्र वेळेत काम पूर्ण करण्यात ते अयशस्वी झाले आहेत. हे अजिबात स्वीकारण्याजोगे नाही,” असे ते म्हणाले.

‘संरक्षण सुधारणा हा एकतर्फी मार्ग नाही’

क्षमतेचे दावे करताना त्यात प्रामाणिकपणाही असावा असे आवाहन करताना, CDS म्हणाले की कंपन्यांनी स्वदेशी तंत्रज्ञानातील तफावत लपवणे थांबवले पाहिजे.

“उद्योग क्षेत्राला त्यांच्या क्षमतांबद्दल प्रामाणिक राहावे लागेल. तुम्ही आम्हाला अडचणीत सोडू शकत नाही. जर तुम्ही करारावर स्वाक्षरी केली आणि वेळेवर काम केले नाही तर गुणवत्ता नष्ट होईल,” असा इशारा त्यांनी दिला.

सुरक्षेसंदर्भातील अतिसंवेदनशील चिंता अधोरेखित करताना, त्यांनी स्वदेशी सामग्रीची पातळी चुकीची दाखवणाऱ्या कंपन्यांवर टीका केली. “बरेच उद्योग म्हणतात की यात 70 टक्के घटक भारतीय आहे, परंतु जेव्हा तुम्ही त्या उपकरणांची तपासणी करता तेव्हा ते तसे नसते. तुम्ही नेहमीच सत्यवादी असले पाहिजे कारण त्यांचा संबंध राष्ट्रीय सुरक्षेशी आहे,” असे ते म्हणाले.

‘जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बना’

जनरल चौहान यांनी भर दिला की मेक-इन-इंडिया अंतर्गत बनणारी संरक्षण उत्पादने तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा खाजगी क्षेत्र गुणवत्ता आणि किंमतीच्या बाबतीत जागतिक बेंचमार्क पूर्ण करेल.

“तुम्हाला केवळ भारतीय सशस्त्र दलांना विक्री करण्यासाठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करण्यासाठी देखील किमतीच्या बाबतीत स्पर्धात्मक असले पाहिजे. तुमच्याकडील उत्पादनांची किंमत जास्त असून काहीही फायदा नाही,” असे त्यांनी बजावले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous article‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ सौदी अरेबियातील भारतीय समुदायाची भावना
Next articleअ‍ॅडमिरल त्रिपाठी यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे संयुक्त उपक्रमांना मिळाली चालना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here