सशस्त्र दलांसाठी विश्वासार्ह कृत्रिम प्रज्ञा मूल्यमापन (ETAI) चौकट आणि मार्गदर्शक तत्वांचे प्रकाशन सीडीएस जनरल अनिल चौहान तसेच संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांच्या हस्ते काल म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत करण्यात आले. ईटीएआय चौकट आणि मार्गदर्शक तत्वे, विश्वासार्ह कृत्रिम प्रज्ञेचे महत्त्वाच्या संरक्षणविषयक कामकाजासोबत एकात्मिकरण करण्याच्या देशाच्या दृष्टीकोनातील मध्यवर्ती भूमिका दर्शवणारी आहेत.
यावेळी बोलताना सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी विश्वासार्ह एआयचा वापर तातडीने करण्याची गरज अधोरेखित केली. आधुनिक युद्धतंत्रामध्ये एआय कशा प्रकारे क्रांती घडवत आहे हे सध्याच्या काळातील जागतिक संघर्षांनी दाखवून दिले असल्याकडे त्यांनी निर्देश केला. या प्रणाली आपल्या उद्देशानुसार काम करत आहेत की नाहीत हे सुनिश्चित करण्याबरोबरच आपल्या शत्रूंकडून होणाऱ्या हल्ल्यांना तोंड देण्यामध्ये त्या सक्षम आहेत की नाहीत याची खातरजमा करणे अतिशय महत्त्वाचे असल्यावर त्यांनी भर दिला. त्यांनी ईटीएआय चौकट विकसित केल्याबद्दल वैज्ञानिक विश्लेषण समूहाचे अभिनंदन केले आणि संरक्षणविषयक व्यवहार आणि उपक्रमांमध्ये एआयच्या विश्वासार्हतेत वाढ करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
विश्वासार्हता आणि दृढता या गोष्टी आता ऐच्छिक राहिलेल्या नाहीत, तर मोहिमेतील अपयश आणि अनपेक्षित परिणाम रोखण्यासाठी आवश्यक आहेत याकडे डीआरडीओच्या अध्यक्षांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. भविष्यातील कामकाजाच्या यशासाठी एआयचा वापर विश्वासार्ह, मजबूत, पारदर्शक आणि सुरक्षित असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रसिध्द शास्त्रज्ञ आणि सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संगणकीय प्रणाली आणि सायबर प्रणालीच्या महासंचालिका सुमा वरुघीस याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, ईटीएआय आराखडा हा विशेषतः संरक्षण क्षेत्रासाठी विकसित केलेला जोखीम-आधारित मूल्यांकन आराखडा आहे. त्याची तत्त्वे, निकष आणि उपाय इतर क्षेत्रांनाही तितकेच लागू आहेत. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात डीआरडीओची भूमिका महत्त्वाची आहे असे सांगत त्याचे यश सुनिश्चित करण्यासाठी त्यांना सर्व आवश्यक सहाय्य पुरवले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
ईटीएआय चौकट पाच व्यापक सिद्धांतांवर भर देते. विश्वासार्हता आणि भक्कमपणा, सुरक्षा आणि संरक्षण, पारदर्शकता, निष्पक्
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)