7/10 हल्ल्याचा मास्टरमाइंड हमास प्रमुख सिनवर इस्रायलच्या हल्ल्यात ठार

0
हमास

7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार, हमास प्रमुख याह्या सिनवार काल ठार झाला. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल काट्झ यांनी सर्वप्रथम या बातमीला दुजोरा दिला.

काट्झने एका निवेदनात म्हटले आहे की, “7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हत्याकांड आणि सामूहिक अत्याचारांसाठी जबाबदार असलेला याह्या सिनवार याला आज आयडीएफच्या सैनिकांनी ठार केले.”

काट्झ म्हणाले, “इस्रायलसाठी हे एक मोठे लष्करी आणि नैतिक यश आहे. इराणच्या नेतृत्वाखालील कट्टरपंथी इस्लामच्या दुष्ट प्रवृत्तींपासून मुक्त अशा संपूर्ण जगाचा हा विजय आहे.”

सिनवार ठार झाला

“सिनवरच्या हत्येमुळे ओलिसांच्या तात्काळ सुटकेची संधी निर्माण झाली आहे. याशिवाय आतापर्यंत गाझामध्ये असणाऱ्या हमास आणि इराणी नियंत्रणातून मुक्तता होण्याची नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

इस्रायली संरक्षण दलानेही एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “एलिमिनेटेडः याह्या सिनवार” सिनवारचा मृत्यू हा गाझाविरूद्धच्या या वर्षभर चाललेल्या युद्धात इस्रायलसाठी एक मोठे यश आहे.

इस्रायली सैन्य आणि पोलिसांनी सिनवर या त्यांच्या कट्टर शत्रूच्या मृतदेहाची डीएनए तपासणी करून मगच त्याच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला.

हमासकडून मात्र या संपूर्ण घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

युद्धविरामाचा अंत?

हमासने ताब्यात घेतलेल्या ओलिसांच्या कुटुंबियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत की आता युद्धबंदी होऊ शकेल ज्यामुळे ओलिसांची सुटका होऊन ते घरी परत येतील. दुसरीकडे गाझामधील रहिवाशांच्या मते युद्ध यानंतरही सुरूच राहील.

पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमधील विनाशकारी युद्धाचे दुसरे वर्ष सुरू झालेले असताना सिनवारचा मृत्यू हा इस्रायली सैन्य आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासाठी एक मोठे यश आहे.

जुलै महिन्यात तेहरानमध्ये राजकीय प्रमुख इस्माईल हनियेहच्या हत्येनंतर सिनवारची हमासचा प्रमुख नेता म्हणून निवड करण्यातत आली. गेल्या दोन दशकांपासून गाझाच्या जमिनीखाली हमासने बांधलेल्या बोगद्यांमध्ये तो लपला असल्याचे मानले जात होते. याच्या मृत्यूमुळे मध्यपूर्वेतील संकटात आणखी वाढ होऊ शकते, तिथे व्यापक संघर्षाची शक्यता वाढली आहे.

अर्थात जर या इतर शक्यता लक्षात घेतल्या, तर गेल्या वर्षी हल्ल्याची योजना आखणाऱ्या व्यक्तीचा झालेला अंत या हल्ल्यामुळे सुरू झालेल्या युद्धाचा शेवट करण्यासाठी आतापर्यंत रखडलेल्या प्रयत्नांना पुढे नेण्यास मदत करू शकेल. वर्षभराच्या संघर्षादरम्यान इस्रायलने हमासच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 42 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींना ठार मारले आहे. हमासने इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्यात 1हजार 200 नागरिकांना ठार केले होते तर 250हून अधिक लोकांना ओलीस ठेवले.

सिनवरची प्रमुखपदी निवड कशी झाली?

एकेकाळी इस्रायलला माहिती पुरवल्याच्या संशयावरून पॅलेस्टिनींना शिक्षा करण्याचे काम सोपवण्यात आलेल्या  सिनवरने तुरुंगप्रमुख म्हणून आपले नाव निर्माण केले. दिलेल्या आदेशांचे अत्यंत निर्दयपणे अंमलबजावणी करणारा अशी त्याची ओळख होती.

रस्त्यावरील हिरो म्हणून तो उदयास आला. दोन इस्रायली सैनिक आणि चार पॅलेस्टिनी लोकांचे अपहरण आणि त्यांच्या हत्यांचा सूत्रधार असल्याबद्दल त्याला 22 वर्षांचा इस्रायली तुरुंगवासही घडला होता. त्यानंतर सिनवार लवकरच हमास गटात अव्वल स्थानावर पोहोचला. इस्रायलचे उच्चाटन करण्यासाठी त्याने आपले आयुष्य खर्ची केले होते.

हमासचा नाश करण्याचे नेतान्याहू यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इस्रायलने अविरतपणे हवाई हल्ले आणि लष्करी मोहिमा राबवल्या आहेत.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर गाझामध्ये गुरुवारी इस्रायली हल्ल्यांमध्ये, विस्थापितांना आश्रय देणाऱ्या जबालिया छावणीत शालेय मुलांसह 19 पॅलेस्टिनी ठार झाले.

ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)


+ posts
Previous articleIsrael Kills Hamas Chief Yahya Sinwar
Next articleसशस्त्र दलांसाठी सुरक्षित एआय आराखड्याचे सीडीएस यांच्या हस्ते प्रकाशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here