ड्रोन्सचा सामना करण्यासाठी CDS चा एकात्मिक राष्ट्रीय धोरणावर भर

0
CDS
ड्रोन प्रदर्शनाला भेट देताना, सीडीएस जनरल अनिल चौहान

केंद्रीय संयुक्त युद्ध अभ्यास केंद्राने (CENJOWS) नवी दिल्ली येथे “UAS वॉरफेअर आणि काउंटर-UAS वर विशेष लक्ष” या विषयावर एक उच्च-स्तरीय सेमिनार आयोजित केले होते. संरक्षण प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भाषण केले, ज्यामध्ये त्यांनी आधुनिक युद्धात Unmanned aerial systems (UAS) च्या परिवर्तनकारी भूमिकेवर प्रकाश टाकला आणि काउंटर-UAS कार्यक्षमतेच्या समर्पक फ्रेमवर्कची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले.

जनरल चौहान यांनी त्यांच्या भाषणात, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील (AI) जलद प्रगती, तसेच तंत्रज्ञानातील बदलाच्या वेगावर चर्चा केली, ज्यामुळे UAS सध्याच्या संघर्षांमध्ये एक विघटनात्मक घटक बनले आहे. त्यांनी आजच्या जागतिक संघर्षांचे उदाहरण दिले, ज्यात ड्रोन युद्धाची (Drone war) गती आणि दिशा कशी बदलत आहेत हे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, UAS ची किमतीत बचत आणि उच्च प्रभाव क्षमता पारंपारिक लष्करी धोरणांना मोठे आव्हान देत आहेत.

जनरल चौहान यांनी, भारतीय सशस्त्र दलात UAS आणि अनक्रूड सिस्टम्सबद्दल एक प्रमाणित नामकरण आणि सैद्धांतिक स्पष्टता स्थापित करण्याचे आवाहन केले. त्यांनी UAS च्या चार पिढ्यांमध्ये वर्गीकरण आणि एक एकात्मिक काउंटर-UAS प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता स्पष्ट केली. याकरता वापरकर्ते, डिझायनर्स आणि उत्पादकांमधील सुसंवाद महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले आणि भारताच्या आत्मनिर्भर भवितव्यासाठी स्वदेशी क्षमतांचा विकास करणे किती आवश्यक आहे यावर भर दिला.

या विशेष सेमिनारमध्ये संरक्षण तज्ञ, लष्करी अधिकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक वरिष्ठ एकत्र आले, ज्यांनी UAS तंत्रज्ञानाच्या परिणामांवर आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी, भारताने व्यापक प्रतिकारक उपाय विकसित करण्याच्या आवश्यकतेवर चर्चा करण्यात आली. युद्धभूमीचे स्वरूप सतत बदलत असल्याने, तज्ज्ञांनी दिलेल्या सूचना, सल्ले भविष्यातील संरक्षण धोरणे आणि रणनीती तयार करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे.

ड्रोन आणि काउंटर-ड्रोन तंत्रज्ञानातील क्रांतिकारी नवकल्पनांचे यावेळी सादरीकरण केले गेले, ज्यामुळे भारताची आधुनिक युद्ध क्षमतांमध्ये नेतृत्व म्हणून स्थिती आणखी ठळक झाली. सेमिनाराने तंत्रज्ञानातील प्रगती आणि धोरणात्मक धोरणांचे पूल तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले, ज्यामुळे देशाच्या सुरक्षा प्रणालीला अधिक बळकटी मिळू शकेल.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleभारताचे इम्फाळ जहाज मॉरीशसच्या राष्ट्रीय दिन सोहोळ्यात सहभागी होणार
Next articleबांगलादेशी पोलिसांनी प्रतिबंधित इस्लामिक गटाच्या 36 सदस्यांना केली अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here