आधुनिक युद्धक्षेत्रात ‘अनुकूलता’ हीच गुरुकिल्ली: CDS अनिल चौहान

0
चौहान
सिकंदराबाद येथील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट (CDM) येथे, अधिकाऱ्यांना संबोधित करताना संरक्षण प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान

प्रमुख संरक्षण अधिकारी (CDS) जनरल अनिल चौहान, यांनी आधुनिक युद्धक्षेत्रात टिकून राहण्यासाठी ‘अनुकूलता’ आणि ‘परिवर्तन’ यांची असलेली आवश्यकता अधोरेखित केली. “आजच्या आधुनिक युद्धामध्ये केवळ ‘सर्वात बलशाली’ असलेल्यांचा टिकाव लागणार नाही, तर ताकदवर असण्यासोबतच जे ‘बुद्धिमान’ आहेत, जे नव्या संधींचा फायदा घेऊ शकतात, तेच आधुनिक युद्धात टिकून राहू शकतात,” असे वक्तव्य जनरल चौहान यांनी केले. ते सिकंदराबादमधील ‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’ (CDM) येथे आयोजित “हायर डिफेन्स मॅनेजमेंट कोर्स (HDMC-20)” मध्ये सहभागी अधिकाऱ्यांना संबोधित करत होते.

21व्या शतकातील बदलत असलेल्या सुरक्षा परिदृष्यावर भाष्य करताना, जनरल चौहान यांनी लवचिकता, दूरदर्शी नेतृत्व, आणि जागतिक शक्तींच्या गतीशील बदलांदरम्यान, धोरणात्मक स्थानिकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नॉन-ट्रॅडिशनल धोक्यांमध्ये होणाऱ्या जलद प्रगतीच्या संदर्भात, आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचेही सांगितले. तसेच, त्यांनी समकालीन आणि भविष्यातील उभरत्या सुरक्षा आव्हानांवर, प्रभावीपणे उपाय शोधण्यासाठी “whole-of-nation” (संपूर्ण राष्ट्रव्यापी) दृष्टिकोनाचे महत्व पटवून दिले. तसेच भारतीय सशस्त्र दलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला, ज्याद्वारे राष्ट्रीय सुरक्षा धोरणाची दिशा निश्चित केली जाते.

“राष्ट्रीय सुरक्षा संरचना आणि संरक्षण सुधारणा वर्षातील बदल व्यवस्थापनावर” आधारित त्यांच्या भाषणात चौहान यांनी, सैन्य विभागाच्या कार्यप्रणालीवर (DMA) प्रकाश टाकला. त्यांनी सशस्त्र दलांमध्ये संयुक्तता, एकत्रीकरण, आणि समन्वय साधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. विशेषत: ‘Vision 2047’, संयुक्त डोक्ट्रिन्स, आणि संरक्षण व लष्करी धोरणांच्या रूपरेषेच्या माध्यमातून त्यांनी याविषयी समजावून सांगितले. याशिवाय त्यांनी समाकलित क्षमता विकास योजना आणि आत्मनिर्भरता उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली, जे सध्या DMA कडून राबवले जात आहेत.

त्यांच्या भेटीदरम्यान, जनरल चौहान यांनी प्राध्यापक सदस्य आणि अभ्यासक्रम सहभागींशी संवाद साधला, ज्यात मैत्रीपूर्ण परदेशी राष्ट्रांचे अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी रणनीतिक श्रेष्ठता राखण्यासाठी नाविन्य, प्रयोग, आणि सहकार्याच्या महत्त्वावर चर्चा केली. जनरल चौहान यांच्या उपस्थितीमुळे, CDM च्या संरक्षण व्यवस्थापन शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी, देशाची असलेली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित झाली आणिभारताच्या भविष्यातील लष्करी नेतृत्वाला आकार देण्यात CDM ची भूमिका अधिक दृढ झाली.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleभारतीय नौदलाचे आफ्रिकेसोबत नवे सागरी उपक्रम; वाचा सविस्तर
Next articleSamsung चे सह-CEO हान जोंग-ही यांचे ६३ व्या वर्षी निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here