
चीनने अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानला दुसऱ्या Hangor-class पाणबुडीचा पुरवठा केला आहे, ज्यामुळे त्याचा मित्रपक्ष असलेल्या पाकिस्तानच्या नौदलाचे सामर्थ्य आणखी मजबूत होणार आहे. अत्याधुनिक शस्त्र प्रणाली आणि सेन्सर्सने सुसज्ज असलेल्या या पाणबुडीचे 16 मार्च रोजी, हुबेई प्रांतातील वुहान येथे लाँचिंग करण्यात आले. याच श्रेणीतील एकूण आठ पाणबुड्यांसाठी चीन आणि पाकिस्तानमध्ये 5 अब्ज डॉलरचा करार करण्यात आला असून, त्यातील ही दुसरी पाणबुडी असल्याचे, चीनच्या सरकारी माध्यमांनी रविवारी सांगितले.
हँगोर क्लास ही चीनच्या 039A पाणबुडीची निर्यात आवृत्ती आहे, ज्यात 38 जणांचा क्रू आणि विशेष दलाच्या सैन्यासाठी आठ जागा आहेत. ती टॉर्पेडो आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.
या करारानुसार, चार पाणबुड्या या चीनमध्ये तयार केल्या जातील, तर उर्वरित चार कराचीमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण (ToT) कार्यक्रमांतर्गत तयार केल्या जातील. पाकिस्तानी नौदलाने सांगितले की, हँगोर-क्लास पाणबुड्या अत्याधुनिक शस्त्र आणि सेन्सर्सने सुसज्ज आहेत, ज्यामुळे त्यांना दूर अंतरावर लक्ष्य साधता येईल. यातील पहिली पाणबुडी एप्रिल 2024 मध्ये लाँच करण्यात आली.
दुसऱ्या पाणबुडीच्या लाँचिग समारंभात बोलताना, पाकिस्तान नौदलाचे उपप्रमुख- व्हाईस अॅडमिरल ओवैस अहमद बिलग्रामी यांनी, ‘प्रादेशिक सागरी स्थिरता राखण्यात या पाणबुड्या महत्त्वाची भूमिका बजावतील’ असे सांगितले. त्यांनी या प्रकल्पातील चीनच्या योगदानाचे कौतुक केले आणि पाकिस्तान आणि चीनमधील दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याबाबतचे महत्त्व अधोरेखित केले.
अलिकडच्या काही वर्षांत, चीनने पाकिस्तानला पुरवलेल्या चार आधुनिक नौदल फ्रिगेट्स व्यतिरिक्त नवीनतम पाणबुडींचा पुरवठा केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानची नौदल ताकद मजबूत करण्याच्या बीजिंगच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे, जे या प्रदेशात, विशेषतः बलुचिस्तानमधील ग्वादर बंदरात, चीनच्या वाढत्या उपस्थितीशी साधर्म्य ठेवते.
चिनी लष्करी तज्ञ, हँगोर-क्लास पाणबुडीचे वर्णन ‘पाण्याखालील प्रगत लढाऊ प्रणालींसह सज्ज एक अत्यंत सक्षम जहाज’ असे करतात. चिनी लष्करी व्यवहार तज्ञ झांग जुनशे, यांनी सरकारी ग्लोबल टाईम्सला सांगितले की, ‘ही पाणबुडी एअर-इंडिपेंडंट प्रोपल्शन (AIP) प्रणालीने सुसज्ज आहे, ज्यामुळे तिच्या गुप्त हालचाली, सहनशक्ती आणि हालचालींची क्षमात कित्येक पटीने वाढते. पाणबुडीच्या शस्त्रसामग्रीमध्ये टॉर्पेडो, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, खाण-लेइंग क्षमता आणि अत्याधुनिक पाण्याखालील शोध प्रणालींचा समावेश आहे.
चीन आणि पाकिस्तान यांच्यातील सततचे वाढती लष्करी सहकार्य, त्यांच्या सामरिक संरेखनाचे प्रतीक आहे आणि हंगोर-क्लास पाणबुड्या पाकिस्तानच्या नौदल ताफ्यातील एक महत्त्वाचा पैलू बनण्याची अपेक्षा आहे.
टीम भारतशक्ती