चीनच्या नौदलात ‘फुजियान’ या प्रगत विमानवाहू युद्धनौकेचा समावेश

0

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) नेव्हीने डिजिटल आत्मविश्वासाचे प्रभावी प्रदर्शन करत, आपल्या तिसऱ्या आणि सर्वात प्रगत विमानवाहू युद्धनौका- ‘फुजियान‘ (Hull 18) च्या नौदलातील समावेश साजरा केला. यावेळी त्यांनी StratNewsGlobal या BharatShaktiच्या सहयोगी प्लॅटफॉर्मने केलल्या ‘X’ पोस्टला थेट प्रतिसाद दिला, ज्यावरून हे स्पष्टपणे दिसून आले की, बीजिंग दक्षिण आणि आग्नेय आशियातील टीकात्मक प्रतिक्रियांबद्दल किती संवेदनशील आहे.

PLA च्या लष्करी हँडलने आपल्या पोस्टद्वारे अभिमानाने सांगितले की: “विमानवाहू नौका फुजियान, सेवेत दाखल झाली! चीनची PLAN ची फुजियान (Hull 18), ही पहिली कॅटापल्ट-असिस्टेड (CATOBAR) विमानवाहू नौका असून, 5 नोव्हेंबर 2025 रोजी ती औपचारिकरित्या नौदलात दाखल झाली. ज्यामुळे आता चीनच्या तीन विमानवाहू नौकांच्या नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे.”

हैनान प्रांतातील सान्या येथे, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या फुजियान विमानवाहू युद्धनौकेच्या प्रवेश समारंभाने (commissioning) चीनच्या वाढत्या सागरी आत्मविश्वासासोबतच, स्वदेशी तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रदर्शन करण्याच्या त्याच्या इच्छेलाही अधोरेखित केले आहे.

शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, शी जिनपिंग यांनी स्वतः जहाजावर चढून त्याच्या कार्यप्रणालीबाबत माहिती घेतली आणि ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापल्ट सिस्टीम’च्या वापराला वैयक्तिक मान्यता दिली. या निर्णयामुळे या नौकेची लढाऊ क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचे मानले जात आहे.

पूर्ण क्षमतेने लोड झाल्यावर 80,000 टनांहून अधिक वजन असलेली ही फुजियान युद्धनौका, चीनच्या नौदल क्षमतेतील एक पिढीगत झेप मानली जात आहे. ही चीनची पहिली अशी विमानवाहू नौका आहे, जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॉन्च आणि रिकव्हरी सिस्टम्सने सुसज्ज आहे. ही तंत्रज्ञान सुविधा यापूर्वी केवळ अमेरिकन नौदलाच्या USS Gerald R. Ford या विमानवाहू नौकेपुरतीच मर्यादित होती.

या प्रगत तंत्रज्ञानामुळे फुजियानवरील विमानांना अधिक वजनाचे शस्त्रसाठे, अतिरिक्त इंधन आणि वारंवार उड्डाण मोहिमा करण्याची क्षमता प्राप्त होते, जी पूर्वीच्या लियाओनिंग आणि शानडोंग या स्की-जंप डेक असलेल्या विमानवाहू नौकांपेक्षा खूपच अधिक आहे.

विशेष बाब म्हणजे, अमेरिकन नौदलाची USS Gerald R. Ford ही आतापर्यंतची एकमेव अशी विमानवाहू नौका आहे, जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॉन्च सिस्टम्स वापरते, मात्र तरीही या तंत्रज्ञान सुविधेवर अमेरिकेतूनच काही प्रमाणात टीका झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच, याला “महाग, अविश्वसनीय आणि दुरुस्ती करण्यास कठीण” असे संबोधले होते आणि पारंपारिक स्टीम कॅटापल्ट्सकडे परत जाण्याची मागणी केली होती. मात्र या तंत्रज्ञान प्रणालीचा फुजियान युद्धनौकेतील वापर, बीजिंगला राजकीयदृष्ट्या विशेष महत्व प्राप्त करुन देऊ शकतो.

फुजियानने 2022 च्या मध्यात लाँच झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी, मे 2024 मध्ये सागरी चाचण्या पार पाडल्या आणि त्यानंतर सुमारे 40 महिन्यांनी तिला नौदलात समाविष्ट करण्यात आले. या वेळापत्रकाची तुलना अमेरिकेच्या Ford-class विमानवाहू नौकांसोबत करता येते, जी तुलनेने फायदेशीर ठरते.

या युद्धनौकेवर, चीनच्या नवीन पिढीच्या J-35 स्टेल्थ फायटरसह (fixed-wing aircraft), लढाऊ हेलिकॉप्टर्स तैनात केली जातील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे त्याची हल्ला करण्याची (strike) आणि निगराणीची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

विश्लेषकांच्या मते, चीन आपल्या सागरी सीमा ओलांडून विस्तार करण्याचे प्रयत्न करत असून, 2035 पर्यंत चीन सहा विमानवाहू नौका तैनात करू शकतो, ज्या इंडो-पॅसिफिक प्रदेशातील अमेरिकन नौदलच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या जलद विस्ताराचे संकेत देतात. उपग्रह प्रतिमांमधूनच यापैतकी चौथ्या विमानवाहू नौकेच्या बांधकामाचे संकेत प्राप्त झाले आहेत.

भारत आणि इतर प्रादेशिक सागरी शक्तींसाठी, हा विकास म्हणजे चीनच्या ब्लू-वॉटर मधील वर्चस्वाच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीचे ठळक संकेत आहेत. फुजियान युद्धनौका बीजिंगच्या संरक्षण क्षमतेला बळकटी देईल, ज्यामुळे दक्षिण चीन समुद्र आणि तैवानजवळील संवेदनशील क्षेत्रांमध्ये त्यांना सातत्याने उपस्थिती राखता येईल. पूर्वी या प्रदेशात लियाओनिंग आणि शानडोंग नौकांनी जबरदस्तीने सराव मोहीमा केल्या आहेत.

तंत्रज्ञानातील विजयापलीकडे, फुजियानचा नौदलातील समावेश हा रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, ज्याचा उद्देश, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगच्या “सशक्त लष्कर स्वप्नाअंतर्गत” सैन्याच्या आधुनिकीकरण उपक्रमांना मजबूत करणे आणि तैवानच्या आकस्मिक परिस्थितीत अमेरिकेच्या हस्तक्षेपाला रोखण्यासाठी चीनची क्षमता दृढ करणे हा आहे.

फुजियान युद्धनौकेचा समावेश हे केवळ चीनच्या नौदल क्षमतेचे बळकटीकण नाहीये, तर ते खऱ्या अर्थाने PLAN (चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही) च्या जागतिक शक्ती म्हणून उदयाला येण्याचे प्रतीक आहे. भारतासाठी, ही घडामोड स्वदेशी विमानवाहू क्षमतेला वेग देण्याची, सागरी जागरूकता कायम ठेवण्याची आणि प्रादेशिक नौदल भागीदारी अधिक घट्ट करण्याची तातडीची गरज अधोरेखित करते, जी इंडो-पॅसिफिक किनारपट्टीवर आपले संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहे.

मूळ लेखक- रवी शंकर

+ posts
Previous articleमालदीव लष्करी विमान खरेदीसाठी सज्ज, पहिल्या हवाई तळाचे उद्घाटन
Next articleLCA तेजस जेटसाठीचा इंजिन करार पूर्ण, मात्र वितरणाचा तिढा अद्याप कायम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here