अमेरिकेच्या धोरण अनिश्चिततेदरम्यान स्थिर व्यापार भागीदार म्हणून चीनचा उदय

0
चीनचा

डोनाल्ड ट्रम्प ‘अमेरिका फर्स्ट’ अजेंडा राबवण्याच्या निर्धारासह जेव्हा वर्षभरापूर्वी पुन्हा सत्तेवर परतले, तेव्हा अनेक अर्थशास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता की; आधीच मंदावलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेवर नव्याने दबाव येईल. मात्र प्रत्यक्षात, बीजिंगने जागतिक युतींमधील बदलांचा फायदा घेत, प्रमुख भागीदारांसोबतचे ताणलेले संबंध सुधारले आणि विक्रमी व्यापार अधिशेष नोंदवला.

नव्या भागीदारांशी जवळीक वाढवताना, चीनचा विक्रमी व्यापार अधिशेष

विश्लेषकांच्या मते, अमेरिकेचे आपल्या पारंपरिक मित्र देशांशी असलेले संबंध तणापूर्ण झाल्यानंतर चीनने कॅनडा, भारत आणि युरोपमधील काही भागांसह इतर मोठ्या अर्थव्यवस्थांशी संबंध अधिक दृढ केले. परिणामी, 2025 मध्ये चीनचा व्यापार अधिशेष विक्रमी 1.2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचला. मासिक परकीय चलन प्रवाह सुमारे 100 अब्ज डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला, तर युआनचा जागतिक वापर सातत्याने वाढत राहिला.

ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर, बुधवारी चार दिवसांच्या दौऱ्यासाठी चीनमध्ये दाखल असताना, बीजिंग आपली ही अनुकूल स्थिती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करेल, अशी अपेक्षा विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. 2018 नंतर यूकेच्या पंतप्रधानांची ही पहिलीच चीन भेट आहे आणि ही भेट कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यानंतर होत आहे.

कार्नी यांच्या दौऱ्यादरम्यान, चीन आणि कॅनडाने व्यापारातील अडथळे दूर करण्याचे आणि नवीन धोरणात्मक संबंध जोपासण्याचे मान्य केले. कार्नी यांनी चीनचे वर्णन ‘अधिक अंदाज घेण्याजोगा आणि विश्वासार्ह भागीदार’ असे केले; हीच भाषा आता वॉशिंग्टनच्या धोरणांमुळे अस्वस्थ झालेल्या इतर सरकारांकडूनही ऐकायला मिळत आहे.

स्थिर आर्थिक शक्ती म्हणून चीनने स्वत:ला सादर केले

20 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि 45 ट्रिलियन डॉलरचे शेअर्स आणि बाँड मार्केटच्या पाठबळावर, चीन स्वतःला एक स्थिर जागतिक भागीदार म्हणून सादर करत आहे. बोस्टन कॉलेजचे अलेक्झांडर टॉमिक म्हणाले की, “बीजिंगने अनिश्चिततेच्या काळात स्वतःला ‘विश्वासार्ह’ भागीदार म्हणून यशस्वीपणे सादर केले आहे.” ऑलस्प्रिंग ग्लोबल इन्व्हेस्टमेंट्सचे डेरिक इर्विन म्हणाले की; अमेरिकेचे व्यापार धोरण समजून घेणे कठीण होत असताना, चीन ‘अंदाज वर्तवता येईल अशी स्थिरता’ दर्शवत आहे.

अमेरिकेने एप्रिलमध्ये चिनी उत्पादनांवरील टॅरिफ 100 टक्क्यांहून अधिक वाढवले होते आणि नंतर त्यांनी त्यात अंशतः कपात केली, दरम्यान या काळात चीनने आपली निर्यात इतर देशांकडे वळवली. 2025 मध्ये अमेरिकेला होणारी निर्यात 20 टक्क्यांनी घटली, तरीही आफ्रिका, लॅटिन अमेरिका, दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपियन युनियनला होणाऱ्या निर्यातीत मोठी वाढ झाली.

देशांतर्गत उपभोग कमकुवत असतानाही आणि दीर्घकालीन मालमत्ता मंदी असूनही, चीनने 2025 मध्ये आपले अधिकृत 5 टक्के वाढीचे लक्ष्य गाठले. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रशासनाने आरोग्यसेवा, दूरसंचार आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांना खुले करण्यासाठी प्रायोगिक योजना देखील राबवल्या.

डॉलरचे आकर्षण कमी होत असताना युआनची पकड मजबूत

व्यापारासोबतच चीनची आर्थिक स्थितीही मजबूत झाली आहे. परकीय चलन साठा 10 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचून 3.36 ट्रिलियन डॉलर इतका झाला आहे, तर शेअर बाजाराने अमेरिकन शेअर्सपेक्षा चांगली कामगिरी केली. चीनच्या सीमापार व्यवहारांपैकी आता निम्म्याहून अधिक व्यवहार युआनमध्ये होत आहेत, 15 वर्षांपूर्वी हे प्रमाण जवळजवळ शून्य होते.

बँकर्सचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांच्या अनपेक्षित राजनैतिक हालचालींमुळे डॉलरवरील विश्वास कमकुवत होत असताना जागतिक कर्जसंस्था युआनची तरलता वाढवण्यासाठी स्पर्धा करत आहेत.

चीनच्या पुढाकारानंतरही सावधगिरी कायम

तरीही, विश्लेषकांनी इशारा दिला आहे की सुधारलेले व्यापार संबंध म्हणजे पूर्ण विश्वास नव्हे. ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनच्या पॅट्रिशिया किम म्हणल्या की, अनेक देश अजूनही चीनच्या व्यापार पद्धती, आर्थिक दबाव आणि न सुटलेल्या सागरी वादांबाबत साशंक आहेत.

त्यांनी नमूद केले की, चीन सध्या वॉशिंग्टनपेक्षा अधिक व्यवहार्य वाटत असला तरी, त्याच्या मूळ वर्तनाने सर्व भागीदारांना अद्याप पूर्णपणे आश्वस्त केलेले नाही.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleमेक्सिको सीमेजवळ एका संशयित तस्करावर अमेरिकन सुरक्षा दलाचा गोळीबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here