देशाची मंदावलेली अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी, चीनने 2025 मध्ये काही नवीन उपाययोजना अवलंबण्याचे निश्चीत केले असून, सर्वप्रथम त्यांनी ‘ग्राहक व्यापार योजना’ (Consumer Trade-In Scheme) चा विस्तार केला आहे. चीनने गृहोपयोगी वस्तूंसाठी ग्राहक व्यापार-योजनेची व्याप्ती वाढवली आहे. सोबतच मंदावलेली देशांतर्गत उत्पादनांची मागणी वाढवण्यासाठी, चीन यावर्षी डिजिटल खरेदीसाठी अधिक सबसिडी देणार असल्याचे, बुधवारी एका अधिकृत धोरण दस्तऐवजाद्वारे जाहीर केले आहे.
देशांतर्गत प्रोत्साहन
या नव्या वर्षात मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, डिश-वॉशिंग मशिन आणि राइस कुकर यासारख्या गृहोपयोगी उपकरणांचा ‘कन्ज्युमर ट्रेड-इन योजनेत’ समावेश केला जाईल, असे सर्वोच्च राज्य नियोजक आणि वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या दस्तऐवजात नमूद केले आहे. यासोबतच सेलफोन, टॅबलेट संगणक, स्मार्ट वॉच आणि 6,000 युआन किंमतीच्या आतील ब्रेसलेटवर 15% सबसिडी मिळू शकते, असेही यात म्हटले आहे.
यामध्ये उत्पादनांची एकूण किंमत निर्दिष्ट केलेली नाही, तथापि, अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्र सरकारने नव्या वर्षात आत्तापर्यंत 81 अब्ज युआनचे ($11.05 अब्ज रकमेचे) ग्राहकोपयोगी वस्तू व्यापार योजनांसाठी वाटप केले आहेत.
चीनने गेल्या वर्षी जुनी उपकरणे, कार, सायकल आणि इतर वस्तूंच्या बदल्यात सबसिडी देण्यासाठी, 1 ट्रिलियन युआन विशेष ट्रेझरी बॉण्ड्समधून सुमारे 150 अब्ज युआनचे वाटप केले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की या मोहिमेने “सकारात्मक परिणाम साधले आहेत.”
2024 मध्ये या स्किममुळे, वाहन विक्री 920 अब्ज युआन तर गृहोपयोगी वस्तूंची विक्री 240 अब्ज युआन पर्यंत झाली होती, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाचे अधिकारी ली गँग यांनी याच पत्रकार परिषदेमध्ये दिली.
अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे
चीनने राबवलेले हे नवीन उपाय, 2025 मध्ये जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना देण्याच्या व्यापक योजनेचा एक भाग आहेत. जिथे सध्या मालमत्तेच्या गंभीर तुटवड्यामुळे, ग्राहक संपत्ती कमी झाली आहे आणि घरगुती खर्चाला त्याचा फटका बसला आहे.
चिनी नेत्यांनी यावर्षात, अधिक “उस्ताहावने” वापर वाढवण्याचे आणि “सर्व बाजूंनी” देशांतर्गत मागणी वाढवण्याचा संकल्प केला आहे.
रॉयटर्सने गेल्या आठवड्यात सादर केलेल्या अहवालात म्हटले होते, की चीनी उत्पादनांचा खप वाढवण्यासाठई प्रयत्नशील असलेल्या, चीनच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्यात आली आहे.
($1 डॉलर = 7.3314 चीनी युआन)
(रॉयटर्सच्या इनपुटसह)