चिनी हॅकर्सचे आता लक्ष्य ऑस्ट्रेलियन टेलिकॉम क्षेत्र – गुप्तचर प्रमुखांचा इशारा

0

चीनचे  सरकार आणि लष्कराशी संबंधित हॅकर्सनी देशाच्या दूरसंचार प्रणाली आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले असल्याचा इशारा देत ऑस्ट्रेलियाच्या गुप्तचर प्रमुखांनी बुधवारी सांगितले की अशा सायबर हल्ल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर नुकसान होऊ शकते.

 

 

सायबर हल्ल्यांचा खर्च

ऑस्ट्रेलियन सुरक्षा गुप्तचर संघटनेचे सुरक्षा महासंचालक माइक बर्गेस यांनी मेलबर्न येथे एका व्यवसाय परिषदेत सांगितले की हेरगिरीमुळे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला 12.5 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्स (8.1 अब्ज डॉलर्स) नुकसान झाल्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये व्यापारविषयक गुप्त माहिती आणि बौद्धिक मालमत्तेचे  2 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

बर्गेस यांनी सायबर हल्ल्याच्या धोक्यावर प्रकाश टाकला, साल्ट टायफून आणि व्होल्ट टायफून या चिनी हॅकिंग गटांच्या कारवायांचे वर्णन करताना ते म्हणाले की ते  “चिनी सरकारी गुप्तचर आणि त्यांच्या लष्करासाठी काम करणारे हॅकर्स” होते.

साल्ट टायफूनने केवळ एकाच धोरणात्मक हेरगिरी ऑपरेशनमध्ये अमेरिकन दूरसंचार प्रणालींमध्ये प्रवेश केला नाही तर “ऑस्ट्रेलियामध्ये आमच्या दूरसंचार नेटवर्कची देखील तपासणी केली आहे,” असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, व्होल्ट टायफूनचा हेतू अमेरिकेच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना अडथळा आणण्याचा होता, ज्यामुळे संभाव्य नुकसान करण्यसाठीची  पूर्वतयारी झाली.

“आम्ही चिनी हॅकर्सना आमच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची तपासणी करताना पाहिले आहे,” असे त्यांनी पुढे म्हटले.

हॅकिंगचा परिणाम

बर्गेस यांनी बँका आणि वाहतूक यासह व्यापक दूरसंचार व्यत्यय आणि पाणीपुरवठा तसेण वीज खंडित होण्याच्या प्रकारांवरील संभाव्य परिणामांबद्दल इशारा दिला.

“मी तुम्हाला खात्री देतो; हे काल्पनिक नाहीत – परदेशी सरकारांकडे सध्या या शक्यतांची चौकशी करणारी अनेक हायटेक पथके आहेत,” असे त्यांनी सांगितले.

इतर संभाव्य परिस्थितींमध्ये स्पर्धक ऑस्ट्रेलियन कंपनीला व्यापारदृष्ट्या कमजोर  बनवणे किंवा निवडणुकीदरम्यान दहशत निर्माण करणे यांचा समावेश होता, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात सिडनीतील लोवी इन्स्टिट्यूटमध्ये केलेल्यि भाषणादरम्यान बर्गेस म्हणाले होते की, जेव्हा जेव्हा ते चीनबद्दल सार्वजनिकपणे बोलतात तेव्हा चिनी अधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलियन सरकार आणि खाजगी क्षेत्राकडे ASIO बद्दल अनेक तक्रारी केल्या. “मात्र यामुळे माझा निर्धार थांबणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleCNS Adm Tripathi Embarks on Official Visit to US to Strengthen Maritime Ties
Next articleसागरी संबंध मजबूत करण्यासाठी नौदल प्रमुख अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here