भारताच्या दुर्मिळ खनिज गरजा पूर्ण करण्याचे चीनचे आश्वासन

0

भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा होत असून, बीजिंगने नवी दिल्लीला दुर्मिळ खनिजांच्या गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे, असे एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने आणि सूत्रांनी मंगळवारी सांगितले. दोन्ही शेजारील देश 2020 च्या सीमा संघर्षामुळे ताणले गेलेले आणि खराब झालेले संबंध सुधारण्यासाठी  काम करत आहेत.

 

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत 24 व्या फेरीच्या सीमा चर्चेसाठी भारत दौऱ्यावर आले असून मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार आहेत.  शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO)  शिखर परिषदेसाठी मोदी चीनला जाण्याच्या काही दिवस आधी या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.

“एक नवीन ट्रेंड दिसून आला आहे. सीमा शांत आहेत. शांतता आणि स्थैर्य आहे,” डोवाल यांनी चर्चेची सुरुवात करताना वांग यांना सांगितले. “आमचे द्विपक्षीय संबंध अधिक महत्त्वाचे झाले आहेत.”

“निर्माण झालेल्या नवीन वातावरणामुळे आम्हाला आम्ही ज्या विविध क्षेत्रांवर काम करत आहोत त्यामध्ये पुढे जाण्यास मदत झाली आहे,” असे ते म्हणाले.

भारतीय वृत्तसंस्था एएनआयने त्यांच्या भाषणाच्या केलेल्या भाषांतरानुसार, वांग म्हणाले की गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांना बसलेले धक्के दोन्ही देशांच्या हिताचे नाहीत.

भारताच्या प्रमुख गरजा पूर्ण करण्याचे चीनचे आश्वासन

मंगळवारीच्या सुरुवातीला एका भारतीय सूत्राने सांगितले की चीनने तीन प्रमुख भारताला भेडसावणाऱ्या चिंता सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. सूत्राने सांगितले की वांग यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांना आश्वासन दिले होते की बीजिंग भारताची खते, दुर्मिळ खनिजे आणि बोगदा बोरिंग मशीनची गरज पूर्ण करत आहे.

रॉयटर्सने यावरील प्रतिक्रियेसाठी भारतीय परराष्ट्र आणि खाण मंत्रालयांना संपर्क केला मात्र त्यांच्याकडून त्वरित प्रतिसाद मिळाला नाही.

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने देखील टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.

चीनने निर्यात परवाने जलद मंजूर करण्यास सहमती दर्शविली आहे की भारतासाठी संपूर्ण सूट देण्यास सहमती दर्शविली आहे हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चीनने यापूर्वी नियंत्रण व्यवस्था प्रत्यक्षात न मोडता युरोप आणि अमेरिकेसाठी निर्यात परवाने जलद करण्याचे वचन दिले आहे.

या करारांनंतर आणि वाणिज्य मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात प्रलंबित असलेले अर्ज हातावेगळे केल्यानंतर जूनमध्ये चीनच्या दुर्मिळ खनिज आणि संबंधित चुंबकांच्या निर्यातीत वाढ झाली.

तथापि, चीनच्या सीमाशुल्क आकडेवारीनुसार, जानेवारीच्या पातळीच्या तुलनेत भारतात दुर्मिळ खनिज चुंबक निर्यात अजूनही 58 टक्के कमी होती. अशा प्रकारची माहिती जून महिन्यापर्यंतच उपलब्ध आहे.

भारतात जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा दुर्मिळ खनिज साठा आहे, 6.9  दशलक्ष मेट्रिक टन, परंतु देशांतर्गत चुंबक उत्पादन नाही. भारत प्रामुख्याने चीनमधून आयात केलेल्या चुंबकांवर अवलंबून आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleBLA वर अमेरिकेचा दहशतवादाचा ठसा, हेतूंबाबत प्रश्नचिन्ह कायम
Next articleShift 97 Mk1A to Mk-2: Ex-IAF Chief’s Bold Call on LCA Orders

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here