चीनच्या “K” व्हिसामुळे सोशल मीडियावर वादळ, भारतावरही निशाणा

0
चीनच्या सोशल मीडियावर “K” व्हिसाच्या योजनांबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या व्हिसामुळे उच्च कुशल परदेशी लोकांसाठी देशांतर्गत नोकरीची बाजारपेठ खुली होईल. ऑगस्टमध्ये नवीन व्हिसाची घोषणा करण्यात आली होती जी 1 ऑक्टोबर रोजी, चीनच्या राष्ट्रीय दिनी लागू केली जाईल.
या नवीन अंमलबजावणीविरुद्ध वेइबोवरील पोस्टवरून संताप आणि निराशा दिसून येते. “आपण भारतीय ध्वज फडकावू शकतो,” असे एका पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिका H-1B व्हिसावर कडक कारवाई करत असल्याने भारतीय तंत्रज्ञांचा ओघ आता चीनकडे वळेल असे यातून सूचित करण्यात येत आहे.
“आपण भारतीय ध्वज फडकावू शकतो” असे एका नेटिझनने लिहिलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट.

“इथे आपल्याला स्वतःला नोकऱ्या शोधूनही मिळत नाहीत, आता तर स्पर्धाच वाढेल,” असा इशारा दुसऱ्या पोस्टमध्ये देण्यात आला होता, “देशांतर्गत विद्यार्थ्यांनाही परदेशी पदवीधरांसारखेच फायदे मिळू शकतील का?”  असा प्रश्न  तिसऱ्याने विचारला आहे.

चीनच्या युवकांना वाटणारी भीती आणि असुरक्षितता खरी आहे. चीनमधील तरुण वर्गातील  बेरोजगारीचे प्रमाण 14 टक्के इतके जास्त असल्याचा अंदाज आहे. यातून काही विचित्र ट्रेंड निर्माण झाले आहेत ज्यात “काम करण्याच्या नाटका”चा समावेश आहे, जिथे तरुण वर्ग हातात काहीही काम नसतानाही कामाच्या वेळेत बसण्यासाठी त्या जागेचे कंपनीला पैसे देतात.

सरकारने कदाचित अशाप्रकारच्या  प्रतिक्रियांचीच अपेक्षा केली असेल. सरकारी ग्लोबल टाईम्समधील एका संपादकीय लेखात “K” व्हिसा अमेरिकेच्या H-1B सारखा नाही असे सांगून या मुद्द्याला नाजूकपणे संबोधित केले आहे.

“चीनचा “K” व्हिसा तरुण चिनी आणि परदेशी विज्ञान तसेच तंत्रज्ञान व्यावसायिकांमध्ये देवाणघेवाण आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. त्याचा मुख्य उद्देश केवळ वर्क परमिट प्रदान करण्याऐवजी आंतरराष्ट्रीय प्रतिभेची देवाणघेवाण आणि वैज्ञानिक नवोपक्रमात सहकार्य करणे आहे.”

पण त्यात असेही नमूद केले आहे की “चीनचे संस्थात्मक खुलेपण … त्याच्या स्वतःच्या धोरणात्मक विकास गरजा प्रतिबिंबित करते. हे चीनचा खुलेपणा आणि आत्मविश्वास दर्शवते.”

सीसीटीव्हीच्या मते, K व्हिसा धारकांना सुलभरित्या करता येणारा बहु-प्रवेश, दीर्घकाळ राहणे आणि चिनी employer किंवा sponsor च्या पाठिंब्याशिवाय अर्ज करण्याची क्षमता प्राप्त होईल. पात्र अर्जदारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संशोधन संस्थेतून STEM क्षेत्रात किमान पदवी असणे आवश्यक आहे किंवा ते आधीच संबंधित क्षेत्रात काम करत असले पाहिजेत. परंतु तरी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्टचा जणू महापूरच आला आहे.

“हो, चीनमध्ये आमच्याकडे अतिरिक्त पदवीपूर्व नोकऱ्या आहेत, बरोबर?” एका यूजरने वेइबोवर पोस्ट केले. दुसऱ्याने इशारा दिला: “एखाद्याने अत्यंत सावधगिरीने वागले पाहिजे. मूलभूत मर्यादा अशी असावी की त्यांनी चीनमध्ये योगदान द्यावे आणि चिनी संस्कृतीवर खरोखर प्रेम करावे. अल्पकालीन नफ्याच्या मागे लागून, नियम कमी करू नका नाहीतर तुम्हाला एका छोट्या फायद्यासाठी मोठे नुकसान सहन करावे लागेल आणि चिनी राष्ट्राचे ऐतिहासिक गुन्हेगार बनावे लागेल.”

मेख अशी आहे की चीनमध्ये अत्यंत कुशल तंत्रज्ञान व्यावसायिकांची कमतरता नाही. परंतु कम्युनिस्ट पक्षाला अशा वेळी स्वतःला नवोपक्रमासाठी खुले केंद्र म्हणून सादर करण्याची अशावेळी गरज वाटत आहे जेव्हा अमेरिका आपले दरवाजे बंद करत आहे.

जागतिक प्रतिभा शर्यतीत आपले अस्तित्व वाढवण्यासाठी सरकार “K” व्हिसाकडे एक साधन म्हणून कदाचित पाहत असेल, परंतु अनेक चिनी तरुणांना हे पाऊल जागतिक स्पर्धेत त्यांचे नेमके स्थान काय याची आठवण करून देणारे आहे: जे चिंताग्रस्त, दुर्लक्षित आणि त्यांच्या तीव्र मतभेदांबद्दल मोठ्या प्रमाणात बोलणारे आहेत.

रेशम

+ posts
Previous articleदेशाच्या रक्षणासाठी सज्ज, स्वदेशी हवाई संरक्षण ढाल: ‘अनंत शस्त्र’
Next articleमानवी तस्करीची वाढती चिंता; ब्राझील, दक्षिण आफ्रिकेचा अमेरिकेशी सामना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here