चीनचे अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले

0
अंतराळातील कचऱ्यावर आदळल्यानंतर परतीचा मार्ग बंद झाल्याने आकाशातच अडकलेल्या तीन चिनी अंतराळवीरांचे यान सुरक्षितपणे चीनमध्ये उतरल्याचे वृत्त राज्य प्रसारक सीसीटीव्हीने दिले आहे.

 

 

चीन मॅनेड स्पेस एजन्सीने (सीएमएसए)  सांगितले की, गेल्या आठवड्यात शेन्झो-20 रिटर्न कॅप्सूलच्या एका छोट्या खिडकीत “लहान भेगा” आढळल्या, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी 5 नोव्हेंबर या दिवशी होणारा क्रूचा नियोजित परतीचा प्रवास पुढे ढकलला.

या अंतराळवीरांनी चीनच्या कायमस्वरूपी वस्ती असलेल्या तियांगोंग अंतराळ स्थानकावर सहा महिन्यांचे मिशन पूर्ण केले होते. नुकसान झाल्याचे आढळल्यानंतर, नवे यान शेन्झो-21 आणि क्रू अवकाशात पाठविण्यात आले. त्यातून या तीन अंतराळवीरांनी स्थानक सोडले आणि स्थानिक वेळेनुसार 4:40 वाजता इनर मंगोलियातील डोंगफेंग लँडिंग साइटवर उतरले.

एप्रिलमध्ये सुरू झालेले हे मिशन सर्वसाधारणपणे जसे सुरू असते तसेच होते. मात्र कचऱ्याच्या घटनेमुळे परतीची योजना बदलण्यास भाग पडझे, असे सीएमएसएने म्हटले आहे.

या प्रकारामुळे अंतराळातील कचऱ्याबद्दल तीव्र चिंता निर्माण झाली असून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक तसेच युनायटेड स्टेट्स, रशिया आणि खाजगी कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंतराळयानांशी संबंधित मोहिमांवर परिणाम झाला आहे.

तुकडे होणारे उपग्रह, टक्करी आणि उपग्रहविरोधी शस्त्रांच्या चाचण्यांमुळे अंतराळ कक्षेतील कचरा वाढत आहे, ज्यामुळे क्रू असलेल्या आणि क्रू नसलेल्या मोहिमांसमोरील धोका वाढत आहे. अलिकडच्या अहवालांनुसार, अमेरिका आणि चीनमधील एजन्सींनी अंतराळ सुरक्षेसाठी तात्पुरत्या स्वरूपात समन्वय वाढवला आहे, ज्यामध्ये मॅन्युव्हर अलर्टचा समावेश आहे.

गेल्या वर्षी, बोईंग स्टारलाइनर रिटर्न व्हेईकलवर प्रोपल्शन समस्यांमुळे परिणाम झाल्यानंतर नासाचे दोन अंतराळवीर नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर (ISS) अडकून पडले होते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleपुतिन यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारासाठी एस. जयशंकर मॉस्कोला भेट देणार
Next articleअमेरिकेच्या ‘गुडबुक्स’मध्ये येण्याचा तालिबानचा प्रयत्न? वाचा सविस्तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here