चिनी विद्यापीठांनी या महिन्यात AI कोर्सेस सुरू केले आहेत, ज्यामध्ये DeepSeek या स्वदेशी स्टार्टअपचा समावेश आहे, ज्याने सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधले असून, कृत्रिम बुद्धिमत्तेमधील चीनचा ‘स्पुतनिक क्षण’ अशी त्याची ओळख बनली आहे.
हा निर्णय, चिनी अधिकाऱ्यांच्या त्या प्रयत्नांचा भाग आहे- ज्यांचा उद्देश शालेय आणि विद्यापीठीय स्तरावर वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानातील नाविन्याला चालना देणे आहे, जे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेसाठी नवीन वाढीचे स्रोत निर्माण करू शकतात.
DeepSeek चा उदय
DeepSeek, हे हंगझोउ शहरातील एक स्टार्टअप आहे, ज्याचे सिलिकॉन व्हॅलीतील कार्यकारी आणि यूएस तंत्रज्ञान कंपनीतील अभियंत्यांनी कौतुक केले आहे. त्यांचा असा दावा आहे की, DeepSeek-V3 आणि DeepSeek-R1 मॉडेल्स OpenAI आणि मेटाच्या सर्वात प्रगत मॉडेल्सच्या तोडीससोड आहेत.
दक्षिणी ग्वांगडोंग प्रांतातील शेनझेन विद्यापीठाने यावेळी सांगितले की, ‘ते DeepSeek वर आधारित एक कृत्रिम बुद्धिमत्ता कोर्स सुरू करत आहे, जो विद्यार्थ्यांना मुख्य तंत्रज्ञान तसेच सुरक्षा, गोपनीयता, नैतिकता आणि इतर आव्हाने शिकण्यास मदत करेल.’
‘हे तंत्रज्ञानातील नाविन्य आणि नैतिक नियमांमध्ये संतुलन कसे साधता येईल हे अन्वेषण करेल,’ असे त्यांनी सांगितले.
चीनमधील झेजियांग विद्यापीठ, जे देशाच्या पूर्वेकडील भागात स्थित आहे, त्यांनी फेब्रुवारी महिन्यापासून विशेष DeepSeek कोर्सेस सुरू केले आहेत.
शांघायच्या जियाओ टोंग विद्यापीठाने, त्यांच्या कोर्सेसमधील AI शिक्षण उपकरणे सुधारण्यासाठी DeepSeek तंत्रज्ञानाचा वापर करण्याची घोषणा केली आहे, असे त्यांनी त्यांच्या अधिकृत वीचॅट अकाउंटवरुन सांगितले.
रेनमिन विद्यापीठाने देखील “अनेक क्षेत्रांमध्ये” DeepSeek चा उपयोग केला असून “शिक्षण आणि संशोधन, कॅम्पस कार्यालयासाठी नवीन शक्ती जोडली आहे,” असे ते म्हणाले.
सशक्त शैक्षणिक राष्ट्र
चीनने जानेवारी 2035 पर्यंत, “सशक्त शैक्षणिक राष्ट्र” निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने त्यांचा पहिला आराखडा पसादर केला आहे, ज्यात असे नमूद केले आहे की, “उच्च दर्जाची शैक्षणिक प्रणाली” स्थापित करणे हा आमचा मुख्य उद्देश असून, ज्यात जगातील सर्वोत्तम प्रवेश योग्यता आणि गुणवत्ता सामाविष्ट असेल.”
DeepSeek चे संस्थापक- लिआंग वेन्फेंग यांची, सोमवारी राष्ट्रपती शी जिनपिंग आणि अलीबाबा सारख्या चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील काही मोठ्या कंपन्यासोबत दुर्मिळ बैठक झाली.
DeepSeek तपासणीच्या फेऱ्यात
काही देशांनी सुरक्षा आणि नैतिकतेच्या चिंतेमुळे, DeepSeek वर बंदी घातली आहे. ज्यात डेटा गोपनीयता, संभाव्य देखरेख आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमता संबंधीचे धोके नमूद केले आहेत.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)