दलाई लामा यांचे थोरले भाऊ- ग्यालो थोंडुप यांच्या निधनाची घोषणा या महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आली. ग्यालो यांनी 40 वर्षे चिनी, भारतीय आणि अमेरिकन लोकांसाठी एक विश्वासू दुवा म्हणून कार्य केले, मात्र प्रसिद्धी झोतात येणे त्यांनी कायम टाळले. तरीही दलाई लामा यांचे भाऊ असल्याकारणाने त्यांच्या नावाची आणि कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली.
हाँगकाँग स्थित साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) ने, लंडनमधील स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजच्या रॉबर्ट बार्नेटचा हवाला देत नमूद केले आहे.
“थोंडुप यांच्या निधनामुळे चीनच्या नेत्यांना त्या बिंदूपर्यंत आणले आहे जिथे तिबेटी, मंगोलियन्स किंवा इतर कोणतेही नॉन-चायनीज नेते जिवंत नाहीत, जे व्यक्तिगतपणे कम्युनिस्ट पार्टीला 1950 च्या दशकात आणि कधीकधी 1970 च्या उत्तरार्धात त्यांनी केलेल्या स्वायत्ततेचे आणि सांस्कृतिक सहिष्णुतेचे वचन आठवू शकतील.”
चीनने ग्यालो थोंडुप यांना तत्कालीन जनरल सेक्रेटरी डेंग शियाओपिंग यांनी दिलेले एक महत्त्वाचे विधान मान्य करण्यास नकार दिला आहे. डेंग यांनी म्हटले होते, “स्वतंत्रतेशिवाय (तिबेटसाठी) सर्व काही चर्चा करता येईल.”
चीनचे म्हणणे आहे की डेंगचे विधान त्यांच्या रेकॉर्डमध्ये नाही आणि चिनी तिबेटविज्ञानी म्हणतात की त्यांचे आर्कायव्हस मध्ये देखील असे काही नाही.
ग्यालो थोंडुप यांनी, तिबेटच्या निर्वासित समुदायामध्ये लोकप्रिय नसलेला एक दृषटिकोन मांडला होता. SCMP ने हाँग काँग विद्यापीठातील प्रोफेसर बॅरी सौटमॅन यांचे उद्धरण देत म्हटले आहे की, थोंडुप यांचा विश्वास होता की, “तिबेट कधीच चीनचा भाग नव्हता” असे तिबेटी निर्वासित कायम ठामपणे सांगत असतात, तितकेच चीनशी संवाद साधण्याच्या दृष्टीने काहीही प्रगती होऊ शकत नाही, यासाठी त्यांना निर्वासितांकडून बाजूला ठेवले गेले.
सॉटमनचा असा युक्तिवाद आहे की वाटाघाटीकडे परत येण्यासाठी दलाई लामा यांना त्यांचे “मूलभूत राजकीय अभिमुखता” बदलणे आवश्यक आहे.
ती विचारसरणी सध्याच्या तिबेटच्या निर्वासित नेतृत्वासाठी अनाठायी आहे. पण दलाई लामांसह हे नेतृत्व गेल्यानंतर काय होईल?
तिबेट निरीक्षकांचे म्हणणे आहे की, बरेच तिबेटी लोक पश्चिमेकडे गेले आहेत, मंदारिनमध्ये चांगले संवाद साधू शकत नाहीत आणि त्यांना बीजिंगशी थेट संबंध ठेवण्याचा अनुभव नाही.
अमेरिकेचे काय? गेल्या जुलैमध्ये यूएसने रिझोल्व्ह तिबेट कायदा पास केला जो पूर्व शर्तीशिवाय, चिनी सरकार आणि दलाई लामा यांच्यातील संवाद आणि तिबेटवर वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याच्या शक्यता सुधारू शकतील अशा क्रियाकलापांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.
हे अन्य कायदे, तिबेट धोरण आणि समर्थन कायदा 2019 आणि तिबेटमधील परस्पर प्रवेश कायदा 2018 च्या नंतर आले आहेत. परंतु चीनला लाज देण्यासाठी तिबेटचा फायदा घेण्याचा प्रयत्न करण्याव्यतिरिक्त, तिबेटसाठी वॉशिंग्टनच्या योजना काय आहेत हे स्पष्ट नाही.
या संदर्भात 2003 मध्ये, रेडिओ फ्री एशियावर थोंडप यांची मुलाखत प्रसारित झाली, जिथे त्यांनी अधोरेखित केले की, अमेरिका किंवा भारत तिबेटचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. किंबहुना, तिबेटच्या स्वातंत्र्याच्या अमेरिकेच्या वचनांवर विसंबून राहिल्याबद्दल थोंडुपला मनापासून खेद झाला.
द नूडल मेकर ऑफ कालिम्पॉन्गच्या त्यांच्या आठवणींमध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे, “माझ्या संपूर्ण आयुष्यात मला फक्त एकच खंत आहे, सीआयएमधील माझा सहभाग..याने फक्त समस्या निर्माण करण्याचा आणि तिबेटींचा वापर करून चीन आणि भारत यांच्यात गैरसमज आणि मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.”