मालदीवमध्ये PM मोदींचे स्वागत; भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन दिवसांच्या मालदीव दौर्‍यावर असून, या भेटीदरम्यान भारत आणि मालदीव यांच्यातील विकासात्मक संबंध बळकट करण्यावर भर दिला जाईल. भारत आणि चीन यांच्यातील प्रादेशिक प्रभावासाठी सुरू असलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण भेट होत आहे.

शुक्रवारी, माले येथे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्जू यांनी, पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. मुईझ्जू यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर त्यांना भेट देणारे मोदी पहिले परदेशी नेते आहेत. मुईझ्जू यांनी 2023 मध्ये सत्तेवर आल्यानंतर, “इंडिया फर्स्ट” धोरण समाप्त करण्याची घोषणा केली होती आणि चीनसोबतचे संबंध अधिक दृढ केले होते.

मुईझ्जू यांच्या या भूमिकेमुळे, मालदीवचे भारतासोबतचे संबंध काही काळासाठी तणावपूर्ण झाले होते. मात्र, मालदीव मधील पर्यटन क्षेत्रात मंदी येत आल्यामुळे आणि त्यांच्या $7.5 अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेवर कर्जफेडीचे संकट निर्माण झाल्यामुळे, भारताने मदतीचा हात पुढे करत मालदीवला डिफॉल्ट होण्यापासून वाचवले.

मैत्री वाढवणे आणि करार सुरक्षित करणे

मुईझ्जू यांनी, भारत आणि चीन या दोन्ही प्रमुख कर्जदात्या देशांच्या भेटी घेत, आर्थिक मदतीसाठी प्रयत्न सुरु केले. तसेच चीन आणि तुर्कीशी व्यापार करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आणि भारतासोबत व्यापार करार आणि गुंतवणूक कराराबाबत चर्चा सुरू केली आहे.

भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, “सातत्यपूर्ण राजनयामुळे द्विपक्षीय संबंध पुन्हा सुधारण्यात यश मिळाले.”

“परस्पर संबंधांवर परिणाम करणाऱ्या किंवा संबंधांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या घटना अनेकदा घडत असतात. मात्र या भेटीवरून असे असे दिसून येते की, या संबंधांकडे सर्वोच्च स्तरावरूनही आवश्यक लक्ष दिले गेले आहे,” असे मिस्री म्हणाले.

मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहीद यांनी रॉयटर्सला सांगितले की, “मोदींच्या भेटीवरून असे दिसते की मुईझ्जू यांनी “पाऊल मागे घेतले असून आणि चुकीचे प्रतिमान दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.”

लाईन ऑफ क्रेडिट

भारत मालदीवला $565 दशलक्ष डॉलरची क्रेडिट लाईन देण्याची शक्यता आहे आणि मुक्त व्यापार करारावर औपचारिक चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी हनीमाधू बेटावरील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराचे दूरस्थपणे उद्घाटन करतील, ज्याला भारत आर्थिक मदत करत आहे आणि शनिवारी मालदीवच्या ब्रिटनपासून स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या समारंभाला देखील उपस्थित राहतील.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleFrom Conflict to Connectivity: How Border Infrastructure Tells the Tale of Two Kashmirs
Next articleIndia-UK तंत्रज्ञान करारामुळे महत्त्वाची खनिजे, सीमावर्ती क्षेत्रांवर लक्ष केंद्रित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here