भारत 5th-Gen लढाऊ विमानांसाठी, फ्रान्ससोबत करार करणार: संरक्षणमंत्री

0

गुरुवारी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले की, भारत आणि फ्रेंच एअरोस्पेस क्षेत्रातील दिग्गज कंपनी Safran सोबत, भारताच्या पाचव्या पिढीच्या ‘अ‍ॅडव्हान्स्ड मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (AMCA) साठी, संयुक्तपणे इंजिन्सची निर्मिती आणि विकास करणार आहेत.

“आज आपण पाचव्या पिढीच्या (5th-Gen) लढाऊ विमानाच्या निर्मितीमध्ये एक मोठे पाऊल उचलले आहे. विमानाचे इंजिन भारतातच तयार करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत,” असे सिंह यांनी X (पूर्वीचे ट्विटर) द्वारे पोस्ट करत सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “फ्रेंच कंपनी साफ्रानसोबत आपण भारतात इंजिन निर्मितीचे काम लवकरच सुरू करणार आहोत.”

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, फ्रेंच कंपनी Safran ने भारतात पुरवठा साखळी आणि उत्पादन सुविधा उभारून, नवे लढाऊ विमान इंजिन डिझाइन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. Safran आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांनी यासाठी एक दशकभराचा रोडमॅप तयार केला आहे. या नवीन इंजिनचा थ्रस्ट 110–120 किलोन्यूटन (kN) दरम्यान असणार असून, ते AMCA च्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये बसवले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट सुरक्षा समिती (CCS) ने गेल्या वर्षी, 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला होता, ज्यात AMCA ची रचना आणि प्रोटोटाइप विकसित करणे समाविष्ट आहे. हे विमान दोन प्रकारांमध्ये तयार केले जाणार असून, त्यामध्ये वेगवेगळ्या थ्रस्ट क्षमता असलेली इंजिने असतील.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, “Safran सोबतचा करार पूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरण (Full ToT), कोणत्याही प्रकारचा निर्यात निर्बंध नसणे, आणि भारताच्या गॅस टर्बाइन रिसर्च इस्टॅब्लिशमेंट (GTRE) सोबत सहयोग या अटींसह होईल. हा करार सरकार दरम्यानचा (G2G) स्वरूपाचा असणार असून, लवकरच चर्चेला सुरुवात होणार आहे.”

सफरान ही कंपनी, राफेल लढाऊ विमानांना सामर्थ्य देणाऱ्या M-88 इंजिन्सची निर्मिती करते आणि तिचे भारताशी आधीपासूनच व्यापक संबंध आहेत. भारतीय हवाई दल (IAF) सध्या 36 राफेल विमानांचा वापर करत असून, नेव्हीने 26 विमानांचा ऑर्डर दिला आहे. सूत्रांनी सांगितले की, IAF साठी आणखी 36 राफेल विमाने घेण्याची शक्यता आहे, जेणेकरून स्क्वॉड्रनची कमतरता भरून काढता येईल.

हेलिकॉप्टर क्षेत्रात Safran आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांनी अ‍ॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टरसाठी इंजिन संयुक्तपणे विकसित केले आहे आणि सुमारे 400 हेलिकॉप्टर्स सेवा देत आहेत. दोन्ही कंपन्या सध्या 13 टन क्षमतेच्या ‘इंडियन मल्टी-रोल हेलिकॉप्टर (IMRH)’ आणि त्याच्या नेव्हल आवृत्ती ‘डेक-बेस्ड मल्टी-रोल हेलिकॉप्टर (DBMRH)’ साठी इंजिन तयार करण्यावर काम करत आहेत. हे हेलिकॉप्टर्स 2027 मध्ये लाँच होणार असून, वयोवृद्ध Mi-17 च्या जागी घेतली जाणार आहेत.

Safran ने, भारतात विविध श्रेणीतील विमान इंजिन उत्पादनासाठी एक संपूर्ण इकोसिस्टम उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. या उपक्रमामुळे भारताची ‘मेक इन इंडिया’ मोहिम मजबूत होईल आणि एअरोस्पेस क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढेल.

मूळ लेखक– रवी शंकर

+ posts
Previous articleIs the End of the Ukraine War in Sight?
Next articleलष्करप्रमुख अल्जेरिया दौऱ्यावर जाणार; द्विपक्षीय लष्करी सहकार्याला चालना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here