भूतानला लष्करी पाठिंबा देण्याचे, राजनाथ सिंह यांचे आश्वासन

0
भूतानला
रॉयल भूतान आर्मीचे मुख्य ऑपरेशन अधिकारी (सीओओ), लेफ्टनंट जनरल बातू शेरिंग यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

रॉयल भूतान आर्मीचे प्रमुख ऑपरेशन्स अधिकारी (COO)- लेफ्टनंट जनरल बटू शेरिंग, यांनी मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सिंह यांनी, भूतानच्या संरक्षण क्षमतांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेची पुनरावृत्ती केली, ज्यामध्ये लष्करी सामग्री आणि साधनांचा पुरवठा समाविष्ट आहे. 2 फेब्रुवारीपासून सहा दिवसांच्या शासकीय दौऱ्याकरता भारतात आलेल्या बटू शेरिंग, यांच्यासोबत झालेल्या विशेष बैठकीमध्ये, सिंह यांनी भूतानला लष्करी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, “राजनाथ सिंह आणि लेफ्टनंट जनरल शेरिंग यांनी द्विपक्षीय संबंधांवरील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. संरक्षण मत्र्यांनी भूतानच्या संरक्षण तयारीला बळकटी देण्यासाठी भारत सहाय्य करणार असल्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली, ज्यामध्ये भूतानच्या राष्ट्रीय प्राधान्यांसोबत, भारताच्या ‘शेजारी प्रथम’ धोरणानुसार, आवश्यक लष्करी उपकरणे आणि साधनांचा समावेश आहे.”

लेफ्टनंट जनरल शेरिंग यांनी, भारताच्या सातत्यपूर्ण समर्थनासाठी आभार व्यक्त केले आणि भूतानच्या संरक्षण क्षमतांची वृद्धी करण्यात तसेच रॉयल भूतान आर्मीच्या (RBA) कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भातील भारताच्या भूमिकेचे कौतुक केले.

लेफ्टनंट जनरल शेरिंग, यांनी त्यांच्या भेटीचा एक भाग म्हणून, सोमवारी भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ- जनरल अनिल चौहान यांची भेट घेतली. त्यांसोबत झालेल्या चर्चेत, प्रादेशिक शांतता आणि संरक्षण सहकार्यावर लक्ष केंद्रित करुन, भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिक दृढ करण्यावर तसेच धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर भर देण्यात आला.

संरक्षण सचिव- राजेश कुमार सिंग यांची देखील त्यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान शेरिंग यांनी सध्या सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला आणि दोन्ही देशांतील धोरणात्मक तसेच सुरक्षा संबंध मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.

लेफ्टनंट जनरल शेरिंग यांच्या भारत भेटीमुळे, भारत आणि भूतान यांच्यातील संरक्षण भागीदारी अधिक दृढ होईल, अशी खात्री वर्तवली जात आहे. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील हे द्विपक्षीय संबंध येणाऱ्या काळात अधिक मजबूत करण्यासाठीच हा विशेष दौरा आयोजित करण्यात आला आहे.


Spread the love
Previous articleDefence Minister Rajnath Singh Assures Support To Bhutan In Military Preparedness
Next articleअमेरिकन निधी थांबल्यास अफगाण महिलांवर परिणाम – युएनचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here