अमेरिकेच्या निर्बंधांनंतरही हुआवेईची एआय चिप 2025 मध्ये बाजारात

0
अमेरिकेच्या

चीनच्या हुआवेईने 2025 च्या पहिल्या तिमाहीत त्याच्या सर्वात प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता चिपचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्याची योजना आखली आहे. अर्थात अमेरिकेच्या निर्बंधांमुळे पुरेशा चिप्स तयार करण्यासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना करावा लागते असल्याचे दोन स्रोतांनी सांगितले.

दूरसंचार समूहाने अमेरिकेच्या एआय चिपमेकर एनव्हीडिया NVDA.O ने बनवलेल्या चिपशी स्पर्धा करण्यासाठी बाजारपेठेत येत असलेल्या त्याच्या सर्वात नवीन चिप एसेंड 910सीचे नमुने काही तंत्रज्ञान कंपन्यांना पाठवले असून ऑर्डर घेण्यास सुरुवात केली आहे, असे स्रोतांनी रॉयटर्सला सांगितले.

हुआवेईवरून मतभेद

व्यापार आणि सुरक्षिततेबाबत अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असणाऱ्या वादाच्या केंद्रस्थानी हुआवेई कंपनी आहे. अमेरिकेने हुआवेई आणि इतर काही चिनी कंपन्यांवर अनेक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेतील चिनी कंपन्यांच्या तांत्रिक प्रगतीमुळे आमच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचा युक्तीवाद अमेरिकेकडून करण्यात आला. आधुनिक सेमीकंडक्टर्समध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे दावे अर्थातच फेटाळून लावले आहेत.

या निर्बंधांमुळे हुआवेईला त्याच्या प्रगत एआय चिप्सचे उत्पादन व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी – चिप्सचे उत्पादन प्रमाण पूर्णपणे कार्यरत आहे – आवश्यक असणारे ग्राहक मिळवण्याच्या क्षमतेत अडथळे निर्माण झाले आहेत.

चीनची आघाडीची कंत्राटी चिप निर्माता कंपनी सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इंटरनॅशनल कॉर्प (एसएमआयसी) 910सीच्या एन + 2वर काम करत आहे! मात्र त्यासाठी लागणाऱ्या आधुनिक लिथोग्राफी उपकरणांच्या कमतरतेमुळे चिपचे उत्पादन सुमारे 20 टक्क्यांपर्यंतच होत असल्याचे एका स्रोताने सांगितले, ज्याला या निर्बंधांमुळे होणाऱ्या परिणामांची माहिती देण्यात आली होती.

आधुनिक चिप व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य होण्यासाठी त्याचे 70 टक्क्यांहून अधिक उत्पादन होणे आवश्यक आहे.

अमेरिकेचा अंकुश

टिकटॉकची चिनी कंपनी, बाईटडान्सने या वर्षी एक लाखाहून अधिक एसेंड 910बी चिप्सची मागणी केली होती, मात्र जुलैपर्यंत कंपनीला 30 हजारांपेक्षा कमी चिप्सचा पुरवठा करण्यात आला. बाईटडान्स कंपनीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक चिप्सचा पुरवठा खूपच संथ गतीने सुरू असल्याची बातमी रॉयटर्सने सप्टेंबरमध्ये दिली होती. हुआवेईकडून मागणी केलेल्या इतर चिनी तंत्रज्ञान कंपन्यांनीही अशाच प्रकारच्या समस्यांची तक्रार केल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेच्या निर्बंधांमुळे 2020 पासून चीनला डच उत्पादक एएसएमएल कंपनीकडून अत्यंत अतिनील लिथोग्राफी (ईयूव्ही) तंत्रज्ञान देण्यावर बंदी घालण्यात आल आहे. हे तंत्रज्ञान जगातील सर्वात अत्याधुनिक प्रोसेसर तयार करण्यासाठी वापरले जाते.

बायडेन प्रशासनाने गेल्या वर्षी लादलेल्या निर्बंधांमुळे एएसएमएलने आपली सर्वात प्रगत डीप अल्ट्राव्हायोलेट लिथोग्राफी (डीयूव्ही) यंत्रे देखील चीनला पाठवणे बंद केले आहे. काही उत्पादकांना जुनी एएसएमएल डीयूव्ही मॉडेल्स खरेदी करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

एसएमआयसी त्याच्या प्रगत नोड्सवर बनवलेल्या चिप्ससाठी 50 टक्क्यांपर्यंत प्रीमियमची मागणी करत आहे. मात्र या चिप्स तैवानच्या प्रसिद्ध अशा  टीएसएमसीच्या चिप्सपेक्षा कमी प्रगत आहेत आणि वर्धित एएसएमएल डीयूव्ही वापरून तयार केल्या जातात. विश्लेषक आणि स्रोतांच्या म्हणण्यानुसार, हुआवेने आपल्या एसएमआयसी निर्मित चिप्समध्ये प्रतिस्पर्धी टीएसएमसीने तयार केलेल्या चिप्सच्या मदतीने आवश्यक ते बदल केले आहे.

अमेरिकन अधिकारी सेमीकंडक्टर उद्योगावर निर्यात नियंत्रण ठेवण्याची योजना आखत आहेत ज्यामुळे चिनी कंपन्यांच्या मालवाहतुकीवर आणखी निर्बंध येतील. 2017 ते 2021 पर्यंत राष्ट्राध्यक्ष असलेले आणि आता जानेवारीत व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा परतणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक अजेंड्याचा गाभाच मुळी चीनवरील कठोर व्यापार धोरणांची केली जाणारी अंमलबजावणी असणार आहे.

अनुकृती
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleChinese Defence Minister Declines Meeting Pentagon Chief
Next articleIndia-Australia Sign Air Refuelling Agreement To Boost Indo-Pacific Defence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here