डीआरडीओ – आयआयटी दिल्लीने तयार केली हलकी बुलेटप्रुफ जॅकेट्स

0
डीआरडीओ
डीआरडीओ आणि आयआयटी दिल्ली यांनी अभेद (ऍडवान्सड बॅलिस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफीट) नावाचे हलके बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केले आहे

डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील वैज्ञानिकांनी आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली येथील संशोधकांच्या सहकार्याने अभेद (ऍडवान्सड बॅलिस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफीट) नामक हलक्या वजनाची बुलेटप्रुफ जॅकेट्स विकसित केली आहेत. ही जॅकेट्स 360 अंशातील संरक्षण देतात.

संरक्षण विभागाकडून बुधवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार जॅकेट्ससाठी वापरण्यात आलेल्या आर्मर प्लेट्सनी नियमावलीनुसार संशोधन आणि विकासविषयक सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. ही जॅकेट्स उच्च पातळीच्या धोक्याला तोंड देऊ शकतात आणि ती भारतीय लष्करातील सामान्य कर्मचारीवर्गासाठी निश्चित केलेल्या गुणात्मक पात्रता निकषांतील कमाल वजन मर्यादेपेक्षा हलकी आहेत.

वेगवेगळ्या बीआयएस स्तरांवर 8.2 किलो आणि 9.5 किलो किमान वजन असलेली ही अत्याधुनिक रचनेची जॅकेट्स पुढच्या आणि मागच्या बाजूसह 360 अंशातील संरक्षण देऊ शकतात असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

आयआयटी दिल्ली या संस्थेतील डीआरडीओ उद्योगविषयक शैक्षणिक उत्कृष्टता केंद्रात (डीआयए-सीओई) ही जॅकेट्स तयार करण्यात आली आहेत. 2022 मध्ये आयआयटी दिल्ली या संस्थेत असलेल्या डीआरडीओच्या संयुक्त प्रगत तंत्रज्ञान केंद्रात बदल घडवून आणून डीआयए-सीओईची उभारणी करण्यात आली होती. पॉलीमर्स आणि स्वदेशी बोरॉन कार्बाईड सिरॅमिक मटेरियलपासून ही जॅकेट्स तयार करण्यात आली आहेत. त्यांच्या रचनेची जुळवणी जास्तीचा ताण सहन करू शकणाऱ्या विविध साहित्यांमध्ये असलेल्या विशिष्ट गुणांवर आधारित आहेत.

निवड-निकष पद्धतीच्या आधारे तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच मार्गदर्शनासाठी काही भारतीय उद्योगांची निवड करण्यात आली. तीन उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासाठी केंद्र सज्ज आहे.

केंद्रीय संरक्षण संशोधन आणि विकास विभाग सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.समीर व्ही.कामत म्हणाले की हलक्या वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट हे डीआरडीओ, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांद्वारे यशस्वी संरक्षण संशोधन आणि विकासाच्या प्रभावी परिसंस्थेचे उदाहरण आहे.

डीआयए-सीओई हे केंद्र आता डीआरडीओ मधील शास्त्रज्ञ, शिक्षण क्षेत्रातील संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांसह प्रगत तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकल्पांवर सक्रियतेने कार्य करत आहे.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleCNS Visits Greece To Boost Naval Ties With Hellenic Navy
Next articleChina’s Nuclear-Powered Submarine Sank, US Claims

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here