DRDO च्या मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट प्रणालीची यशस्वी चाचणी

0
DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टम (MCPS), अर्थात लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीने 32 हजार फूट उंचीवरून कॉम्बॅट फ्रीफॉल जंप यशस्वीपणे पार पाडली. भारतीय हवाई दलाच्या चाचणी जंपर्सद्वारे चाचणी घेण्यात आली.
या कामगिरीमुळे MCPS ही 25 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर तैनात करण्याची क्षमता असलेली भारतीय सशस्त्र दलांद्वारे सध्या कार्यरत असलेली एकमेव पॅराशूट प्रणाली बनली आहे.  स्वदेशी प्रणालीची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि प्रगत डिझाइन यांचे प्रदर्शन यातून घडविण्यात आले.

MCPS , ही प्रणाली DRDO च्या एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, आग्रा (ADRDE) आणि डिफेन्स बायोइंजिनीअरिंग अँड इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरी, बंगळुरू (DEBEL) या प्रयोगशाळांनी विकसित केली असून चाचणी दरम्यान 30 हजार फूट उंचीवर MCPS यशस्वीरित्या तैनात करण्यात आले.”या यशस्वी उडीमुळे प्रणालीची प्रगत रचना, विश्वासार्हता आणि रणनीतिक श्रेष्ठता दिसून आली,” असे ADRDE च्या प्रवक्त्याने सांगितले. “मुख्य वैशिष्ट्यांमध्ये जमिनीवर उतरण्याची कमी शक्यता, सुधारित स्टीअरिंग नियंत्रण आणि भारताच्या उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली, NAVIC शी सुसंगतता यांचा समावेश आहे, ज्यामुळे स्पर्धात्मक वातावरणातही सुरक्षित आणि हस्तक्षेपमुक्त कामगिऱ्या सुनिश्चित होतात.”

याशिवाय पॅराट्रूपर्सना विमानातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी  अनुकुलता, पूर्वनिर्धारित उंचीवर पॅराशूट तैनात करणे, अचूक दिशादर्शन, आणि निर्धारित झोन मध्ये उतरणे, याचा समावेश असल्याचेही प्रवक्त्याने सांगितले. स्वदेशी डिझाइनमुळे देखभालीला मिळणारी जलद गती आणि परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी होण्याची हमी मिळते, ज्याचा युद्धकाळातील कामगिऱ्यांमध्ये एक महत्त्वाचा फायदा आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी प्रात्यक्षिकाबद्दल DRDO, सशस्त्र दल आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले. “भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेमधील हा एक महत्वाचा टप्पा असल्याचे,” त्यांनी नमूद केले.

मंत्रालयाने पुढे नमूद केले की NAVIC उपग्रह प्रणालीशी सुसंगतता MCPS ला एक अद्वितीय कामगिरी बजावण्यासाठी पाठबळ देते, ज्यामुळे बाह्य हस्तक्षेप किंवा शत्रूंकडून सेवा नाकारण्याच्या धोक्यांपासून मुक्तता मिळते. प्रणालीची रचना कमीत कमी देखभाल डाउनटाइमसह जास्तीत जास्त जीवनचक्र उपयुक्तता देखील सक्षम करते, तुलनात्मक आयात केलेल्या उपकरणांपेक्षा चांगली कामगिरी करते.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDO चे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांनी या प्रात्यक्षिकांशी संबंधित DRDO च्या पथकाची प्रशंसा केली असून,”हवाई वितरण प्रणालीच्या क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे.”

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleड्रोन धोक्यांचा सामना करण्यासाठी भारत आणि EU चे संयुक्त प्रशिक्षण
Next articleSwarm Warning: U.S. Faces A New Kind of Air War

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here