DRDO द्वारे तिसऱ्या पिढीच्या पोर्टेबल अँटी-टँक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0
DRDO
डीआरडीओने तिसऱ्या पिढीतील पोर्टेबल अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (DRDO) फिरत्या लक्ष्यावर टॉप-अॅक क्षमतेसह मारा करणाऱ्या, तिसऱ्या पिढीतील ‘फायर अँड फॉरगेट’ मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईल (MPATGM) या टॉप-अटॅक क्षमतेसह क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली. महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील के.के. रेंजमध्ये ही चाचणी पार पडली.

सोमवारी, डीआरडीओने जाहीर केले की, स्वदेशी बनावटीच्या MPATGM मध्ये इमेजिंग इन्फ्रारेड (IIR) होमिंग सीकर, ऑल-इलेक्ट्रिक कंट्रोल अ‍ॅक्ट्युएशन सिस्टम, फायर कंट्रोल सिस्टम, टँडम वॉरहेड, प्रोपल्शन सिस्टम आणि हाय-परफॉर्मन्स साइटिंग सिस्टमसह अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

ही शस्त्रप्रणाली हैद्राबाद येथील डीआरडीओच्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने विकसित केली आहे. हे क्षेपणास्त्र ट्रायपॉड किंवा लष्करी वाहन लाँचरवरून डागले जाऊ शकते. याची प्रभावी मारक क्षमता 4,000 मीटर आहे.

अधिकृत निवेदनानुसार, या प्रणालीचे काही घटक डीआरडीओचे रिसर्च सेंटर, हैद्राबाद; टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी, चंदीगड; हाय एनर्जी मटीरिअल्स रिसर्च लॅबोरेटरी, पुणे; आणि इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, डेहराडून यांनी पुरवले आहेत.

जोधपूरच्या डिफेन्स लॅबोरेटरीने, यांनी टार्गेटेड टँकची प्रतिकृती तयार करण्यासाठी ‘थर्मल टार्गेट सिस्टम’ विकसित केली आहे. IIR सीकर प्रणाली दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेच्या युद्ध मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याचे वॉरहेड आधुनिक मुख्य युद्ध टँक्सचा पराभव करण्यास सक्षम आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे या शस्त्रप्रणालीचे सह-विकास-उत्पादन भागीदार आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ आणि त्यांच्या उद्योग भागीदारांचे अभिनंदन केले असून, आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी सांगितले की, “या चाचणीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य झाले असून, आता ही शस्त्रप्रणाली भारतीय सैन्यात सामाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.”

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleRussia to Deliver Fourth S-400 Air Defence System by May 2026
Next articlePakistan, Indonesia in Advanced Talks on JF-17 Jets, Drones

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here