पीओजेके : ‘कुणाच्यातरी कमकुवतपणा आणि चुकांमुळे ही वेळ आली’ – जयशंकर यांची टीका

0
जयशंकर
प्रातिनिधिक फोटो

पीओजेके (पाकव्याप्त जम्मू-काश्मीर) हा भाग कुणाच्यातरी कमकुवतपणा आणि चुकांमुळे भारताच्या हातातून ‘तात्पुरता निसटला’ आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू किंवा स्वतंत्र भारतात त्यांनी नेतृत्व केलेल्या पहिल्या काँग्रेस सरकारचा कोणताही स्पष्ट उल्लेख न करता त्यांनी हे वक्तव्य केले. नाशिकमधील सार्वजनिक कार्यक्रमात जयशंकर बोलत होते.

यावेळी जर भारताने ‘लक्ष्मण रेषा’ ओलांडली आणि पीओजेकेचे विलीनीकरण झाले तर चीन कशी प्रतिक्रिया देईल? असा प्रश्न जयशंकर यांना विचारण्यात आला.

‘लक्ष्मण रेषा’ नाही

‘लक्ष्मण रेषा’ आहे असे मला वाटत नाही. पीओजेके हा भारताचा भाग आहे, असे जयशंकर म्हणाले. “एका क्षणी, कोणाच्या तरी कमकुवतपणामुळे, कोणाच्या तरी चुकांमुळे, पीओजेके तात्पुरते भारताच्या हातातून निसटले,” असे त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले. “आपल्या संसदेने एकमताने एक ठराव मंजूर केला आहे (1994 मध्ये जेव्हा पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते) की पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेला प्रदेश भारण परत घेईल,” असेही जयशंकर म्हणाले.

भारतच सार्वभौम दावेदार

चीनमधील भारताचे राजदूत म्हणून आपला कार्यकाळ कसा होता याबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत हा पीओजेकेचा सार्वभौम दावेदार आहे. पीओजेके हा त्यांचा भाग आहे असे पाकिस्तान म्हणत नाही किंवा चीनही त्यांचा भाग असल्याचा दावा करत नाही.

1963 मध्ये, दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सीमा कराराचा एक भाग म्हणून पाकिस्तानने सुमारे 5 हजार चौरस किलोमीटरचा व्याप्त प्रदेश (शक्सगाम खोरे) चीनकडे सुपूर्द केला. हा प्रदेश भारत किंवा पाकिस्तानकडे गेला तरी चीन अखेरीस त्याचा आदरच करेल, असेही त्या करारात म्हटले आहे, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.

“तिथला भूभाग वादग्रस्त आहे पण कोणीतरी त्यावर कब्जा केला आहे आणि माझ्याकडे (भारताकडे) त्याचा कायदेशीर हक्क असला तरी तिथे इमारती बांधण्यास सुरुवात झाली आहे.”

कलम 370 रद्द झाल्यानंतर लोक पीओजेकेच्या मुद्द्यावर अधिक जागरूक झाले आहेत, असा दावा जयशंकर यांनी केला. “10 वर्षांपूर्वी कोणीही याबद्दल (पीओजेके) बोलत नव्हते. पण आता लोकांना वाटते की जे उरले आहे ते पूर्ण करण्याचे धाडस फक्त या सरकारमध्ये आहे.” त्यांच्या या वक्तव्यावर प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.
अलीकडच्या काळात पीओजेकेमध्ये सातत्याने होणाऱ्या निदर्शनांमध्ये वाढ झाली आहे. मुख्य वस्तूंच्या वाढत्या किंमती आणि विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याबद्दल तिथल्या रहिवाशांची तक्रार आहे. त्याचवेळी अनेकांना आश्चर्य वाटते की जम्मू-काश्मीरमध्ये कुंपणाच्या दुसऱ्या बाजूला गवत प्रत्यक्षात कसे हिरवेगार आहे. (सीमेच्या त्या भागात म्हणजे जम्मू काश्मीरमधील लोकांना या सगळ्या गोष्टी कशा कमी किंमतीत आणि मुबलक प्रमाणात मिळतात याचे पीओजेकेमधील नागरिकांना आश्चर्य वाटते)

सुब्रत नंदा


Spread the love
Previous articleत्रिपक्षीय सागरी सुरक्षा कार्यशाळेचा कोचीत समारोप
Next articleकिर्गिझस्तानमधील हिंसाचारानंतर भारतीयांना सांभाळून राहण्याचा सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here