इक्वेडोर: राष्ट्राध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक आणि गोळीबार, पाच जणांना अटक

0
मंगळवारी इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांच्या मोटार ताफ्यावर दगडफेक करत जमावाने हल्ला केला. मात्र यातून ते सुरक्षितपणे बचावले. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. एका वरिष्ठ मंत्र्यांनी हा हत्येचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे कारण अध्यक्षांच्या वाहनावर गोळीबार झाल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या.

पर्यावरण आणि ऊर्जा मंत्री इनेस मंझानो यांनी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या प्रयत्नाची औपचारिक तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की नोबोआ यांच्या मोटार ताफ्यावर सुमारे 500 निदर्शकांनी दगडफेक केल्यानंतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

नोबोआ यांच्या कार्यालयाने सांगितले की अटक केलेल्यांवर दहशतवाद आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाईल. गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्षांनी इंधन अनुदान रद्द केल्याच्या निषेधार्थ झालेल्या या निदर्शनादरम्यान राष्ट्राध्यक्षांच्या गाडीवर गोळी झाडण्यात आली होती की नाही याची पडताळणी करता आली नाही.

नोबोआ यांनी केला हल्ल्याचा निषेध

हल्ला झालेल्या ठिकाणापासून सुमारे 77 किमी (48 मैल) दक्षिणेस असलेल्या कुएन्का येथील एका विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात बोलताना नोबोआ म्हणाले की त्यांचे सरकार अशा कृती सहन करणार नाही.

“तुमच्यासोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापासून आम्हाला रोखू इच्छिणाऱ्या आणि आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या वाईट उदाहरणाचे अनुसरण करू नका,” असे म्हणत, “नवीन इक्वेडोरमध्ये असे हल्ले स्वीकारले जाणार नाहीत आणि कायदा सर्वांना लागू होतो,” अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.

“राष्ट्राध्यक्षांच्या गाडीवर गोळीबार करणे, दगडफेक करणे, राज्य मालमत्तेचे नुकसान करणे – ही फक्त गुन्हेगारी आहे,” असे मंझानो यांनी अभियोक्त्यांना हल्ल्याची माहिती दिल्यानंतर सांगितले. “आम्ही हे होऊ देणार नाही.”

मात्र, राष्ट्रीय आदिवासी महासंघ कोनाएईने म्हटले आहे की नोबोआ यांच्या आगमनासाठी जमलेल्या लोकांविरुद्ध सुनियोजितपणे हा हिंसाचार करण्यात आला आहे, “क्रूर पोलिस आणि लष्करी कारवाईत” वृद्ध महिलांवर हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“आमच्यापैकी किमान पाच जणांना मनमानीपणे ताब्यात घेण्यात आले आहे,” असे एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे, ज्यामध्ये पारंपरिक पोशाखातील एका महिलेला  अंगावर काळ्या पट्ट्यांनी झाकलेल्या, अंगावर चिलखत घातलेले चार पोलिस अधिकारी मार्च करून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समाविष्ट आहे.

आदेशाविरोधात निदर्शने

डिझेल अनुदान बंद करण्याच्या सरकारच्या निषेधार्थ कोनाएने 16 दिवसांपूर्वी संप सुरू केला, मोर्चे आयोजित केले आणि काही ठिकाणी रास्ता रोको केले. टीकाकारांचे म्हणणे आहे की या प्रकरणी आणखी संवाद आवश्यक आहे आणि या उपाययोजनामुळे विशेषतः लहान शेतकरी आणि आदिवासी समुदायांसाठी राहणीमानाचा दैनंदिन खर्च वाढेल.

नोबोआ यांनी सप्टेंबरच्या मध्यात अनुदान रद्द करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आणि त्यांच्या सरकारने सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक प्रांतांमध्ये आपत्कालीन उपाययोजना जाहीर केल्या.

सरकारने अनुदान बंद करण्याच्या निर्णयाचा बचाव केला आहे. यामुळे दरवर्षी सुमारे 1.1 अब्ज डॉलर्सची बचत होईल असे म्हटले आहे जे त्यांनी आधीच लहान शेतकरी आणि वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भरपाई देयकांमध्ये पुनर्वितरण करण्यास सुरुवात केली आहे.

एप्रिलमध्ये पुन्हा निवडून आलेले नोबोआ यांनी सुरक्षेसाठी असणाऱ्या त्यांच्या कठोर गुन्हेगारीला शिक्षा देण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाचा भाग म्हणून सशस्त्र दल आणि पोलिसांना वारंवार आपत्कालीन अधिकार दिले आहेत.

संरक्षण मंत्री जियान कार्लो लोफ्रेडो यांनी खराब झालेल्या कारच्या बाहेर उभे असलेल्या 37 वर्षीय नोबोआ यांचा गॉगल  घातलेला फोटो शेअर केला आहे.

“या राष्ट्राध्यक्षांना कोणीही थांबवू शकत नाही, त्यामुळे देशही  थांबवणार नाही याचा हा उत्तम संकेत आहे,” असे ते म्हणाले.

राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने प्रकाशित केलेल्या कारच्या आतील व्हिडिओमध्ये लोक रस्त्याच्या कडेला दगडफेक करताना आणि कारच्या खिडकीला तडे जाताना दिसत आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने प्रकाशित केलेल्या वेगळ्या फोटोंमध्ये तुटलेल्या खिडक्या आणि विंडस्क्रीन असलेली कार दाखवण्यात आली आहे.

कोस्टा रिका, होंडुरास आणि पनामा यासह काही देशांनी या हल्ल्याचा निषेध केला.

एका वेगळ्या कार्यक्रमात, मंगळवारी संध्याकाळी राजधानी क्विटोमध्ये सुमारे 200 लोक नोबोआ सरकारच्या विरोधात निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. पोलिसांनी मोर्चा पुढे जाण्यापासून रोखला आणि गर्दी शांततेने पांगली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारताशी फक्त व्यापार करार, व्हिसा कराराचा आत्ता विचार नाही: स्टारमर
Next articleBRO at Work: Development of Third Axis to Ladakh, Securing India’s Crown

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here