युरोपियन कमिशन रशिया आणि बेलारूसच्या सीमांवर पाळत ठेवण्यासाठी अधिक गुंतवणूक करणार असल्याचे संकेत बुधवारी दिले गेले आहे. युरोपियन युनियनमधील (EU) सदस्य देश “hybrid war” द्वारे सीमेवरील स्थलांतरितांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप रशियाने केला आहे.
पोलंड आणि फिनलंडसह इतर देशांना इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवण्याची उपकरणे अद्ययावत करण्यासाठी, दूरसंचार जाळे सुधारण्यासाठी, भ्रमणध्वनी शोध उपकरणे तैनात करण्यासाठी आणि ड्रोन घुसखोरी रोखण्यासाठी अतिरिक्त 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दिले जातील, असे निवेदनात म्हटले आहे.
सीरिया आणि सोमालियासारख्या देशांतील स्थलांतरितांना सीमा ओलांडण्यास रशियान प्रोत्साहित केल्याचा आरोप फिनलंडने केला आहे. अर्थातच मॉस्कोने हा आरोप फेटाळून लावला आहे.
स्थलांतरितांना युरोपमध्ये अनधिकृत मार्गाने येऊ देण्याची घोषणा बेलारूसने केल्याबद्दल पोलंडने चिंता व्यक्त केली आहे. बेलारूसने हे आरोप नाकारले आहेत.
आयोगाच्या सुरक्षाविषयक विभागाच्या नव्या कार्यकारी उपाध्यक्षा हेना विर्कुनेन म्हणाल्या की युरोपच्या सीमेवरील परिस्थिती “अतिशय गंभीर” आहे.
युरोपियन युनियनविरुद्धच्या hybrid war मध्ये रशिया स्थलांतरितांचा शस्त्रास्त्रांचे एक नवीन साधन म्हणून वापर करत असल्याचे म्हटले आहे. आपण कोणत्याही शत्रू राष्ट्राला आश्रय देण्याच्या अधिकारासह युरोपियन मूल्यांचा गैरवापर करू देता कामा नये,” असे त्या म्हणाल्या.
युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन म्हणाल्या की, फिनलंड, पोलंड, नॉर्वे तसेच बाल्टिक देश “रशिया आणि बेलारूसमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या धोक्यांपासून आपल्या सीमा धैर्याने सुरक्षित ठेवत आहेत.”
युक्रेन युद्धापासून ते नाटो विरोधी डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परत येण्यापर्यंतच्या प्रकरणांवर इशारा दिल्याने पोलंड युरोपियन युनियनच्या अध्यक्षपदाच्या काळात संयुक्त संरक्षण वित्तपुरवठ्याला प्राधान्य देईल, असे अर्थमंत्री आंद्रेज डोमान्स्की यांनी सांगितले. पोलंड जानेवारीमध्ये EU चे फिरते सहा महिन्यांचे नेतृत्व स्वीकारणार आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे आणि संरक्षणावर जीडीपीच्या किमान 2 टक्के खर्च केल्याशिवाय युरोपियन राष्ट्राला मदत न करण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीमुळे युरोपियन युनियनची सदस्य राष्ट्रे, त्यांच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेसह, संरक्षण खर्च वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पुढील 10 वर्षांत EU अंतर्गत संरक्षण व्यवस्था वाढवण्यासाठी 500 अब्ज युरो किंवा त्याहून अधिक खर्चाचा अंदाज EUने वर्तवला आहे. यासोबतच संरक्षण आयुक्तांचे नवीन पद तयार केले आहे.
युरोपीय महासंघाचे अर्थमंत्री एप्रिलमध्ये वॉर्सा येथे संभाव्य वित्तपुरवठा मॉडेल्सवर चर्चा करतील, असे डोमांस्की यांनी सांगितले.
यासाठी किती पैशाची गरज आहे हे न सांगता, त्यांनी नमूद केले की युरोपियन हवाई संरक्षण प्रणालीसारखे मोठे प्रकल्प केवळ पैशासाठीच नव्हे तर राष्ट्रांमधील सहकार्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरले आहेत.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)