युरोपने युक्रेनच्या लष्करी सहाय्यासाठी रशियाच्या गोठवलेल्या माालमत्तेतून पैसे वापरावेत आणि संरक्षण खर्च वाढवण्यावर भर देत, आपल्या वित्तीय नियमांमध्ये शिथिलता आणावी, असा सल्ला Czech Republic चे पंतप्रधान– पेटर फियाला यांनी दिला.
सोमवारी, राष्ट्राला उद्देशून केलेल्या एका भाषणात फियाला म्हणाले की, “झेक संरक्षण खर्च 2024 मधील सुमारे 2% च्या तुलनेत, पुढील अनेक वर्षांत सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% पर्यंत वाढला पाहिजे, जेणेकरून नवीन भू-राजकीय वास्तव प्रतिबिंबित होईल.”
“अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची त्याची गती, आवाका आणि परिणाम निश्चितपणे समाधानकारक आहेत, मात्र अमेरिकेने युरोपवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशापासून दूर जाण्याने आम्हाला आश्चर्य वाटू नये,” असे फियाला टेलिव्हिजनद्वारे प्रसारित आपल्या भाषणात म्हणाले.
“एक मजबूत युरोप, जो रशियाला सार्वभौम युरोपीय राज्यांवरील पुढील लष्करी हल्ल्यांपासून परावृत्त करू शकतो, असा युरोप निर्माण करणे, हे आता आमचे मूलभूत उद्दिष्ट असायला हवे,” असे ते म्हणाले.
‘युरोपने संरक्षणासाठी वित्तपुरवठा वाढवावा आणि आपले वित्तीय नियम शिथिल करावेत. तसेच त्यांच्या कोरोनानंतरच्या पुनर्प्राप्ती निधीतील ९३ अब्ज युरो (९७.४२ अब्ज डॉलर) संरक्षण आणि संबंधित पायाभूत सुविधांसाठी वापरावेत,’ असा सल्ला त्यांनी दिला.
“युक्रेनच्या अतिरिक्त लष्करी सहाय्यासाठी, आपल्याला संपूर्ण युरोपमधून गोठवलेल्या रशियाच्या मालमत्तांमधील पैसे वापरावे लागतील,” असेही ते म्हणाले.
‘या संकटामुळे, युरोपियन युनियनला गेल्या 20 वर्षांतील युतीपेक्षा अधिक महत्त्वाची युती बनवण्याची गरज होती,’ असे फियाला यावेळी म्हणाले. ‘परंतु यशस्वी होण्यासाठी आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी, EU ला त्यांच्या ग्रीन डील डिकार्बोनायझेशन धोरणांना नियंत्रणमुक्त करण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)