युक्रेनमध्ये भविष्यात शांतता करार लागू करण्यासाठी, अमेरिकेकडून सैन्य पुरवठा करण्याच्या मागण्यांना सामोरे जात असताना, युरोप स्वतः अडचणीत सापडले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, युक्रेनमध्ये युरोपीय शांतता रक्षक पाठविणे, हे NATO (North Atlantic Treaty Organization) च्या स्वतःच्या संरक्षणाला अडचणीत टाकू शकते. युक्रेनमधील शांतता सुनिश्चित करण्यासाठीच्या या मिशनला, U.S. च्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
अमेरिकन सैन्याच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नसली तरी, यू.एस. च्या मध्यम-श्रेणीच्या क्षेपणास्त्रांच्या स्वरूपात आणि अखेरीस आण्विक शस्त्रास्त्रांच्या स्वरुपात, त्यांची निवारक शक्ती महत्त्वाची राहील.
“पुतिनसारख्या आक्रमक आणि राष्ट्रीयवादी नेत्याला रोखण्यासाठी देण्यात येणारी कोणतीही सुरक्षेची हमी, ही 100% विश्वासार्ह मानता येणार नाही जोपर्यंत यात अमेरिकेचा सहभाग नसेल,” असे ब्रिटनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्क लाइल ग्रँट यांनी सांगितले.
युरोपीय अधिकारी देखील म्हणतात की, “फक्त अमेरिकेचे आश्वासनच युरोपीय शांतता रक्षकांचे संरक्षण करू शकते आणि रशियाला युक्रेनवर हल्ला करण्यापासून रोखू शकते.”
गेल्या आठवड्यात, यू.एस. चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी रशियासोबत द्विपक्षीय शांतता चर्चासत्र आयोजित केले होते, जे मंगळवारी रियाधमध्ये सुरू झाले. यावेळी संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सांगितले की, “कोणतीही सुरक्षा हमी, सक्षम युरोपीय आणि गैर-युरोपीय सैनिकांनी समर्थित असावी.” युक्रेनमध्ये अमेरिकन सैन्य पाठवले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोमवारी पॅरिसमधील आपत्कालीन बैठकीत, ‘युक्रेनमध्ये शांतता रक्षक पाठवण्याच्या कल्पनेवर’, युरोपीय नेत्यांमध्ये मतभेद दिसून आले. काही युरोपीय देशांनी गेल्यावर्षी, या योजनेतील फ्रांसच्या पुढाकारावर चर्चा सुरू केली होती.
अशी सैन्यदले पाठवल्यामुळे, रशियाशी थेट संघर्ष होण्याचा धोका वाढू शकतो आणि युरोपीय लष्करांवर ताण येऊ शकतो, ज्यांचे शस्त्रास्त्र साठे युक्रेनला मदत म्हणून दिल्यामुळे आधीच कमी झाले आहेत आणि जे मोठ्या मिशनसाठी यू.एस.च्या मदतीवर अवलंबून आहेत.
सोमवारी, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सांगितले की, ‘ते युक्रेनमध्ये सैनिक पाठवायला तयार आहेत, पण त्यासाठी यू.एस.चा “पाठींबा” असण्याची गरज आहे.’
तज्ञांचे म्हणणे आहे की, ‘युक्रेनमध्ये मोठे युरोपीय सैन्य पाठवणे नाटोच्या संरक्षणाला कमजोर करू शकते, कारण संघर्ष थांबल्यास रशियाच्या युद्ध-आर्थिक क्षमतेचे जलद पुनर्निर्माण होईल आणि मोठा धोका निर्माण होईल.’
काहीजण शंका घेत आहेत की, ‘युरोपीय देश, जे कोल्ड वॉरनंतर अनेक दशकांपासून शांततेत राहिले आहेत, ते जलद गतीने लढाईसाठी सैन्य उभे करू शकतील का? विशेषत: जेव्हा त्यांना रशिया आणि मॉस्कोचा मित्र देश बेलारूससोबत 2,000 किलोमीटरच्या सीमारेषेचे संरक्षण करण्यास सांगितले जाईल.’
जर्मन SWP थिंक टँकच्या विश्लेषक क्लॉडिया मेजर म्हणाल्या की, “युरोपीय देशांना असे शांतता रक्षक सैन्य तयार करणे फारच कठीण आहे. याकरता युरोपीय देशांना युक्रेनच्या सैन्याव्यतिरिक्त, 40,000 ते 1 लाख 50,000 सैनिकांची आवश्यकता भासू शकते.” जर्मन प्रसारक ARD शी बोलताना त्यांनी हे सांगितले.
“तुलना करायची झाल्यास, 1999 मध्ये नाटोचा शांतता करार कोसोवोमध्ये 48,000 सैनिकांसह सुरू झाला होता, जो 11,000 चौरस किलोमीटर क्षेत्राचे संरक्षण करत होता, मग युक्रेनचे क्षेत्रफळ तर यापेक्षा 55 पट मोठे आहे, त्यानुसार विचार केला गेला पाहिजे,” असंही त्या म्हणाल्या.
“युरोपीय देशांकडे सध्या इतके सैन्य एकत्रित करण्याची क्षमता नाही, जोपर्यंत एकरत ते त्यांचे स्वतःचे संरक्षण किंवा बाल्टिक प्रदेशाचे संरक्षण कमी करत नाहीत, जे करणे स्पष्टपणे वादग्रस्त ठरेल,” असे मेजर यांनी यावेळी नमूद केले.
“याशिवाय, युरोपीय देशांकडे रिसर्च, हवाई संरक्षण किंवा लक्ष्य निर्धारण क्षेत्रात आवश्यक असलेली क्षमताही नाही, जी सध्या केवळ यू.एस. कडे पुरेशा प्रमाणात आहे,” असेही त्या पुढे म्हणाल्या.
कार्नेगी एंडॉमेंटचे वरिष्ठ सहकारी- मायकेल कोफमन यांनी सांगितले की, “एकाच वेळी तीन ब्रिगेड, ज्यामध्ये प्रत्येकी 3,000 ते 5,000 सैनिक असतील, त्यांची आवश्यकता, जिथे लढाई सुरु आहे तिथल्या चार ते पाच फ्रंट सेक्टरसाठी भासू शकते.”
“सध्याच्या सैन्याची संख्या तीन पटीने वाढवून 50,000 पर्यंत पोहोचू शकते, परंतु सध्याच्या सर्व क्षेत्रीय संरक्षण योजना रद्द न करता ही वाढ करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले.
“परंतु या सैन्याने त्वरित वॉर फ्रंट जवळ यावे, पश्चिम युक्रेनमध्ये प्रशिक्षणात वेळ घालवत बसू नये,” अशी चेतावनी देत, कोफमन यांनी ‘लष्करी युनिट्सना गतिशील असणे खूप आवश्यक आहे,’ असेही सांगितले.
“हा एक मोठा प्रश्न आहे की, सैन्य फ्रंटवर कसे काम करेल आणि ते कसे निवारक ठरेल?” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
काही तज्ञ, युक्रेनच्या सैन्यांना, संपर्क रेषेचे संरक्षण करण्याचा पर्याय सुचवतात आणि बाह्य निवारक साधने ठेवण्याची शिफारस करतात.
हेगसेथ यांनी स्पष्टपणे सांगितले नाही की, “शांतता रक्षक सैन्य युक्रेनमध्ये तैनात असावे, पण त्यांनी हेही स्पष्ट केले की हे सैन्य नाटोच्या अंतर्गत संरक्षण कलम- आर्टिकल 5, द्वारे संरक्षित असणार नाहीत.”
तथापि, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह, यांनी मंगळवारी रियाधमध्ये पत्रकारांना सांगितले की, “युक्रेनमध्ये नाटो सदस्य देशांचे कोणतेही सैनिक असणे रशियासाठी स्वीकारार्ह नाही, ते कोणतेही ध्वजाचे प्रतिनिधीत्व करत असले तरीही..”
परंतु युक्रेनच्या बाहेर निवारक ताकद पुरवणे, युरोपीय देशांसाठी अतिरिक्त अडचण निर्माण करू शकते. कारण त्यांच्याकडे मध्यम-श्रेणीची शस्त्रास्त्रे नाहीत, जी रशियन लक्ष्यांवर लांबून निशाणा साधू शकतात आणि त्यांच्या युद्ध विराम उल्लंघनाला प्रत्युत्तर देऊ शकतात.
त्यांच्याकडे, रशियासारख्या आण्विक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या देशाच्या विरोधात अंतिम निवारक ठरणारे, यू.एस. चे आण्विक शस्त्रसाठे देखील नाहीत.
टीम भारतशक्ती