लिबियाच्या माजी हुकूमशहाचा मुलगा सैफ अल-इस्लामची हत्या

0
सैफ
सशस्त्र घुसखोरांनी घरात घुसून सैफ अल-इस्लामची गोळ्या घालून हत्या केली

लिबियाचा सैफ अल-इस्लाम गद्दाफी हा त्याच्या कुप्रसिद्ध वडिलांचा संभाव्य वारसदार होता, मात्र दिवस फिरल्यानंतर त्याला दुर्गम डोंगराळ शहरात एक दशकाहून अधिक काळ कैदेत आणि अज्ञातवासात राहावे लागले. त्यानंतर त्याने राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे नियोजित निवडणूक प्रक्रिया विस्कळीत झाली.

सैफ अल-इस्लामच्या कार्यालयाने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की, त्याच्या घरात घुसलेल्या चार अज्ञात बंदूकधाऱ्यांशी झालेल्या “थेट संघर्षात” त्याचा मृत्यू झाला.

लिबियाच्या ॲटर्नी जनरलच्या कार्यालयाने सांगितले की, तपासकर्त्यांनी आणि फॉरेन्सिक डॉक्टरांनी सैफ अल-इस्लामच्या मृतदेहाची तपासणी केली आणि तो गोळ्या लागून झालेल्य जखमांमुळेच मरण पावल्याचे निश्चित केले. तसेच, कार्यालय संशयितांची ओळख पटवण्याचे काम करत असल्याचे सांगितले जात आहे.

कोणतेही अधिकृत पद नसतानाही, 53 वर्षीय सैफ अल-इस्लामला एकेकाळी तेल-समृद्ध उत्तर आफ्रिकन देशात त्याचे वडील मुअम्मर गद्दाफी, ज्यांनी चार दशकांहून अधिक काळ राज्य केले, त्यांच्या नंतर सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून पाहिले जात होते.

सैफ अल-इस्लामने अनेक धोरणे आखली आणि उच्च-स्तरीय, संवेदनशील राजनैतिक मोहिमांमध्ये मध्यस्थी देखील केली. लिबियाने आपली सामूहिक संहाराची शस्त्रे सोडून देण्याबाबतच्या चर्चेचे नेतृत्व देखील त्याने केले आणि 1988 मध्ये स्कॉटलंडमधील लॉकरबी येथे पॅन ॲम फ्लाइट 103 च्या बॉम्बस्फोटात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी नुकसानभरपाई बाबत वाटाघाटी केल्या.

लिबियाला जगातील एकाकी देशाच्या दर्जातून बाहेर काढण्याचा निर्धार करून, त्याने पाश्चात्य देशांशी संबंध प्रस्थापित केले आणि स्वतःला एक सुधारक म्हणून जगासमोर सादर केले, तसेच संविधानाचा आणि मानवी हक्कांचा आदर व्हावा अशी मागणी देखील केली.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलेला आणि अस्खलित इंग्रजी बोलणारा, सैफ अल-इस्लाम एकेकाळी अनेक सरकारांच्या दृष्टीने लिबियाचा स्वीकारार्ह, पाश्चात्य-स्नेही चेहरा होता.

मात्र 2011 मध्ये गडाफीच्या दीर्घ राजवटीविरुद्ध बंडखोरी सुरू झाल्यावर, सैफ अल-इस्लामने आपल्या मैत्रींपेक्षा कुटुंब आणि कुळाशी असलेल्या निष्ठेला प्राधान्य दिले आणि बंडखोरांवर करण्यात आलेल्या क्रूर कारवाईचा तो सूत्रधार बनला. या बंडखोरांना  तो ‘उंदीर’ म्हणत असे.

बंडाच्या वेळी रॉयटर्सशी बोलताना तो म्हणाला होता: “आम्ही येथे लिबियामध्ये लढणार, आम्ही येथे लिबियामध्येच मरणार”

त्याने इशारा दिला की, रक्ताच्या नद्या वाहतील आणि सरकार शेवटच्या पुरुष, स्त्री आणि गोळीपर्यंत लढेल.

“संपूर्ण लिबिया नष्ट होईल. देश कसा चालवायचा यावर करार करण्यासाठी आम्हाला 40 वर्षे लागतील, कारण आज प्रत्येकजण राष्ट्राध्यक्ष किंवा अमीर बनू इच्छितो आणि प्रत्येकाला देश चालवायचा आहे,” असे तो एका टीव्ही प्रसारणात कॅमेऱ्याकडे बोट दाखवत म्हणाला होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleसामरिक सीमावर्ती पायाभूत सुविधांसाठी BRO च्या निधीत वाढ
Next articlePrivate Heavyweights Battle for India’s Fifth-Gen Fighter; HAL Eliminated

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here