हमासने ओलिसांचे फुटेजचे प्रसारण केल्यानंतर गाझा शहरावर जोरदार हल्ला

0
शुक्रवारी, हमासने ऑक्टोबर 2023 च्या संगीत महोत्सवादरम्यान घेतलेल्या दोन इस्रायली ओलिसांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यामध्ये एकाने असे म्हटले आहे की त्यांना गाझा शहरात ठेवण्यात आले आहे. दहशतवादी गट हमासला संपवण्याच्या उद्देशाने केलेल्या तीव्र इस्रायली लष्करी हल्ल्याचे केंद्रबिंदू म्हणजे गाझा शहर आहे.

गाय गिल्बोआ-दलाल आणि अलोन ओहेल हे गाझामध्ये हमासच्या अजूनही ताब्यात असलेल्या 48 ओलिसांपैकी दोघे आहेत. या 48 ओलिसांपैकी 20 अजूनही जिवंत असल्याचे मानले जाते.

2023 मध्ये दक्षिण इस्रायली समुदायांवर सीमा ओलांडून हल्ला झाल्यानंतर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी 251 ओलिसांना एन्क्लेव्हमध्ये नेले होते. या हल्ल्यात  सुमारे 1 हजार 200 लोक मारले गेले आणि युद्धाला सुरूवात झाली. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये आतापर्यंत 64 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. एन्क्लेव्हचा बहुतेक भाग उध्वस्त झाला आहे आणि तेथील रहिवाशांना अनेक मानवतावादी संकटांचा सामना करावा लागत आहे.

इस्रायलच्या हल्ल्याविरुद्ध संदेश

हा व्हिडिओ संपादित करण्यात आला असून आणि त्यात थकलेले गिल्बोआ-दलाल सुमारे साडेतीन मिनिटे बोलत असल्याचे दाखवण्यात आले होते. 28 ऑगस्टच्या व्हिडिओच्या काही भागात तो एका कारमध्ये दिसत आहे. रॉयटर्सला हा व्हिडिओ कधी रेकॉर्ड केला गेला याची खातरजमा कळता आलेली नाही.

तो म्हणतो की त्याला इतर अनेक ओलिसांसह गाझा शहरात ठेवण्यात आले आहे आणि इस्रायलच्या शहरावरील हल्ल्यात तो मारला जाईल अशी त्याला भीती आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गेल्या महिन्यात लष्कराला गाझाचे सर्वात मोठे शहरी केंद्र, गाझा शहर ताब्यात घेण्याचे आदेश दिले आणि सरकार ज्याला हमासचा शेवटचा बालेकिल्ला म्हणते त्यावर हल्ला केला. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले की तआता शहराच्या सुमारे 40 टक्के भागावर लष्कराचे नियंत्रण आहे.  युद्धापूर्वी सुमारे दहा लाख लोक तिथे राहत होते. गाझाच्या सुमारे 75 टक्के भागावर लष्कराचे नियंत्रण आहे.

इस्रायलचा हल्ला

शुक्रवारी इस्रायली सैन्याने शहराच्या पश्चिमेकडील एका उंच इमारतीवर बॉम्बहल्ला केला, ज्याचा वापर हमास करत असल्याचे म्हटले. या हल्ल्याबाबत नागरिकांना आधीच इशारा देण्यात आला होता. लष्कराने या इमारतीचा वापर अतिरेक्यांकडून केला जात असल्याचा कोणताही पुरावा दिला नाही.

इमारतीच्या व्यवस्थापनाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की ती इमारत युद्धामुळे विस्थापित पॅलेस्टिनींसाठी वापरली जात होती, परंतु नागरी कारणांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी ती वापरली जात नव्हती हे नाकारले.

इमारतीवर बॉम्ब आदळल्याचा क्षण फुटेजमध्ये दिसून आला, धडक दिल्यानंतर काही क्षणातच ती कोसळली आणि पॅलेस्टिनींना आश्रय देणाऱ्या जवळच्या तंबू छावण्यांवर धुराचे लोट पसरले.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, शुक्रवारी संपूर्ण गाझात सैन्याने 30 पॅलेस्टिनींना ठार मारले, ज्यात 20 जण गाझा शहरातील होते.

लष्कराने काही आठवड्यांपासून शहरावर जोरदार हल्ले सुरू केले आहेत, सैन्य बाह्य उपनगरांमधून पुढे जात असून या आठवड्यात सैन्य शहराच्या मध्यभागापासून काही किलोमीटर अंतर लांब होते.

‘युद्धविरामासाठी प्रार्थना करा’

गाझा शहरातील शेख रदवान परिसरातील दोन मुलांचे वडील इस्माइल यांनी इस्रायली सैन्याने केलेल्या प्रचंड गोळीबार आणि शक्तिशाली स्फोटांचे वर्णन केले. त्यांनी रॉयटर्सला सांगितले की त्यांच्या कुटुंबाला भीती होती की जर त्यांना तिथून पळायला लागले तर आपण परत गाझात येऊ शकणार नाहीत.

“आम्ही युद्धविरामासाठी प्रार्थना करतो,” असे त्यांनी फोनवरून सांगितले.

व्हिडिओमध्ये, 24 वर्षीय गिल्बोआ-दलाल एका कारच्या मागच्या सीटवर असल्याचे दिसते जी रस्त्यावरून जात होती. कार इमारतींजवळून जात असताना, त्यांनी ती रेड क्रॉसची बिल्डींग असल्याचे ओळखले. हमासने रेड क्रॉसला ओलिसांना भेटण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे.

एका ठिकाणी, 24 वर्षीय ओहेल देखील दिसत आहे.

‘क्रूर प्रचार’

फेब्रुवारीमध्ये एका व्हिडिओमध्ये गिल्बोआ-दलाल याला तात्पुरत्या युद्धबंदी अंतर्गत इतर ओलिसांना मुक्त करताना पाहण्यास भाग पाडले जात असल्याचे दिसून आले होते. अशाच व्हिडिओंमध्ये चित्रित झालेल्या आणि त्यानंतर सुटका झालेल्या ओलिसांनी म्हटले आहे की त्यांच्या अपहरणकर्त्यांनी त्यांना काय बोलायचे हे सांगितले होते.

ह्युमन राईट्स वॉचने हमास आणि गाझामधील आणखी एका दहशतवादी गटाला ओलिसांचे व्हिडिओ प्रसिद्ध केल्याबद्दल निषेध केला आहे आणि त्याला युद्ध गुन्ह्यासारखे अमानवी वर्तन म्हटले आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी या व्हिडिओंचे वर्णन मानसिक युद्ध असे केले आहे.

नेतान्याहू यांनी शुक्रवारी म्हटले आहे की हा “क्रूर प्रचार” आहे.

ओलिसांची सुटका करण्यासाठी हजारो इस्रायलींनी आठवड्याला निदर्शने केली आहेत आणि युद्ध संपवण्याची मागणी केली आहे. ओलिसांना बंदिवान बनवल्यापासून 700 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त शुक्रवारी तेल अवीवमधील सार्वजनिक चौकात शेकडो लोक जमले होते.

व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर, इस्रायली विरोधी पक्षनेते यायर लापिड यांनी इस्रायली वाटाघाटीकर्त्यांना ओलिसांना सुरक्षित करण्यासाठी करारावर पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले. आतापर्यंत ज्यांची सुटका झाली ती अमेरिका आणि अरब राष्ट्रांच्या मध्यस्थीने झालेल्या राजनैतिक वाटाघाटींमुळे झाली होती, परंतु चर्चेचा शेवटचा टप्पा जुलैमध्ये रद्द झाली.

दुसरीकडे, अतिउजव्या विचारसरणीचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-ग्वीर म्हणाले की, इस्रायलने गाझावर पूर्णपणे ताबा मिळवून प्रत्युत्तर द्यावे.

युद्धाच्या विस्तारासाठी इशारा

इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या लष्करी नेतृत्वाने नेतन्याहू यांना युद्धाचा विस्तार करण्याविरुद्ध इशारा दिला आहे. इस्रायली ओलिसांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या समर्थकांना भीती आहे की या हल्ल्यामुळे बंदिवानांना धोका निर्माण होऊ शकतो.

हमासने तात्पुरत्या युद्धबंदीसाठी काही ओलिसांना सोडण्याचे म्हटले आहे. नेतान्याहू हमासने सर्व ओलिसांना सोडण्यासाठी आणि आत्मसमर्पण करण्यासाठी पूर्णपणे किंवा लहानसा करार करण्याचा आग्रह धरत आहेत.

संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी शुक्रवारी सांगितले की, हमास युद्ध संपवण्यासाठी इस्रायलच्या अटी स्वीकारत नाही तोपर्यंत लष्करी कारवाई तीव्र केली जाईल: ओलिसांना सोडा आणि नि:शस्त्रीकरण करा. अन्यथा, गट नष्ट केला जाईल, असे ते म्हणाले.

युद्ध संपवण्याच्या आणि इस्रायलच्या माघारीच्या बदल्यात सर्व ओलिसांना सोडण्याची ऑफर दहशतवादी गटाने बऱ्याच काळापासून दिली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleट्रम्प यांनी 2026 च्या G20 शिखर परिषदेसाठी, आलिशान रिसॉर्टची केली निवड
Next articleभू-राजकीय संतुलन: मॉस्कोमध्ये भारत, पाकिस्तान, चीन यांचा लष्करी सराव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here