गाझा फ्लोटिलाने नोंदवली संदिग्ध जहाजांची हालचाल, सुरक्षिततेचा इशारा जारी

0

गाझामध्ये मदत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या, आंतराष्ट्रीय फ्लोटिलाने बुधवारी असे सांगितले की, त्यांच्या बोटींजवळून काही अज्ञात जहाजे संदिग्ध पद्धतीने गेली. त्यातील काही जहाजे तर दिवे न लावता अंधारात तशीच पुढे सरकत होती. 

ग्लोबल सुमूद फ्लोटिलानी टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, ‘ती अज्ञात जहाजे आता निघून गेली असली तरी, संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सहभागी सदस्यांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने लागू केल्या आहेत.’

इटलीने नौदल ताफ्याला माघारी बोलावले

मंगळवारी, इटलीच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की, गाझाच्या दिशने निघालेल्या फ्लोटिलाला मिळणारी नौदल सुरक्षा मागे घेतली जाईल. सुरक्षा ताफा 150 नॉटिकल मैल (278 किमी) अंतरावर पोहचल्यानंतर पुन्हा माघारी फिरेल. इस्रायलकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे, इटलीच्या नौदलाने सांगितले.

ही ‘ग्लोबल सुमूद फ्लोटिला’ म्हणजे 40 हून अधिक नागरी बोटींचा एक समूह आहे, ज्यामध्ये स्थानिक खासदार, त्यांचे कार्यकर्ते, वकील या सर्वांचा समावेश आहे. इस्रायलने गाझावर जी दीर्घकालीन नाकाबंदी लादली आहे, त्याला आव्हान देणे, हा फ्लोटिलाचा उद्देश आहे.

यासंबंधी संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फ्लोटिला जेव्हा 150 नॉटिकल मैलाच्या हद्दीत पोहचेल, तेव्हा इटालियन जहाजे त्यांना सुरक्षा पुरवणे थांबवतील. गेल्या काही दिवसांपासून हा इशारा वारंवार देण्यात आला होता.

फ्लोटिलाच्या सध्याच्या गतीनुसार, अंदाजे मध्यरात्री 00.00 GMT च्या सुमारास, तो नौदलाच्या तैनाती जहाजाला याबाबत दुसरा आणि अंतिम इशारा देईल.

राजनैतिक तणाव टाळण्यासाठी इशारा

मंगळवारी, फ्लोटिलाच्या इटालियन प्रवक्त्या मारिया एलेना डेलिया यांनी सांगितले की, “फ्लोटिलावर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती देण्यात आली असून, पुढे जाऊन इस्रायलसोबत राजनैतिक तणाव निर्माण होऊ नये, याकरिता नौदल सुरक्षा ताफा माघारी बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

मात्र, दुसरीकडे डेलिया यांनी स्पष्टपणे सांगितले की, “फ्लोटालावरील कार्यकर्ते इटलीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून किनाऱ्याच्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे.”

मागील आठवड्यात, ग्रीसजवळील आंतरराष्ट्रीय समुद्र हद्दीमध्ये फ्लोटालावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये स्टन ग्रेनेड्स आणि अश्रूधुराचा वापर केले गेला होता. त्यानंतर इटली आणि स्पेनने फ्लोटिलाला मदत करण्यासाठी आपल्या नौदल जहाजांचा ताफ तैनात केला होता. मात्र, यामागे त्यांचे कोणतेही लष्करी उद्दिष्ट नव्हते.

“कार्यकर्ते पुन्हा एका संभाव्य हल्ल्याची तयारी करत आहेत,” असे डेलिया यांनी सांगितले.

“आज रात्री इस्रायलआमच्यावर हल्ला करू शकतो, कारण त्यादृष्टीने इशारा करणारे सर्व संकेत आम्हाला आतापर्यंत मिळाले आहेत,” असे डेलिया यांनी इन्स्टाग्रामवरील आपल्या एका व्हिडिओत म्हटले आहे.

इस्रायलने, गेल्या आठवड्यातील हल्ल्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही. मात्र, त्यांनी हे स्पष्ट केले आहे की, ‘गाझामध्ये कोणतीही मदत पोहोचवू दिली जाणार नाही आणि जर कुणी तसा प्रतत्न करत असेल, तर त्यांना थांबवण्यासाठी सर्व मार्गांचा वापर केला जाईल.”

त्यांच्यामते, गाझावरील ही नाकाबंदी म्हणजे हमासच्या अतिरेक्यांविरुद्धच्या युद्धाचात एक भाग आहे.

इटलीचे संरक्षणमंत्री गुइडो क्रोसेट्टो यांनी स्पष्टपणे सांगितले की,”फ्लोटीलामधील सर्व बोटींना समुद्रातच अडवले जाईल आणि त्यावर उपस्थित कार्यकर्त्यांना कदाचिक अटकही केली जाईल.”

मंगळवारी, क्रोसेट्टो यांनी फ्लोटिलावरील सदस्यांना अखेरचे आवाहन सांगितले की: “गाझाऐवजी ही सर्व मदत सायप्रसमध्ये उतरवावी आणि इस्रायलसोबतचा संघर्ष टाळावा. मात्र, फ्लोटिला प्रतिनिधींनी या प्रस्तावांना वारंवार नाकारले.

7 ऑक्टोबर 2023, इस्रायलने जेव्हा आपले गाझा अभियान सुरू केले. ‘ही तीच तारीख आहे, जेव्हा हामासच्या नेतृत्वाखालील हल्ल्यात इस्रायलमध्ये सुमारे 1,200 लोक ठार झाले आणि 251 लोकांना ओलीस ठेवण्यात आले,’ असा दावा इस्रायली सरकारचा दावा आहे. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने सुरू केलेल्या हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांमध्ये, गाझामधील 66 हजारांहून अधिक फिलिस्तिनी नागरिक ठार झाल्याचा दावा, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचौथे GE इंजिन HAL कडे सुपूर्द, मात्र तेजस जेटच्या वितरणात विलंब
Next articleचीनच्या K-Visa प्रकरणावरुन, सोशल मीडियावर चीनींचा भारतीयांविरुद्ध संताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here