अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी मंगळवारी जॉर्डनचे राजे- अब्दुल्ला यांची भेट घेतली, जी एक तणावपूर्ण भेट असल्याचे म्हटले जात आहे. गाझा पुनर्विकासाचा ट्रम्प यांचा प्रस्ताव आणि जर जॉर्डनने पॅलेस्टिनी लोकांचे पुनर्वसन करण्यास नकार दिला, तर अमेरिकेने जॉर्डनला मदत थांबवण्याबाबत दिलेली धमकी, हे या भेटीतीली मुख्य मुद्दे होते.
ट्रम्प यांनी एका आठवड्यापूर्वी मांडलेल्या प्रस्तावात, ‘अमेरिका गाझावर ताबा घेऊ इच्छित आहे आणि शरणार्थी नागरिकांना स्थलांतरित करुन, युद्धाने बरबाद झालेल्या भूमीला “मध्य पूर्वेतील रिव्हिएरा” मध्ये रूपांतर करु इच्छिते,’ असे नमूद केले होते. त्यांच्या या घोषणेवर जगभरातून आणि विशेषत: अरब राज्यातून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट, हमास यांच्यातील नाजूक युद्धविरामासह, संवेदनशील प्रादेशिक गतिशीलतेमध्ये ट्रम्प यांच्या या प्रस्तावाने नवीन जटिलता आणली आहे.
सोमवारी हमासने एका निवेदनात सांगितले की, ते गाझाहून इस्रायली बंधकांची सोडवणूक पुढील सूचनेपर्यंत थांबवत आहेत, कारण इस्रायल गाझावरील हल्ले थांबविण्याच्या कराराचे उल्लंघन करत आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी हमासला 7 ऑक्टोबर 2023 रोजी, उरलेले सर्व बंधक सोडण्यास सांगितले, आणि तसे न केल्या अमेरिका युद्धविराम रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवेल असेही सांगितले.
राजा अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले आहे की, ‘त्यांनी जमीन जोडण्याचा आणि पॅलेस्टिनी लोकांचे विस्थापन करण्याच्या कोणत्याही हालचालींना नकार दिला आहे.’ ते मंगळवारच्या भेटीत ट्रम्प यांना हे सांगणे अपेक्षित आहे की, ‘हालचालीमुळे कट्टरतावाद वाढू शकतो, प्रदेशात अराजकता पसरू शकते, इस्रायलमधील शांतता धोक्यात येऊ शकते आणि देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.’
त्यांच्या बाजूने, ट्रम्प यांनी आपल्या प्रारंभिक प्रस्तावातील काही मुद्द्यांमध्ये बदल केले आहेत आणि इतर मुद्द्यांवर मात्र ते ठाम राहिले आहेत. त्यांनी अरब नेत्यांबद्दल वाढती असहिष्णुता भेटीदरम्यान व्यक्त केली, ज्यांना हा विचार अव्यवहार्य वाटतो.
”माझ्या मते, राजा अब्दुल्ला निर्वासितांना स्वीकारतील,” असे ट्रम्प यांनी सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले.
जॉर्डन आणि इजिप्त यांनी तसे करण्यास नकार दिल्यास ते मदत रोखतील का असे विचारले असता,हो, कदाचित, नक्कीच, का नाही.. जर ते सहमत नसतील तर मी मदत रोखू शकेन,” अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली.