‘Hinduphobia’ बाबत विधेयक मांडणारे जॉर्जिया पहिले अमेरिकन राज्य

0
जॉर्जिया

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ‘Hinduphobia’ आणि हिंदू विरोधी पूर्वग्रहांना औपचारिक मान्यता देणारे विधेयक मांडणारे जॉर्जिया हे अमेरिकेचे पहिले राज्य ठरले आहे.

जर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर जॉर्जियामधील दंड संहिता अद्ययावत केली जाईल आणि परिणामी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना Hinduphobia बाबत विचार करण्यास आणि त्यावर योग्य कारवाई करण्यास सक्षम केले जाईल, असे विऑन न्यूजने म्हटले आहे.

भारतीय वंशाच्या खासदारांनी देशातील हिंदू-द्वेषाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केल्यामुळे हे विधेयक मांडणे महत्त्वाचे ठरले आहे.

4 एप्रिलचे एसबी 375 हे विधेयक जॉर्जियाच्या सर्वसाधारण सभेत, राज्य विधिमंडळात मांडण्यात आले आणि त्याच्या प्रायोजकांमध्ये डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन या दोघांचाही समावेश आहे, असे विऑनने सांगितले.

जॉर्जिया राज्य सिनेटचे सदस्य रिपब्लिकन शॉन स्टिल आणि क्लिंट डिक्सन, तसेच डेमोक्रॅटिक जेसन एस्टेव्हस आणि इमॅन्युएल जोन्स हे या विधेयकाचे चार प्रायोजक आहेत.

समर्थक गटाकडून स्वागत

द कोॲलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका (CoHNA) नावाच्या समर्थक गटाने या निर्णयाचे स्वागत केले असून भविष्यात हे विधेयक मंजूर झाल्यास इतिहास घडणार असल्याचे सांगितले.

या गटाने एक्स हँडलवर लिहिलेः “जॉर्जिया राज्याने एसबी 375 सादर केले आहे, जे Hinduphobia आणि हिंदूविरोधी पूर्वग्रह ओळखण्यासाठी राज्याच्या दंड संहितेत औपचारिकरित्या सुधारणा करते तसेच कायदा अंमलबजावणी आणि इतर संस्थांना अशा भेदभावाची यादी करताना, त्यावर योग्य कारवाई करताना Hinduphobia बद्दल विचार करण्यास सक्षम करेल.”

“या महत्त्वाच्या विधेयकावर सेनेटर @SenShawnStill यांच्या सोबत काम केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि जॉर्जिया  तसेच अमेरिकेतील हिंदू समुदायाच्या गरजांना पाठिंबा दिल्याबद्दल सेनेटर @emanueldjones, सिनेटर @jasonesteves आणि सिनेटर @VoteClintDixon यांच्यासह त्यांचे आभार मानतो,” असे गटाने म्हटले आहे.

“या महत्त्वाच्या उपक्रमाच्या नेतृत्वासाठी आम्ही जॉर्जिया पीएसीच्या हिंदूंचेही आभार मानतो,” असे एक्स हँडलवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, “एसबी 375 हे एप्रिल 2023 मध्ये आम्ही सुरू केलेल्या महत्त्वाच्या कामावर आधारित आहे, जेव्हा जॉर्जिया आणि त्यापलीकडे हिंदूंच्या सकारात्मक योगदानाचा उत्सव साजरा करताना Hinduphobia आणि हिंदूविरोधी धर्मांधतेचा निषेध करणारा काउंटी ठराव मंजूर करणारे जॉर्जिया हे पहिले राज्य ठरले.”

जॉर्जिया विधिमंडळाचे अधिवेशन पुन्हा सुरू झाल्यानंतर ते या विधेयकाचे समर्थन करण्यास उत्सुक असल्याचे समर्थक गटाने सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleपहिल्या AIKEYME 2025 सरावासाठी नौदल प्रमुख टांझानिया दौऱ्यावर
Next articleपाकिस्तान सीमेवरील भारताच्या सज्जतेचा लष्करप्रमुखांनी घेतला आढावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here