H-1B व्हिसासंबधी गोंधळादरम्यान, कर्मचाऱ्यांची अमेरिकेत परतण्याची घाई

0

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी नवीन व्हिसा शुल्क लागू केल्यानंतर, H-1B व्हिसाधारक भारतीय आणि चिनी कर्मचारी/कामगारांनी, तात्काळ अमेरिकेला परतण्यासाठी धावपळ सुरू केली. ट्रम्प यांच्या व्यापक स्थलांतर सुधारणांचा (Immigration Reforms) भाग असलेल्या या निर्णयामुळे, अनेकांनी आपले प्रवासाचे बेत अर्धवट सोडून दिले. या घोषणेमुळे सगळीकडेच गोंधळाचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

तंत्रज्ञान कंपन्या आणि बँकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना पाठवल्या आहेत, ज्यामध्ये त्यांना येत्या रविवारच्या अंतिम मुदतीपूर्वी अमेरिकेत परत येण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तसेच देशाबाहेर प्रवास न करण्याचे निर्देश दिले आहेत.

शनिवारी, व्हाईट हाऊसमधील एका अधिकाऱ्याने खुलासा केला की, “हा आदेश फक्त नवीन अर्जदारांना लागू आहे, विद्यमान व्हिसा धारकांना किंवा नूतनीकरण करू इच्छिणाऱ्यांना नाही. यामुळे काही प्रमाणात गोंधळ कमी झाला.”

मात्र, त्याच्या एक दिवस आधीच, ट्रम्प यांच्या या घोषणेने पूर्ण सिलिकॉन व्हॅलीमध्ये धोक्याची घंटा वाजली होती.

अमेरिकेत परतण्यासाठी धावपळ

व्हिसासंबंधी नवीन नियम लागू झाल्यानंतर आपल्याला पुन्हा प्रवेश मिळणार नाही, या भीतीने सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर अनेक भारतीय नागरिकांनी आपली सुट्टी अर्धवट सोडून दिल्याचे सूत्रांद्वारे समजले.

एका मोठ्या टेक कंपनीतील अभियंत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “ही अशी परिस्थिती आहे, जिथे आम्हाला कुटुंबासोबत राहणे किंवा इथेच राहणे यापैकी एकाची निवड करावी लागली.” त्यांच्या पत्नी एमिरेट्सच्या फ्लाईटने सॅन फ्रान्सिस्कोहून दुबईला जात होत्या. शुक्रवारी संध्याकाळी 5:05 वाजता हे विमान निघणार होते, मात्र ट्रम्प यांच्या आदेशाची किंवा कंपन्यांच्या मेमोची माहिती मिळाल्यानंतर, काही भारतीय प्रवाशांनी विमानातून खाली उतरण्याची मागणी केली. त्यामुळे हे विमान तीन तासांपेक्षा जास्तवेळ थांबले.

त्या अभियंत्याने सांगितले की, “कमीतकमी पाच प्रवाशांना अखेर उतरण्याची परवानगी देण्यात आली.” या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होता, ज्यामध्ये काही लोक विमानातून बाहेर पडताना दिसत होते.

त्यांच्या पत्नी, ज्या स्वतः H-1B व्हिसा धारक आहेत, त्यांनी आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी भारतात जाण्याचा निर्णय घेतला.

‘Rednote’ नावाच्या लोकप्रिय चिनी सोशल मीडिया ॲपवर, H-1B व्हिसा धारकांनी अमेरिकेला परतण्यासाठी सुरू केलेली धावपळ शेअर केली. काही कर्मचाऱ्यांना तर चीन किंवा इतर देशांमध्ये पोहोचल्यानंतर काही तासांतच परत फिरावे लागले.

“माझ्या सध्याच्या भावना म्हणजे निराशा, दुःख आणि चिंतेचे मिश्रण आहे,” असे एका महिलेने “Emily’s Life in NY” या यूजर हँडलसह पोस्ट केले.

या महिलेने सांगितले की, “ती न्यूयॉर्कहून पॅरिससाठी युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात चढली होती. विमान धावपट्टीवर जाण्यासाठी सुरू झाले होते, पण एअरलाइनसोबत काही वेळ चर्चा केल्यानंतर, कॅप्टनने तिला विमानातून उतरवण्यासाठी परत गेटवर येण्यास सहमती दर्शविली.”

भीती आणि गोंधळ

तिने सांगितले की, “कंपनीच्या वकिलांनी परदेशातील कर्मचाऱ्यांना अमेरिकेत परतण्यास सांगणारे पत्र पाठवल्यानंतर, तिला ‘हादरून गेल्यासारखे’ वाटले. त्यामुळे तिने फ्रान्समधील तिचा प्रवास रद्द केला, आणि मित्रांसोबतचे (जे चीनहून येत होते) बेत सोडून दिले.”

ॲमेझॉन, अल्फाबेट आणि गोल्डमन सॅक्ससह अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तातडीने प्रवासाचे दिशानिर्देश देणारे ईमेल पाठवले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शनिवारपर्यंत परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतर ॲमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले की, ज्यांच्याकडे आधीपासून H-1B व्हिसा आहे, त्यांना काहीही करण्याची गरज नाही. सुट्टीच्या वेळेत ॲमेझॉनकडून प्रतिक्रियेसाठी केलेल्या विनंतीला लगेच उत्तर मिळाले नाही.’

सीबीसच्या “Face the Nation” कार्यक्रमात उपअध्यक्ष गॅरी कॉन यांनी सांगितले की, रविवारपर्यंत काही प्रमाणात भीती कमी झाली होती.

कॉन म्हणाले, “मला वाटते की या निर्णयामुळे वीकेंडमध्ये लोकांमध्ये खूप घबराट पसरली होती, कारण लोकांना H-1B व्हिसाच्या स्थितीबद्दल खात्री नव्हती. वीकेंडमध्ये ही स्थिती स्पष्ट झाल्यामुळे आता सिस्टममध्ये कोणतीही घबराट नाही.”

कॉन यांनी या निर्णयाचे कौतुक केले आणि ते अर्थव्यवस्थेसाठी चांगले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “जर तुम्हाला अमेरिकेतील H-1B व्हिसा प्रोग्राम समजला असेल, तर मला खऱ्या अर्थाने वाटते की हा एक चांगला निर्णय आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, हा एक लॉटरी सिस्टिम होता.”

नेटफ्लिक्सचे अध्यक्ष रीड हेस्टिंग्स यांनीही, नवीन धोरणाचे समर्थन केले. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, “यामुळे लॉटरीची गरज संपेल आणि ज्यांना H-1B व्हिसा मिळेल, त्यांना अधिक निश्चितता मिळेल. यावर नेटफ्लिक्सकडून लगेच कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध नव्हती.”

ट्रम्प यांचा H-1B व्हिसावर ‘यू-टर्न’

जानेवारीमध्ये पदभार स्वीकारल्यापासून, ट्रम्प यांनी काही कायदेशीर स्थलांतरणांवर निर्बंध घालण्यासह, स्थलांतरणावर व्यापक कारवाई सुरू केली आहे.

H-1B व्हिसा कार्यक्रमात बदल करण्याचे हे पाऊल, त्यांच्या प्रशासनाचे तात्पुरत्या कामासंदर्भातीस व्हिसावर नियंत्रण मिळवण्याचे सर्वात मोठे प्रयत्न दर्शवते. तसेच, यामुळे ट्रम्प यांचा संरक्षणवादी अजेंडा स्पष्ट होतो, असे समीक्षकांचे म्हणणे आहे.

ट्रम्प यांच्या पूर्वीच्या भूमिकेपासून, हा त्यांनीच घेतलेला एक ‘यू-टर्न’ आहे. पूर्वी त्यांनी त्यांचे एकेकाळचे सहयोगी आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांच्यासोबत H-1B व्हिसाच्या वापराबाबतच्या सार्वजनिक वादामध्ये मस्क यांची बाजू घेतली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, “काही समर्थकांचा विरोध असूनही ते परदेशी टेक कर्मचाऱ्यांसाठी या कार्यक्रमाला पूर्ण पाठिंबा देतात.”

ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “कंपन्या या व्हिसाचा वापर वेतन कमी ठेवण्यासाठी करतात, आणि यामध्ये कपात केल्यास अमेरिकन टेक कर्मचाऱ्यांसाठी अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील. या कार्यक्रमाचे समर्थक असा युक्तिवाद करतात की, तो उच्च-कुशल कामगार आणतो, जे कौशल्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि कंपन्यांना स्पर्धात्मक ठेवण्यासाठी आवश्यक आहेत.”

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर, सोशल मीडियावर या आदेशाच्या व्याप्तीवर आणि या निर्णयामुळे अमेरिकेची कामाच्या ठिकाण म्हणून असलेली आकर्षकता कमी झाल्याबद्दल मोठा वादविवाद सुरू झाला.

‘फास्ट अँड फ्युरियस’

Rednote वरील एका अज्ञात यूजरने सांगितले की, त्यांचे जीवन “H-1B गुलामासारखे” झाले आहे. या व्यक्तीने टोकियोमधील आपली सुट्टी अर्धवट सोडून अमेरिकेला परतण्यासाठी धावपळ सुरू केली आणि या अनुभवाचे वर्णन “अमेरिकेला परत येण्यासाठीची एक वास्तविक ‘फास्ट अँड फ्युरियस’ रेस” असे केले. ‘फास्ट अँड फ्युरियस’ ही स्ट्रीट रेसिंगवर आधारित प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपट मालिका आहे.

ट्रम्प यांच्या H-1B घोषणेमध्ये म्हटले होते की: “काही कंपन्यानी H-1B कायद्याचा आणि त्याच्या नियमांचा गैरवापर केला आहे, ज्यामुळे वेतन कृत्रिमरित्या कमी ठेवले गेले आहे. याचा परिणाम अमेरिकेच्या नागरिकांसाठी एक हानिकारक श्रम बाजार म्हणून झाला आहे.ठछ

या घोषणेनुसार, गृहसुरक्षा मंत्री क्रिस्टी नोम यांना त्यांच्या विवेकबुद्धीनुसार अर्जदारांना शुल्कातून सूट देण्याचा अधिकार असेल.

शुक्रवारी, वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनीक म्हणाले की, “कंपन्यांना H-1B कामगारांसाठी दरवर्षी $100,000 द्यावे लागतील.”

मात्र, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लीव्हिट यांनी शनिवारी X वर पोस्ट केले की, “हे वार्षिक शुल्क नाही, तर प्रत्येक अर्जासाठी फक्त एक-वेळ शुल्क आहे.”

Nvidia कंपनीतील एका अभियंत्याने, जो गेल्या 10 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहे, सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर सांगितले की, “ही बातमी ऐकल्यानंतर तो आपली पत्नी आणि बाळासोबत जपानमधील सुट्टी अर्धवट सोडून परत येण्यासाठी धावला.”

तो म्हणाला की, “हे सगळे अविश्वसनीय वाटते. सर्व काही क्षणात बदलत आहे.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndian Navy Chief’s Colombo Visit Signals Push for Stronger Indian Ocean Security Ties
Next articleपॅलेस्टिनीच्या स्वतंत्र राज्य मान्यतेसाठी, फ्रान्स आणि सौदी अरेबियाचा पुढाकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here