तेजस Mk1A साठीचे पाचवे GE F404 इंजिन HAL कडे सुपूर्द, उत्पादनाला गती

0
तेजस Mk1A
तेजस Mk1A साठीचे पाचवे GE F404 इंजिन HAL ला मिळाले.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला, GE एअरोस्पेसकडून नुकतेच पाचवे F404-IN20 जेट इंजिन प्राप्त झाले, ज्यामुळे भारतीय हवाई दलाच्या, LCA तेजस Mk1A च्या उत्पादनाला गती देण्याच्या दिशेने, एक नवीन पाऊल टाकले गेले आहे.

हे वितरण, HAL ने 99 F404-GE-IN20 इंजिन्स आणि संबंधित सहाय्यता सेवांसाठी 2021 मध्ये केलेल्या, 716 दशलक्ष डॉलर्स किमचीच्या ऑर्डरचा भाग आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये GE ने चौथे इंजिन सुपूर्द केले होते.

GE एअरोस्पेसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “2021 मधील ऑर्डरनुसार, त्यांनी पाचवे F404-IN20 इंजिन HAL कडे सुपूर्द केले आहे. F404 इंजिनांसाठीच्या उत्पादन वेळापत्रकात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी जीई एअरोस्पेस आणि HAL एकत्रितपणे काम करत आहेत.”

GE ने यापूर्वी, 2029 पर्यंत सर्व 99 इंजिनस्चे वितरण पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे या कार्यक्रमाला बराच विलंब झाला आहे, ज्यामुळे तेजस Mk1A च्या उत्पादनाची गती सध्या मंदावली आहे.

बॅकलॉग असूनही, HAL ने गेल्या महिन्यात, भविष्यातील तेजस विमानांची ताकद वाढवण्यासाठी, 113 अतिरिक्त F404 इंजिन्ससाठी GE सोबत एक मोठा करार केला आहे. या नव्या करारामध्ये, इंजिन्सचे वितरण 2027 मध्ये सुरू होऊन, 2032 पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तेजस Mk1A हे, भारताच्या स्वदेशी लढाऊ विमानाचा सर्वात प्रगत प्रकार आहे, ज्यात AESA रडार, रडार चेतावणी आणि स्व-संरक्षण जॅमिंगसह, सुधारित इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, डिजिटल नकाशा जनरेटर, स्मार्ट मल्टीफंक्शन डिस्प्ले, संयुक्त इंटरॉगेटर आणि ट्रान्सपोंडर (CIT) आणि एक प्रगत रेडिओ अल्टिमीटर, यांसारख्या अन्य सुधारित प्रणालींचा समावेश आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndia-Russia Defence Ties Enter New Phase: From Buyer-Seller to Joint Developers of Military Hardware
Next articleशांतता प्रस्थापनेत स्वत:ची भूमिका नसलेल्या युद्धाला युरोप कंटाळला आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here