गेल्या आठवड्यात तेहरानमध्ये हत्या झालेल्या माजी राजकीय प्रमुख इस्माईल हनियेहचा उत्तराधिकारी म्हणून हमासने आपला गाझा नेता याह्या सिनवार याची निवड केली आहे.
ही निवड म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर कट्टरपंथी मार्ग अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने उचललेले पाऊल आहे.
हनियेहचा उत्तराधिकारी बनलेला सिनवार (वय वर्षे 61) या दशकात इस्रायलवर झालेल्या सर्वात विनाशकारी हल्ल्याचा मास्टरमाईंड असून तो गाझामध्ये लपून बसला आहे.
मात्र युद्धाच्या सुरुवातीपासून सिनवारला मारण्याचे इस्रायली प्रयत्न अजून तरी यशस्वी झालेले नाहीत.
हमासचे विधान
“इस्लामिक रेझिस्टन्स मूव्हमेंट हमासने चळवळीचे राजकीय ब्युरो प्रमुख म्हणून कमांडर याह्या सिनवार यांची निवड जाहीर केली आहे,” अशी घोषणा एका संक्षिप्त निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
त्यात असेही म्हटले आहे की सिनवर शहीद कमांडर इस्माईल हनियेहची जागा घेईल. “अल्लाह त्याच्यावर दया करो,” असेही निवेदनात म्हटले आहे.
बातम्यांवर प्रतिक्रिया
हनीहच्या हत्येनंतर इस्रायल प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असताना ही बातमी आली आहे.
मुत्सद्दींचे स्पष्टीकरण
एका मुत्सद्दींच्या म्हणण्यानुसार, “या नियुक्तीचा अर्थ असा आहे की गाझा युद्धावर तोडगा काढण्यासाठी इस्रायलला आता सिनवारसोबत चर्चेला सामोरे जावे लागेल.”
या चर्चेचा उद्देश गाझामधील लढाई थांबवणे आणि इस्रायली तसेच परदेशी ओलिसांना परत आणणे हा आहे.
“या संदेशातून कठोरतेबरोबरच तो कोणतीही तडजोड करणार नाही असेच प्रतिध्वनित होते.”
इस्रायलने हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही
इस्रायलने हनियेहच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र आपण इतर वरिष्ठ नेत्यांची हत्या केल्याच्या आरोपाला दुजोरा दिला आहे. यामध्ये हमासचा उपनेता सालेह अल-अरोरी आणि चळवळीचा लष्करी कमांडर मोहम्मद डेफ यांचा समावेश आहे.
सिनवरच्या आयुष्यावर एक नजर
आपले अर्धे आयुष्य इस्रायली तुरुंगात घालवणारा सिनवर हा हनियेहच्या हत्येनंतर जिवंत राहिलेला हमासचा सर्वात शक्तिशाली नेता आहे. त्याचा जन्म दक्षिण गाझा शहरातील खान युनूस येथील निर्वासित छावणीत झाला. 2017 मध्ये गाझात हमासचा नेते म्हणून सिनवार याची निवड झाली.
त्यानंतर अल्पावधीत, निर्णयांची निर्दयीपणे अंमलबजावणी करणारा आणि इस्रायलचा कट्टर शत्रू म्हणून त्याने पॅलेस्टिनींमध्ये प्रतिष्ठा मिळवली.
इस्रायलच्या मुख्य लष्करी प्रवक्त्याने 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यासाठी सिनवारला दोषी ठरवले
इस्रायलचे मुख्य लष्करी प्रवक्ते, रिअर ॲडमिरल डॅनियल हागारी यांनी 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यासाठी सिनवारला दोषी ठरवले आणि तो मरेपर्यंत इस्रायल त्याचा पाठलाग करत राहील असे सांगितले.
“याह्या सिनवारसाठी फक्त एकच जागा आहे आणि ती मोहम्मद डेफ आणि 7 ऑक्टोबरच्या उर्वरित दहशतवाद्यांच्या बाजूला आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे. सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “हीच एकमेव जागा आहे जी आम्ही त्याच्यासाठी तयार करत आहोत आणि लवकरच तो तिथे असावा अशी इच्छा बाळगून आहोत.”
खालिद मेशालचा सिनवारला पाठिंबा
हनियेहचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून चर्चेत असलेल्या खालिद मेशाल या माजी नेत्याने सिनवारला पाठिंबा दिला. ही नियुक्ती म्हणजे हमास इस्रायलच्या सर्वनाशासाठी समर्पित शत्रू आहे याची पुष्टी आहे.
इस्रायलने गाझामध्ये शेवटपर्यंत आपली मोहीम सुरू ठेवली पाहिजे या पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या आग्रहाला यामुळे बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
जीवितहानी
गाझामध्ये सुमारे 1हजार 200 इस्रायली आणि परदेशी नागरिक मारले गेले असून 250हून अधिक लोकांना ओलिस ठेवण्यात आले. इस्रायलने अथक मोहीम सुरू करून याला प्रत्युत्तर दिले. मात्र त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले. आतापर्यंत सुमारे 40 हजार पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि दाट लोकवस्तीचे एन्क्लेव्ह भग्नावस्थेत आहे. हमास आणि इस्रायलच्या परस्पर आरोपांदरम्यान, युद्धविरामाचे प्रयत्नही सुरू झाले आहेत.
चळवळीची वचनबद्धता कायम
हमासचा अधिकारी ओसामा हमदान याने अल जझीराला सांगितले की ही चळवळ युद्धबंदी करारावर पोहोचण्यासाठी वचनबद्ध आहे. हनियेहच्या नेतृत्वाखाली वाटाघाटी हाताळणारा गट यानंतर सिनवरच्या नेतृत्वाखाली काम करेल, असेही त्याने सांगितले.
सिनवारच्या नियुक्तीबाबत राजकीय विश्लेषक काय म्हणतात?
परंतु रामल्ला येथील राजकीय विश्लेषक हानी अल-मसरी म्हणाले की, एकूणच चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी सिनवरची नियुक्ती हे इस्रायलसाठी थेट आव्हान आहे.
ही नियुक्ती म्हणजे सिनवरच्या हमासबद्दल असणाऱ्या “अतिरेकी आणि प्रतिरोधक दृष्टिकोनाचे” पालन करण्याचा संदेश देणारी आहे.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)