ओमानजवळ तेल टँकर बुडाला, 8 भारतीयांसह 10 जणांची नौदलाकडून सुटका

0
ओमानच्या किनाऱ्याजवळ बुडालेल्या कोमोरोस ध्वज असलेल्या तेलाच्या टँकरला भारतीय नौदलाने वाचवले

एमव्ही फाल्कन प्रेस्टीज या कोमोरोसचा झेंडा असलेल्या तेलाच्या टँकरमध्ये 13 भारतीय आणि 3 श्रीलंकन नागरिकांसह एकूण 16 कर्मचारी होते.
सध्या सुरू असलेल्या बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या भारतीय नौदलाच्या आयएनएस तेग या युद्धनौकेने ओमानच्या किनाऱ्यावर कोमोरोसचा झेंडा असलेला तेलाचा टँकर उलटून बेपत्ता झालेल्या 16 पैकी नऊ कर्मचाऱ्यांची यशस्वीरित्या सुटका केली आहे. बुडालेल्या तेलाच्या टँकरचा शोध आणि बचाव (एसएआर) या कार्यासाठी नौदलाची ही युद्धनौका तैनात करण्यात आली आहे.

 

दहा सदस्यांपैकी आठ भारतीय आहेत आणि एक श्रीलंकेचा आहे. एमव्ही फाल्कन प्रेस्टीज या कोमोरोस-ध्वज असलेल्या तेलाच्या टँकरवरील सगळे कर्मचारी ओमानमधील दुक्वान बंदर शहराजवळ रास मद्राकाच्या आग्नेयेला 25 सागरी मैलांवर बुडाले. एमव्हीमध्ये 13 भारतीय आणि 3 श्रीलंकेच्या नागरिकांसह एकूण 16 कर्मचारी होते.
ओमान सागरी सुरक्षा केंद्राच्या समन्वयाने भारतीय नौदलाने अत्यंत आव्हानात्मक हवामानात ही मोहीम राबवली आहे. या भागात समुद्र अत्यंत खवळलेला असून जोरदार वारे वाहत आहेत, त्यामुळे बुडालेल्यांचा शोध घेणे कठीण झाले आहे. भारतीय नौदलाचे लांब पल्ल्याचे सागरी टोही विमान पी8आय देखील या मोहिमेत मदत करत आहे.

 

दुक्म बंदर ओमानच्या नैऋत्य किनाऱ्यावर असून सल्तनतीच्या प्रमुख तेल आणि वायू खाण प्रकल्पांच्या जवळ आहे. या प्रकल्पांमध्ये एका मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश आहे, जो दुक्मच्या विशाल औद्योगिक क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. शिवाय हा ओमानचा सर्वात मोठा एकल आर्थिक प्रकल्प आहे.

नौवहन संकेतस्थळ marinetraffic.com नुसार, तेलाचा टँकर येमेनी बंदर शहर एडनकडे जात होता. सूत्रांनी सांगितले की बुडालेल्या तेलाच्या टँकरने 15 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ओमानच्या किनाऱ्याजवळ आपत्तीचा कॉल पाठवला होता.
भारतीय दूतावास ओमानी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. ओमान सागरी सुरक्षा केंद्र शोध आणि बचाव (एसएआर) मोहिमेसाठी समन्वय साधत आहे तर भारतीय नौदल दूतावासाच्या सहकार्याने या प्रदेशात शोध मोहिम राबवत आहे.
एलएसईजीच्या नौकावाहतूकीच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की हे जहाज 2007 मध्ये बांधले असून 117 मीटर लांबीचे तेल उत्पादन वाहतुकीसाठी वापरला जाणारा टँकर आहे.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleChina Says It Has Halted Arms-Control Talks With US Over Taiwan
Next articleOman : मशिदीवर झालेला हल्ला आणि आयएसचे इरादे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here