Op. Sindoor मधील अनेक “मनोहर कहानियां”चा IAF प्रमुखांकडून पर्दाफाश

0

93 व्या हवाई दल दिनापूर्वी आयोजित वार्षिक पत्रकार परिषदेसाठी कॅमेरे फिरत असताना आणि पत्रकार सरसावून बसलेले असताना, दिल्लीतील एका दमट दुपारी एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी काहीतरी असामान्य केले. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच, त्यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानशी झालेल्या चार दिवसांच्या संघर्षात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या आत  खोलवर घुसून कसे हल्ले केले याचे एक-एक धमाकेदार वर्णन सादर केले.

शांत, मोजूनमापून बोलणाऱ्या मात्र अंतर्गतरित्या समाधानी दिसणाऱ्या एअर चीफ यांनी घोषणा केली की IAF ने सुमारे एक डझन पाकिस्तानी विमाने नष्ट केली आहेत, ज्यामध्ये अमेरिकेने बनवलेले F-16, चिनी बनावटीचे JF-17, C-130-क्लास ट्रान्सपोर्ट विमान आणि अगदी एक अत्याधुनिक हवाई पाळत ठेवणारे विमान यांचा समावेश आहे.

ही केवळ अवशेषांची संख्या नव्हती. सिंग यांच्या वक्तव्याने 2019 मध्ये बालाकोट नंतर भारताच्या पहिल्या मोठ्या हवाई मोहिमेच्या प्रमाणावर आणि अचूकतेवर प्रकाश पडला. या मोहीमेची मे महिन्यात फक्त चार दिवसांत सुरूवात झाली, परंतु दोन्ही अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमध्ये धोकादायक पद्धतीने संघर्ष सुरू झाला.

“सर्वात लांब पल्ल्याचा मारा”

सिंग यांच्या ब्रीफिंगमधील उल्लेखनीय क्षण तेव्हा आला जेव्हा त्यांनी IAF च्या या “वर्षातील हायलाइट” चे वर्णन केले: भारतीय मूल्यांकनानुसार, पाकिस्तानी हवाई क्षेत्रात 300 किलोमीटर खोलवर घुसून केलेला हल्ला, ज्यामध्ये एकतर AEW&C रडार विमान किंवा इतर उच्च-मूल्यवान प्लॅटफॉर्म नष्ट झाला.

“हा IAF ने केलेला सर्वात लांबचा मारा होता,” असे सिंग यांनी घोषित केले. भारताच्या मारा करणाऱ्या विमानांची पोहोच आणि अशा मोहिमेला आकार देणाऱ्या गुप्तचर समन्वयावरही त्यांनी भर दिला. नियंत्रण रेषेच्या पलीकडे आपला प्रभाव वाढवण्यात सेवेने किती पुढे मजल मारली आहे याचे हे एक चिन्ह होते, असे त्यांना सुचवायचे होते.

F-16 विमाने ठरली लक्ष्य

आतापर्यंत, भारत पाकिस्तानच्या नुकसानीबद्दल अस्पष्ट शब्दात बोलत होता. नष्ट झालेल्या विमानांमध्ये F-16 विमाने असल्याची सिंग यांनी केलेली पुष्टी ही पाकिस्तानच्या मौल्यवान लढाऊ विमानांवर थेट हल्ला झाल्याची पहिली स्पष्ट कबुली होती.

त्यांच्या मते, हवाई हल्ल्यात किमान पाच “हायटेक” लढाऊ विमाने पाडण्यात आली, तर आणखी चार किंवा पाच जेट्स – “बहुधा F-16”  त्यांच्या हँगरवरच उभी असताना नष्ट झाली. भारतीय हवाई दलाने C-130 वाहतूक विमानाचे नुकसान आणि पाकिस्तानी हवाई तळांमधील रडार, कमांड सेंटर, धावपट्टी आणि तीन स्वतंत्र हँगरचे नुकसान झाल्याचे जाहीर केले.

नवी दिल्लीसाठी, F-16 विमानांवर हल्ला करण्यामागची प्रतिकात्मकता – ज्याला पाकिस्तानी हवाई दलाचे मुकुट रत्न म्हणून ओळखले जात होते – याबद्दल बोलणे टाळणे कठीण आहे. इस्लामाबादसाठी, असे नुकसान झाल्याचे मान्य करणे राजकीय आणि लष्करीदृष्ट्या कल्पनेच्या पलीकडचे असेल.

“मनोहर कहानियां”

मे महिन्यात झालेल्या संघर्षात पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याचा दावा करून स्वतःच्याच नॅरेटीव्हजना विरोध केला आहे, यात आश्चर्य नाही. सिंग यांनी उपहासात्मक टिपणी करत हे सर्व मुद्दे खोडून काढले.

“तुम्ही आमच्या हवाई तळांवर काही पडल्याचे एकही चित्र पाहिले आहे का? कोणताही हँगर उद्ध्वस्त झाला आहे, कोणत्याही धावपट्टीला धक्का बसला आहे?” असे त्यांनी पत्रकारांना विचारले आणि पुढच्या मुद्द्यांकडे जाण्याआधी ते म्हणाले: पाकिस्तानचे दावे, म्हणजे, “मनोहर कहानियां” होते ज्यात आकर्षक कथांपेक्षा काहीही नव्हते.

आणि मग मोठा धक्का देत ते म्हणाले, “जर त्यांना वाटत असेल की त्यांनी माझी 15 विमान पाडली आहेत, तर त्यांना म्हणू द्या. मला आशा आहे की पुढच्या वेळी ते आमच्याशी लढतील तेव्हा ते माझ्या यादीत 15 विमाने समाविष्ट करतील.”

ही एक अशी टिप्पणी होती जी IAF च्या आत्मविश्वासाबद्दल जितकी जास्त माहिती देणारी होती  तितकीच ती  सार्वजनिकदृष्ट्या शत्रूचा अभिमान ठेचून काढण्याच्या प्रमुखांच्या तयारीबद्दल होती.

मर्यादा असलेले युद्ध

सर्व अभिमान बाजूला सारत, सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरला स्पष्ट राजकीय मर्यादा असलेला संघर्ष म्हणून सावधगिरीने मांडले. 22 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये 26 नागरिकांच्या हत्येनंतर भारताने 7 मे रोजी पाकिस्तानस्थित दहशतवादी छावण्या आणि त्यांच्या लष्करी अधिकारी यांना लक्ष्य करून हल्ले सुरू केले. 10 मे पर्यंत, दोन्ही बाजूंनी संघर्ष विरामावर सहमती दर्शविली.

“हे एक युद्ध होते जे एका स्पष्ट उद्दिष्टाने सुरू झाले होते. मात्र ते दीर्घकाळ टिकले नाही,” असे सिंग म्हणाले. “दहशतवाद्यांना निष्पाप लोकांना मारण्याची किंमत मोजावी लागली आणि जगाने पाहिले की आम्ही आमचे ध्येय साध्य केले.”

हे वर्णन-जवळजवळ क्लिनिकल-अनेक विश्लेषकांना ‘वेगवान, तीक्ष्ण, मर्यादित’ मोहिमांचा सिद्धांत म्हणून जे दिसते तेच प्रतिबिंबित करतेः संपूर्ण युद्धात वाढ होऊ न देता सीमापार दहशतवादासाठी पाकिस्तानला शिक्षा करणे.

युद्धभूमी बदलणे

विजयाबद्दल बोलतानाही, सिंग यांनी कबूल केले की शत्रू परिस्थितीशी जुळवून घेत आहे. अनेक अहवाल असे सूचित करतात की दहशतवादी गट आता पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात खोलवर सरकले आहेत, मे महिन्यात भारताने केलेल्या हल्ले केलेल्या मोठ्या इमारतींऐवजी ते लपण्यासाठी लहान लहान ठिकाणे निश्चित करत आहेत.

अर्थात या गोष्टीनेही सिंग अस्वस्थ झालेले नाहीत. “जर गुप्तचर माहिती उपलब्ध असेल, तर आता आपल्याकडे त्यांच्या कोणत्याही लपण्याच्या ठिकाणी खोलवर जाऊन अचूक मारा करण्याची क्षमता आहे. आम्ही त्यांना आणि त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना नष्ट करू शकतो. आमचे पर्याय बदललेले नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

संख्यांमागील सत्य

बारा विमाने, चार रडार, दोन कमांड सेंटर, तीन हँगर ही संख्या यशाचे मोजमाप देण्यासाठी पुरेशी आहे. पण सिंग यांच्या ब्रीफिंगचा उपसंहार तितकाच महत्त्वाचा होता.

पहिले, ते केवळ नियंत्रण रेषेचे रक्षण न करता, लांब अंतरावरूनही हल्ला करण्याच्या शक्ती प्रदर्शित करण्याच्या क्षमतेवर भारतीय हवाई दलाच्या वाढत्या आत्मविश्वासाचे दर्शन घडवणारे होते. दुसरे, अचूक आणि लांब पल्ल्याचे हल्ले झाल्याचे नाकारणाऱ्या पाकिस्तानी कथानकाला आकार देण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न होता. आणि तिसरे, ते भारतीय हवाई दलाच्या या विश्वासाचे प्रतिबिंब होते की प्रतिबंध युद्धभूमीतील तथ्यांइतकाच लोकांच्या धारणांवर, समजूतींवर अवलंबून असतो.

आपले नुकसान नाकारण्यास किंवा कमी लेखण्यास भाग पाडल्या गेलेल्या पाकिस्तानसाठी, सिंग यांच्या टिप्पण्या प्रतिष्ठेचे आव्हान दर्शविणाऱ्या आहेत. भारताचा विचार केला तर हवाई दलाला त्याची कार्यात्मक परिपक्वता, त्याची तांत्रिक प्रगती आणि शत्रूची ‘काहानियां’ (कथा) उघड करण्याची त्याची तयारी यावर प्रकाश टाकण्यास उत्सुक असल्याचे संकेत देतात.

भारतीय हवाई दल त्यांच्या 93 व्या वर्धापन दिनानिमित्त तयारी करत असताना, ऑपरेशन सिंदूर हे केवळ चार दिवसांच्या संघर्षापुरते मर्यादित नसून त्यापेक्षा जास्त आहे. सिंग यांच्या म्हणण्यानुसार, ते पाकिस्तानला, भारताच्या स्वतःच्या जनतेला आणि व्यापकपणे संपूर्ण जगाला – हे दाखवून देणारे होते की हवाई दल राजकीय नियंत्रणाखाली असतानाही जोरदार, खोलवर आणि जलद हल्ले करू शकते.

आणि अशा संघर्षात जिथे स्पर्धात्मक कथा कधीकधी प्रतिस्पर्धी विमानांइतकेच महत्त्वाच्आ असू शकतात, सिंग यांनी कोणती कथा लक्षात ठेवायची याबद्दल उपस्थितांच्या मनात कोणतीही शंका निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली.

रवी शंकर

+ posts
Previous article“Think Before Choosing Terror”: Army, Air Force Chiefs Issue Ultimatum to Pakistan
Next articleउच्चस्तरीय भेटींपूर्वी IAF प्रमुखांकडून राफेलचे संकेत, Su-57 वरही विचार सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here