भारतीय हवाई दलाचे प्रमुख, (CAS) एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी, बदलत्या भू-सामरिक परिस्थितीतील उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी, जलद क्षमता वाढीची आणि संयुक्त ऑपरेशन्सची गरज या महत्वाच्या मुद्द्यांवर जोर दिला. वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (DSSC) येथे, भारतीय सशस्त्र दलातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना, सिंग यांनी बदलत्या धोक्यांशी जुळवून घेण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच तिन्ही सेवांमध्ये ऑपरेशनल समन्वय वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
11 आणि 12 मार्च दरम्यान आयोजित DSSC दौऱ्यात, वायुसेना प्रमुखांनी 80व्या स्टाफ कोर्समधून उत्तीर्ण होणाऱ्या अधिकाऱ्यांना बदल स्वीकारण्याचे आणि बदलत्या सुरक्षा गतिशीलतेचे गंभीरपणे मूल्यांकन करण्याचे आवाहन केले. तसेच सिंग यांनी भविष्यकालीन संघर्षांसाठी अनुकूल धोरण तयार करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या दृष्टिकोनावर भर दिला आणि लढाईची कार्यक्षमता वाढविण्यात एकत्रित प्रशिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
भारतीय वायुसेनेचे (IAF) आधुनिकीकरण आणि ऑपरेशनल फोकसविषयी बोलताना, एयर चीफ मार्शल सिंह यांनी चालू असलेल्या क्षमता विकास उपक्रमांबद्दल माहिती दिली आणि आधुनिक युद्धातील एकत्रित ऑपरेशन्सचे वाढते महत्त्व सांगितले. त्यांनी राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यात IAF कर्मचाऱ्यांच्या लवचिकता, व्यावसायिकता आणि समर्पणाचे कौतुक केले.
Air Chief Marshal AP Singh, Chief of Air Staff, addressed #FutureLeaders of #IndianArmedForces and Friendly Foreign Countries undergoing #SC_80 at #DSSC, Wellington on the strategic perspective on #IAF, its ongoing capability development and the importance of unified operations… pic.twitter.com/vfDrrPYfWk
— HQ IDS (@HQ_IDS_India) March 11, 2025
वायुसेना प्रमुखांना DSSC च्या प्रशिक्षण क्रियाकलापांबद्दल आणि सशस्त्र दलांमध्ये संयुक्त ऑपरेशन्सवर जोर देण्याच्या महत्त्वाबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. आधुनिक लष्करी तयारीतील हा एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे. कठोर शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे, भविष्यातील लष्करी नेत्यांचे मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेच्या भूमिकेचे कौतुक करत, सिंग यांनी IAF (इंडियन एअरफोर्स) च्या अंतर-सेवा सहकार्य मजबूत करण्याच्या वचनबद्धतेची पुन्हा पुष्टी केली.
हा दौरा भारतीय वायुसेनेच्या सामरिक दृष्टिकोनाला बळकटी देणारा असून, यामुळे संयुक्त ऑपरेशनल क्षमतांचा विस्तार आणि अधिकाधिक जटिल सुरक्षेच्या वातावरणात भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठीची तयारी सुनिश्चित केली जाईल.
टीम भारतशक्ती