तणावाच्या पार्श्वभूमीर भारतीय वायुसेनेचा पाकिस्तान सीमेजवळ सराव सुरू

0

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शक्ती आणि सामारिक सज्जतेचे प्रदर्शन म्हणून, भारतीय वायुसेनेने (IAF) 23 ते 25 जुलै दरम्यान, राजस्थानमधील पाकिस्तान सीमेजवळ तीन दिवसांचा युद्ध सराव सुरू केला आहे. ही ऑपरेशन्स जोधपूर आणि बाडमेरच्या आसपास केंद्रित आहेत, जे नियंत्रण रेषेजवळील महत्त्वाचे फॉरवर्ड हवाई तळ आहेत.

IAF ने NOTAM (Notice to Airmen) जारी करून, या भागांतील हवाई क्षेत्रात नागरी विमान वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत, जे उच्च तीव्रतेच्या लष्करी सरावाची सुरूवात सूचित करतात. भारतीय वायुसेनेचा हा सराव अशावेळी होतो आहे, जेव्हा पाकिस्तान देखील त्यांचे सैनिकी सराव करत आहे आणि त्यानेही तत्सम NOTAM जारी केले आहेत, त्यामुळे दोन्ही बाजूंनी क्षेत्रीय सतर्कतेचा स्तर वाढलेला आहे.

फायटर जेट्स, ड्रोन आणि SEAD/DEAD ऑपरेशन्सचे प्रदर्शन

या सरावात फायटर विमाने, युद्ध हेलिकॉप्टर, निगराणी विमाने आणि UAVs (मानवरहित हवाई वाहने) यांसारखी संपूर्ण हवाई क्षमतांचा समावेश असेल. जरी IAFचा याबाबतचा अधिकृत तपशील आलेला नसला, तरी संरक्षण सूत्रांनुसार या सरावात SEAD (Suppression of Enemy Air Defences) आणि DEAD (Destruction of Enemy Air Defences) तंत्रावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. हे तंत्र शत्रूच्या रडार आणि क्षेपणास्त्र प्रणाली निष्प्रभ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

पाकिस्तानमध्ये चीनी बनावटीच्या हवाई संरक्षण प्रणाली तैनात केल्या जात आहेत, ज्यामध्ये HQ-9 आणि LY-80 जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे, त्यामुळे या सरावाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या वर्षी मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान, दहशतवादी पायाभूत सुविधा आणि पाकिस्तानच्या रडार नेटवर्कला नष्ट करण्याच्या उद्देशाने, भारतीय रेडिएशनविरोधी ड्रोनने या प्लॅटफॉर्मना लक्ष्य केले आणि नष्ट केले.

TRF ला अमेरिकेने ब्लॅकलिस्ट केल्यानंतर पाकिस्तानची चिंता वाढली

भारतीय वायुसेनेचा हा सराव महत्त्वाचा ठरतो, कारण अलीकडेच काही मोठे भू-राजकीय बदल घडले आहेत. काही दिवसांपूर्वी, युनायटेड स्टेट्सने The Resistance Front (TRF) या Lashkar-e-Taiba (LeT) च्या छुप्या संघटनेला, ज्याने 22 April रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती, एक जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.

अमेरिकेने TRF ला थेट LeT चेच अंग म्हणून घोषित केले आणि पाकिस्तानच्या ISI सोबतच्या त्याच्या कार्यपद्धती व वैचारिक संबंधांचा उल्लेख केला. पहलगाम हल्ला 2008 च्या मुंबई हल्ल्यांनंतर भारतातील सर्वाधिक घातक हल्ला मानला जातो आणि यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादी यंत्रणेवर आंतरराष्ट्रीय लक्ष पुन्हा केंद्रित झाले आहे.

TRF ला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर भारताकडून संभाव्य प्रत्युत्तराच्या भीतीने, पाकिस्तानने 16 ते 23 July दरम्यान मध्य विभागात आणि 22 ते 23 July दरम्यान, दक्षिणी कॉरिडॉरमध्ये हवाई क्षेत्रात निर्बंध लागू केले आहेत. चर्चा अशी आहे की पाकिस्तान हा सैनिकी सराव फक्त एक निमित्त म्हणून वापरून बॅलिस्टिक किंवा क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊ शकतो.

चीनकडून पाकिस्तानला वाढती लष्करी मदत

तणाव वाढवणारी आणखी एक बाब म्हणजे, चीनकडून अलीकडेच पाकिस्तानमध्ये उतरलेल्या लष्करी मालवाहू विमानांबाबतचे अहवाल. यामुळे नवीन शस्त्रास्त्रे आणि रडार प्रणाली पाकिस्तानला पुरवण्यात आल्याच्या चिंतेला उधाण आले आहे. संरक्षण विश्लेषकांचा विश्वास आहे की चीनने पाकिस्तानच्या अशक्त झालेल्या हवाई संरक्षण यंत्रणेला बळकट करण्यासाठी नवे शस्त्रास्त्र दिले आहेत, यातील बरेच युनिट्स मे महिन्यात भारताच्या हवाई हल्ल्यांत नष्ट झाली होती.

ही नव्याने निर्माण झालेली लष्करी भागीदारी, ही भारताच्या वाढत्या रणनीतिक प्रभावाला तोलण्यासाठी बीजिंग आणि इस्लामाबादचा संयुक्त प्रयत्न असल्याचे संकेत मिळत आहेत.

ISI ची नवीन रणनीती: लष्कराचे पुनर्ब्रँडिंग आणि तळबदल

गुप्तचर माहितीनुसार, पाकिस्तानची ISI ने LeT ला, त्याचा ऑपरेशनल बेस मुरिदकेहून बहावलपूर येथे हलवण्याचे आदेश दिले आहेत, कदाचित जागतिक दबावाखाली संघटना संपवली गेली असल्याचे भासवण्यासाठी. Operation Sindoor दरम्यान भारताकडून बहावलपूर आणि मुरिदके येथील लष्करच्या कमांड संरचनेवर हल्ले झाले होते, ज्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.

ISI सध्या LeT चे पुनर्ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही पुरावे समोर आले आहेत, उदाहरणार्थ 26/11 च्या दहशतवाही हल्ल्यानंतर LeT चे Jamaat-ud-Dawa मध्ये रूपांतर झाले. बहावलपूरमध्ये लावण्यात आलेली पोस्टर्स आणि हालचालींवरून लष्कर अजूनही सक्रिय असल्याचे स्पष्ट होते, जरी ते आपल्या अस्तित्वावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असले तरी.

एक रणनीतिक शक्तीप्रदर्शन

भारत आणि पाकिस्तान दोघेही, त्यांच्या लष्करी सज्जतेला बळकट करत असताना, राजस्थानच्या आकाशात पुन्हा एकदा उच्च-स्तरीय लष्करी खेळीचे रणांगण तयार होत आहे, ज्याचा परिणाम भविष्यात उपखंडाच्या सीमा ओलांडू शकतो.

 – हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleफिलीपिन्स अध्यक्षांच्या आगामी भारत दौऱ्यात सागरी सुरक्षेवर लक्ष केंद्रित
Next articleचीनबरोबरचे संबंध ‘बदलाच्या टप्प्यावर’ पोहोचले’- EU च्या अध्यक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here