फ्लोरिडाच्या गोल्फ क्लबजवळील गोळीबारातून ट्रम्प बचावले

0
फ्लोरिडाच्या
अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीचमधील  रिपब्लिकन पक्षाकडील अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्सजवळ 15 सप्टेंबर 2024 रोजी अनेक वेळा गोळीबार झाल्याच्या वृत्तानंतर परिसरात पोलिसांची गस्त सुरू झाली आहे. (रॉयटर्सच्या माध्यमातून एक्स/@realDerekUtley)
फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीच येथील ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्सजवळ रविवारी अनेक वेळा गोळीबार करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत.
गोल्फ क्लबच्या कुंपणाबाहेर हा गोळीबार करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेतील सदस्यांनाही या बातमीला दुजोरा दिला असून या गोळीबारानंतर ते सुरक्षित असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी घटनेबाबत अधिक तपशील दिलेला नाही.
आपली ओळख गुप्त ठेवू इच्छिणाऱ्या दोन स्रोतांचा हवाला देत असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या गोल्फ क्लबजवळ एका व्यक्तीला बंदूक घेऊन फिरताना बघिल्यानंतर यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी गोळीबार सुरू केला. अर्थात यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

रॉयटर्स मात्र या बातमीची सत्यता लगेच तपासू शकले नाही. इतर  माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संशयित व्यक्ती घटनास्थळावरून एसयूव्हीमधून पळून जाण्यात यशस्वी झाली. मात्र तिला दुसऱ्या प्रांतात पकडण्यात आले आहे.  मार्टिन काउंटीचे शेरीफ विल्यम स्नायडर यांच्या दाव्यानुसार पाम बीच काउंटी शोधत असलेल्या संशयिताला त्यांच्या एजन्सीने अटक केल्याचे सीएनएनने म्हटले आहे. दुपारी 2 वाजण्याच्या (1800 जी. एम. टी.) सुमारास घडलेल्या या घटनेचा तपास करत असल्याचे गुप्तचर यंत्रणेने सांगितले.

या घटनेनंतर ट्रम्प यांनी त्यांच्या निधी उभारणीसाठी मदत करणाऱ्या सगळ्यांना एक ईमेल पाठवला असून “माझ्या परिसरात गोळीबार झाला, परंतु अफवा नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी, तुम्ही हे आधी समजून घ्यावे अशी माझी इच्छा होतीः मी सुरक्षित आणि चांगला आहे!” असे त्यात नमूद केले आहे. रॉयटर्स हा मेल बघितला आहे.

याआधी 13 जुलै रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्न केला गेला. या घटनेत ट्रम्प जखमी झाले होते. 5 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याविरुद्ध ट्रम्प उभे असून त्यांच्यावरील हल्ल्यानंतर  उमेदवारांच्या संरक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.

व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांना या घटनेबद्दल माहिती देण्यात आली असून ट्रम्प सुरक्षित आहेत हे समजल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

“अमेरिकेत हिंसाचाराला स्थान नाही”, असे हॅरिस यांनी एक्स सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

ही घटना घडली तेव्हा ट्रम्प क्लबमध्ये गोल्फ खेळत होते. गोळीबाराची घटना घडल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी त्वरित ट्रम्प यांना क्लबच्या होल्डिंग रूममध्ये नेले, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

पाम बीच पोलीस सेवेने सांगितले की ते संध्याकाळी 4.30 वाजता या घटनेबाबत माध्यमांना माहिती देतील.

चार दशकांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे माजी अध्यक्ष किंवा प्रमुख पक्षाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये गोळीबार झाल्याची पहिलीच घटना ही सुरक्षिततेमधील त्रुटी दाखवणारी होती ज्यामुळे किम्बर्ली चिटल यांना द्विदलीय कॉंग्रेसच्या दबावाखाली सिक्रेट  सर्व्हिसेसच्या संचालकपदाचा राजीनामा द्यावा लागला.

या हल्ल्यात ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली होती तर रॅलीसाठी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. 20 वर्षीय थॉमस क्रूक्स म्हणून ओळख पटलेल्या हल्लेखोराला सिक्रेट सर्व्हिसच्या स्नाइपरने गोळ्या घालून ठार केले.

यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या नव्या कार्यवाहक संचालकांनी ऑगस्टमध्ये सांगितले की, ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाला कारणीभूत ठरलेल्या सुरक्षा त्रुटींबद्दल त्यांना “लाज वाटते.”

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)

+ posts
Previous articleBiological Warfare: A Threat More Potent Than Nuclear Warfare: Part II
Next articleNetanyahu Vows To Strike Houthis In Yemen After Missile Strike In Central Israel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here