ऑस्ट्राहिंद या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या संयुक्त लष्करी सरावाला पुण्यामध्ये फॉरिन ट्रेनिंग नोड येथे आज सुरुवात झाली. 8 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2024 दरम्यान हा सराव होणार आहे. ऑस्ट्राहिंद हा वार्षिक युद्धसराव असून तो भारत आणि ऑस्ट्रेलियात आलटून पालटून आयोजित केला जातो. यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये हा युद्धसराव ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आला होता.
भारतीय तुकडीमध्ये 140 लष्करी कर्मचारी असून त्यामध्ये प्रामुख्याने डोग्रा रेजिमेंटच्या जवानांचा आणि भारतीय हवाई दलाच्या 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन लष्करी तुकडीमध्ये 120 कर्मचारी असून त्यामध्ये सेंकड डिव्हीजनच्या 10 ब्रिगेडच्या
ऑस्ट्राहिंद हा युद्धसराव संयुक्त राष्ट्रांच्या आदेशाच्या सातव्या अध्यायात नमूद केल्यानुसार अर्धशहरी आणि अर्ध-वाळवंटी प्रदेशात संयुक्त पारंपरिक मोहिमांमध्ये आंतरपरिचालनक्षमतेत वाढ करून या माध्यमातून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लष्करी सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित केला जातो. याशिवाय हा सराव शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त नियोजन आणि सामरिक समन्वय यावर भर देतो, असे भारतीय लष्कराने सांगितले आहे.
Exercise #AustraHind 2024.
The opening ceremony of 3rd edition of Exercise #AustraHind 2024, a joint #military exercise between #India and #Australia, was held today at the Foreign Training Node, #Pune, #Maharashtra.
The exercise is scheduled from 08 to 21 November 2024. The… pic.twitter.com/0lG1YS9Rim
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) November 8, 2024
हा युद्धसराव युद्ध तयारी तसेच सामरिक प्रशिक्षण टप्पा आणि सत्यापन टप्पा अशा दोन टप्प्यांमध्ये आयोजित केला जाईल. या युद्धसरावात आयोजित होणाऱ्या ड्रिल्स/ ऍस्पेक्ट्समध्ये दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या एखाद्या प्रदेशाच्या मुक्ततेची मोहीम, संयुक्त परिचालन केंद्राची स्थापना, छापे आणि शोध आणि उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमांसारख्या संयुक्त दहशतवादविरोधी मोहिमांचे आयोजन, हेलिपॅडचे संरक्षण, ड्रोन्सचा वापर आणि ड्रोन प्रतिबंधक उपाययोजना आणि विशेष हेलिबोर्न कारवायांचा समावेश आहे.
ऑस्ट्राहिंद हा युद्धसराव दोन्ही बाजूंना युद्धाच्या डावपेचांमधील सर्वोत्तम पद्धती, डावपेचांची आखणी करुन राबवल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचा वापर यांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये यामुळे सौहार्द आणि परस्परांविषयी आदर निर्माण होईल.
टीम भारतशक्ती