भारतीय नौदलामध्ये ‘INS Androth’ या दुसऱ्या ASW जहाजाचा समावेश

0
INS Androth
GRSE कोलकत्ता, यांनी तयार केलेले दुसरे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट 'INS Androth' भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आले.

भारतीय नौदलाने आपल्या पाणबुडीविरोधी जहाजांच्या क्षमतेत महत्त्वाची भर घालत, दुसरी अँटी सबमरीन वॉरफेअर (ASW), शॅलो वॉटर क्राफ्ट (SWC) – ‘INS Androth‘ या जहाजाला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे. कोलकत्यातील, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स GRSE) या कंपनीने तयार केलेले हे जहाज, नुकतेच भारतीय नौदलाकडे अधिकृतरीत्या सुपूर्द करण्याल आले. या महिन्याच्या अखेरीस INS Androth औपचारिकरीत्या सेवेत दाखल होणार आहे.

‘ INS अँड्रोथ’ जहाजाचे नाव, लक्षद्वीपमधील अँड्रोथ बेटावरून घेण्यात आले आहे. याआधी याच मालिकेतील INS Arnala हे जहाज जून महिन्यात नौदलात समाविष्ट झाले होते. याच मालिकेतील तिसरे जहाज INS Ajay चे, जुलै महिन्यात GRSE तर्फे जलावतरण करण्यात आले असून, सध्या त्याच्या समुद्री चाचण्या सुरू आहेत.

ASW Shallow Water Crafts: भारताचे धोरणात्मक उत्तर

भारताने आपल्या या खास SWC ताफ्याची रचना शत्रूच्या, विशेषतः पाकिस्तानच्या चिनी पाणबुड्यांना तटाजवळील (shallow coastal) भागात निष्क्रिय करण्यासाठी केली आहे.

INS Androth आणि त्याच्या श्रेणीतील इतर जहाजांची वैशिष्ट्ये:

  • शत्रूची पाणबुडी शोधण्याची क्षमता: हे जहाज किनाऱ्यापासून 100 ते 150 नॉटिकल मैलांपर्यंत शत्रूची पाणबुडी ट्रॅक करु शकते.
  • शस्त्रसज्जता: या जहाजामध्ये- हलक्या वजनाचे टॉरपीडो, पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर्स, 30mmची नेव्हल गन, Hull-mounted सोनार प्रणाली, Low-frequency variable depth सोनार प्रणाली आणि आधुनिक ASW कॉम्बॅट स्यूट सारख्या आधुनिक शस्त्रास्त्र प्रणालींचा समावेश आहे.
  • क्षमता: कमाल वेग: 25 knots, परिचालन श्रेणी: 3,300 km
  • भूमिका: पाणबुडीचा अचूक वेध आणि निशाणा, तटावरील गस्त (coastal surveillance), शोध आणि बचाव मोहिमा आणि निम्न तीव्रतेच्या समुद्री कारवाया करण्यास सज्ज.

याशिवाय ही जहाजे, मोठ्या युद्धनौकांसाठी मार्ग मोकळा/स्पष्ट करण्याची (route-clearers) भूमिकाही बजावतात, ज्यामुळे त्या फ्लीट ऑपरेशन्सचा अविभाज्य भाग ठरतात.

भारताचा 16-जहाजांचा ASW प्रकल्प

भारताने दीर्घकालीन सुरक्षा धोरणांतर्गत, 16 ASW Shallow Water Craft बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 2013 मध्ये Defence Acquisition Council कडून या प्रकल्पास मंजुरी मिळाली होती, आणि 2019 मध्ये “Buy and Make in India” कार्यक्रमाअंतर्गत यासारख्या जहाजांची बांधणी सुरू झाली. उत्पादन विभागणीमध्ये: GRSE कोलकत्ताकडून 8 जहाजे, Cochin Shipyard कडून 8 जहाजे सुपूर्त करण्यात आली. प्रत्येक जहाजाचे वजन सुमारे 1,490 टन इतके होते, तर लांबी 77 मीटर होती.

हा प्रकल्प, स्वयंपूर्ण (self-reliant) नौदल निर्माण करण्याच्या दिशेने भारताचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जो पारंपरिक आणि अनियमित पाणबुडी धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम ठरेल.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभारतीय वायुसेना (IAF) उत्तर-पूर्व भागात घेणार, सर्वात मोठा लष्करी सराव
Next articleपंतप्रधान मोदींनी संयुक्त कमांडर्स परिषदेत, संरक्षण सजत्तेचा घेतला आढावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here