जर्मनीच्या ख्रिसमस मार्केटमधील हल्ल्याचा भारताने निषेध केला आहे. शुक्रवारी मॅग्डेबर्ग येथील गजबजलेल्या ख्रिसमस बाजारात एका सौदी व्यक्तीने आपली कार गर्दीत घुसवून अनेकजणांना चिरडल्याची घटना घडली. यात पाचजणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या लोकांमध्ये सात भारतीय नागरिकांचा समावेश आहे.
ख्रिसमस बाजारातील मृतांची संख्या दोन वरून पाचवर पोहोचली आहे. मॅग्डेबर्ग ही सॅक्सोनी-अनहाल्टची राज्य राजधानी आहे. येथील रहिवासी संख्या सुमारे 2 लाख 40 हजार आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ख्रिसमस बाजारातील या भीषण आणि भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. भारताने सांगितले की, आमचे शिष्टमंडळ जखमी भारतीय तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे आणि शक्य ती सर्व मदत पुरवली जात आहे.
“अनेक मौल्यवान जीव गेले आहेत आणि अनेकजण जखमी झाले आहेत. आमच्या संवेदना आणि प्रार्थना पीडितांसोबत आहेत,” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
मॅग्डेबर्ग सिटी कौन्सिलर फॉर पब्लिक ऑर्डरच्या, रॉनी क्रुग यांनी ख्रिसमस बाजार बंद झाल्याची घोषणा करताना सांगितले, “मॅग्डेबर्गमधील ख्रिसमस संपला आहे.”
गृहमंत्रालयाने शनिवारी जाहीर केले की हल्ल्यातील पीडितांच्या स्मरणार्थ मॅग्डेबर्ग राजधानी असलेल्या जर्मनीतील सॅक्सोनी-अनहाल्ट राज्यातील सर्व अधिकृत इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर फडकवले जातील. जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी जर्मनीच्या मॅग्डेबर्ग येथील ख्रिसमस बाजाराला भेट दिली.
ते म्हणाले, “जवळजवळ 40 जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे”. जर्मनी या हल्ल्याला “कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण ताकदीने” प्रत्युत्तर देईल, असे ते म्हणाले.
फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी स्थलांतरीत आणि सुरक्षिततेवरील वादावरून सध्या वातावरण तापलेल्या देशाला एकीचे आवाहनही स्कोल्झ यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, “आपण एकत्र राहणे महत्वाचे आहे, आपण शस्त्रे तयार ठेवणे महत्वाचे आहे, द्वेष हे आपले सहअस्तित्व ठरवत नाही तर आपण एक समुदाय आहोत ही वस्तुस्थिती आहे.”
या घटनेचा निषेध नोंदवणाऱ्या जागतिक नेत्यांचे आभार मानताना स्कोल्झ म्हणाले,”जर्मनी एकटा नाही हे बघणे अतिशय सकारात्मक आहे.”
भारताव्यतिरिक्त इजिप्त, फ्रान्स, सौदी अरेबिया, युक्रेन आणि अमेरिकेसह अनेक देशांनी या घटनेचा निषेध केला आहे.
इजिप्तने जर्मनीच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले आहे. कैरोनेही जर्मनीचे सरकार आणि नागरिकांप्रती मनापासून शोक व्यक्त केला आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले, “जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमध्ये घडलेल्या भीतीदायक घटनेमुळे मला खूप धक्का बसला आहे.” राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले की फ्रान्स जर्मन लोकांच्या वेदनांप्रती संवेदना व्यक्त करतो. या प्रसंगी आम्ही त्यांच्याबरोबर उभे आहोत.”
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले, “आम्ही या काळ्या दिवशी मॅग्डेबर्ग आणि सर्व जर्मन लोकांसोबत उभे आहोत. प्रिय जर्मन मित्रांनो, खंबीर रहा.”
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही शनिवारी या घटनेवर शोक व्यक्त केला. बायडेन म्हणाले, कोणत्याही समुदायाला आणि कोणत्याही कुटुंबाला आनंदाच्या आणि शांततेच्या सुट्टीच्या काही दिवस आधी अशा घृणास्पद आणि दुःखद घटनेचा सामना करावा लागू नये.”
जर्मनीतील ख्रिसमस मार्केटवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हल्ला झाला त्यावेळी ही व्यक्ती एकटीच कारमध्ये होती.
आरोपी ५० वर्षांचा असून तो डॉक्टर आहे. तो मूळचा सौदी अरेबियाचा असून गेली दोन दशके हा जर्मनीमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता. आरोपी डॉक्टरची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
ताबेल ए म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सौदी डॉक्टरमागे इस्लामविरोधी वक्तव्याचा इतिहास आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
पोलिसांनी रात्रभर त्याच्या घराची झडती घेतली परंतु हल्ल्यामागचा हेतू अस्पष्टच राहिला. जर्मनीच्या अंतर्गत मंत्री नॅन्सी फेझर यांनी सांगितले की संशयित व्यक्तीचा इस्लामोफोबिया स्पष्टपणे दिसत आहे, परंतु त्यांनी हेतूबाबत भाष्य करण्यास नकार दिला. तालेब ए. 2019 मध्ये जर्मन वृत्तपत्र एफएझेड आणि बीबीसीसह अनेक माध्यमांना मुलाखती देताना दिसला आहे.
या मुलाखतींमध्ये, त्याने सौदी अरेबियन्स आणि अनेक मुस्लिमांना युरोपमध्ये पळून जाण्यास मदत करणारे कार्यकर्ते म्हणून केलेल्या आपल्या कामाची माहिती दिली.
आठ वर्षांपूर्वी, इस्लामी संबंध असलेल्या आणि ट्युनिशियाला आश्रय घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या अनीस अमरीने आपला ट्रक बर्लिनमधील गर्दीच्या ख्रिसमस बाजारात घुसवला होता. या घटनेत 12जण ठार तर डझनभर जखमी झाले होते.

तृप्ती नाथ
(रॉयटर्स)