भारत आणि फ्रान्स नौदलाच्या ‘वरुणा’ सरावाला सुरूवात

0
वरुणा
भारत-फ्रान्स द्विपाक्षिक नौदल सराव वरुणाला 19 मार्च 2025 पासून सुरूवात झाली.

भारतीय आणि फ्रेंच नौदलांनी बुधवारी अरबी समुद्रात वरुणा या त्यांच्या संयुक्त नौदल सरावाची सुरुवात केली. यात विमानवाहू जहाजे, लढाऊ विमाने, विध्वंसक जहाजे आणि पाणबुड्यांसह दोन्ही देशांच्या अनेक प्रगत गोष्टींचा समावेश आहे.

भारतीय नौदलाने या सरावाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या निवेदनात म्हटले, “आयएनएस विक्रांत आणि चार्ल्स डी गॉल या विमानवाहू नौका, त्यांच्यावरील संबंधित लढाऊ विमाने, विध्वंसक विमाने, युद्धनौका आणि भारतीय स्कॉर्पीन दर्जाच्या पाणबुडीसह या सरावातील सहभाग दोन्ही नौदलांमधील परिचालन समन्वय आणि वाढत्या सागरी सहकार्याला अधोरेखित करतो.”

भारत आणि फ्रान्स यांच्यातील दृढ होत चाललेल्या धोरणात्मक भागीदारीचे प्रतिबिंब म्हणून, त्याच्या 23व्या आवृत्तीत, वरुणाने 2001 मध्ये सुरुवात केल्यापासून त्याची जटिलता आणि व्याप्ती यामध्ये लक्षणीय वाढ केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, हा सराव नौदल सहकार्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून विकसित झाला आहे, ज्यामुळे आंतरसंचालनीयता वाढते आणि संयुक्त परिचालन क्षमता बळकट होते.

या वर्षीच्या कवायतींमध्ये पृष्ठभागाखालील, पृष्ठभागावरील आणि हवाई क्षेत्रातील नौदलाच्या मोहिमांचा विस्तृत समावेश असेल.

“वरुणा-2025 मध्ये प्रगत हवाई संरक्षण कवायती आणि लढाऊ कवायती असतील, ज्यात फ्रेंच राफेल-एम आणि भारतीय मिग-29के यांच्यातील air to air लढतीचा समावेश आहे, ज्याचा उद्देश सामरिक आणि परिचालन सज्जता सुधारणे हा आहे. पाणबुडीविरोधी युद्धसराव पाण्याखालील कार्यक्षेत्राचे सखोल प्रशिक्षण प्रदान करतील, तर पृष्ठभागावरील युद्ध मोहिमांमध्ये ताफ्यातील समन्वित युक्तीवाद आणि सहभाग दर्शविला जाईल,” असे निवेदनात म्हटले आहे.

याव्यतिरिक्त, सागरी गस्त विमान परिस्थितीजन्य जागरूकता वाढवेल आणि समुद्रातील पुनर्भरण सराव दोन्ही नौदलांमधील रसद समन्वयाला बळकटी देईल.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleIndia, France Launch ‘Varuna’ Naval Exercise In Arabian Sea
Next articleUkraine Ceasefire, Russian Response And The Road Ahead

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here